चालू घडामोडी – 26 एप्रिल 2021

न्या. रमण यांना सरन्यायाधीश पदाची शपथ

  • न्या. नुथलापती व्यंकट रमण यांनी देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
  • राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. रमण यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • सन २००० मध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे हंगामी न्यायाधीश म्हणून नेमणूक केली गेली, तर हंगामी मुख्यन्यायाधीश म्हणून नियुक्ती २००३ मध्ये केली गेली, २०१३ ला त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नेमण्यात आलं. यानंतर २०१४ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झाले.
  • आता ते माजी सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांची जागा घेतील.

राज्यातील कृषी पदव्यांना ‘बीएस्सी ऍग्री’ समक्षतेचा दर्जा.

  • राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठातल्या बीएस्सी ऍग्री (ऑनर्स) या पदवी अभ्यासक्रमाला समकक्ष ठरवण्यात आले आहे.
  • पदवी अभ्यासक्रमाच्या नावांत बदल झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या परीक्षा देण्यात अडचण येऊ लागल्याने हा राज्य शासनाने हा बदल केला आहे.
  • बीएस्सी ऍग्री समकक्षतेचा दर्जा मिळालेल्या अभ्यासक्रमांमध्ये बीएससी उद्यानविद्या, वनविद्या, सामाजिक विज्ञान, बीएफएससी (मत्स्य विज्ञान), बीटेक (कृषी अभियांत्रिकी), बीटेक (अन्न तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान), बीएससी (एबीएम)/बीबीएम (कृषी), बीएससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
  • या निर्णयामुळे कृषीशाखेत विविध अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाही.

उत्तराखंड हिमस्सखलनामुळे ८ लोक ठार

  • उत्तराखंड च्या चमोली जिल्ह्यात भारत चीन सीमेवर झालेल्या हिमस्सखलन दुर्घटनेत सीमा रस्ता संघटनेच्या ८ कामगारांचा मृत्यू झाला.
  • नीती खोऱ्यातील सुमना परिसरातून मृतदेह काढण्यात आले.
  • हिमस्सखलन होण्याचं कारण तापमानवाढ आहे, व या भागामध्ये मानवी हस्तक्षेप वाढला आहे. इथे जलविद्युत प्रकल्पांचं काम मोठ्या प्रमाणावर होत आहे.

भूजल साठ्याच्या कमी होणाऱ्या पातळीमुळे रब्बी पिकांची लागवड २०% ने कमी होईल.

  • भूजल साठ्याच्या कमी होणाऱ्या पातळीमुळे रब्बी पिकांची लागवड २०२५ पर्यंत २०% ने कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • या रब्बी पिकांमध्ये मुख्यतः गहू, बार्ली, मोहरी व वाटाणे या पिकांचा समावेश होतो. गहू उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गव्हाची लागवड ही देशामध्ये जवळपास ३०० लाख हेक्टर्स जमिनीवर करण्यात येते.
  • केंद्रीय भूजल महामंडळाकडून आलेल्या आंतरराष्ट्रीय समूहाने हिवाळी लागवड केल्या जाणाऱ्या भागात जाऊन
  • तिथल्या कूपनलिका, विहिरी, कालवे या सिंचनासाठीच्या मुख्य स्रोतांचा अभ्यास केला.
  • त्यांनी केलेल्या अभ्यासातून १३% गावे अशी आढळून आली आहेत की जिथे शेतकरी हिवाळी पिके घेतात पण तिथल्या जमिनींमध्ये भूजल पातळी खालावली आहे.
  • त्या समूहाचं असं म्हणणं आहे की भविष्यात जर येथील भूजल संधारण व्यवस्थित नाही झालं तर या रब्बी पिके घेणाऱ्या जमिनीचा जवळपास ६८% भाग गमावला जाऊ शकतो.
  • उत्तरपश्चिम व मध्य भारतातील या भूजल पातळी कमी झालेल्या भागाला हा फटका बसू शकतो असंही सांगण्यात आलं आहे.
  • कालवा हा पर्याय जलसंधारणासाठी वापरण्यावर विचार केला गेला पण त्याला अडचणी येत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तुषार सिंचन, ठिबक सिंचन अशा पद्धती वापरण्यावरही भर दिला गेला पाहिजे व कमी पाणी लागणारी पिकं घेण्यावर भर दिला गेला पाहज्जे असंही सांगण्यात आलं.
  • देशाच्या पूर्व भागात पाऊस होत असूनही तिथे जलसंधारणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे तेथील शेतकरी नैसर्गिक स्रोतांचा योग्य तो वाप करू शकत नाहीत असंही सांगितलं गेलं आहे.

ऑक्सिजनचा पुरवठा रोखल्यास फासावर चढवू:दिल्ली उच्च न्यायालय.

  • कोरोनाची दुसरी लाट ही सुनामी आहे, तर या काळात रुग्णालयात लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर फासावर चढवू अशी संतप्त प्रतिक्रिया दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे. या दुसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारने काय काय उपाय योजना केल्या याबद्दलची विचारणा ही उच्च न्यायालयाने केल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • दिल्ली सरकारने केंद्र व राज्य व स्थानिक प्रशासनातील एखाद्या व्यक्तीने जर किंवा एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याने जरी अडथळा आणला असेल तर ते निदर्शनास आणून द्यावे. आम्ही त्याला सोडणार नाही.
  • केंद्र सरकारने यासाठी पायाभूत सुविधा, रुग्णालये, वैद्यकीय कर्मचारी, लशी, ऑक्सिजन, पायाभूत सुविधा या पातळीवर काय तयारी केली आहे याचा अहवाल २६ एप्रिल पर्यन्त सादर करावा असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

चार क्रॅयोजेनिक टँक सिंगापुर कडून भारताला मिळाले.

  • कोविड १९ ची गंभीर परिस्थिती उद्भवली असताना प्राणवायूच्या वाहतुकीसाठी आवश्यक असणारे चार क्रॅयोजेनिक कंटेनर भारतीय हवाई दलाने भारतात आणले.
  • हवाई दलाचे अवजड वाहतूक कारणारे विमान सी१७ हे सध्या आवश्यक असणाऱ्या प्राणवायूच्या वितरणाची गती वाढावी म्हणून हवाई मार्गाने रिकामे सिलेंडर्स, क्रॅयोजेनिक कंटेनर्स हे देशातल्या विविध भागातल्या भरणा केंद्रामध्ये पोहोचवत आहे.

वसंतराव गायकवाड यांचे निधन

  • जेष्ठ सनईवादक (वय ८६)
  • त्यांचे आजोबा सनईसम्राट स्व. शंकरराव गायकवाड होते, चुलतबंधू प्रमोद हे ही सनाईवादकच आहेत.
  • महाराष्ट्र शासनाच्या फोटो झिंक प्रेस मध्ये कामाला असताना तत्कालीन राष्ट्रपती शंकारदयाळ शर्मा यांच्या हस्ते गायकवाड यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता.
  • पुणे महापालिकेनेही त्यांचा गौरव केला होता.
  • सनईवर मराठी सुगम संगीत वाजवण्यात त्यांचा हातखंडा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole