चालू घडामोडी – 25 मे 2021

म्युकरमायकोसिसचा (mucormycosis) अधिसूचित आजारांच्या यादीत समावेश

  • म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) रुग्णांचे प्रमाण पाहून आता या आजाराचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत करण्यात आला आहे.
  • म्हणून आता सर्व रुग्णांची माहिती ठेवून टी सरकारला कळवणे हे आता रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने हे आदेश काढले आहेत.
  • म्युकरमायकोसिसचे निदान होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. डोळे, कान, नाक, घसा, मेंदू, दात अशा वेगवेगळ्या अवयवांवर आघात करणारा आजार असल्यामुळे यातली गुंतागुंत आधिक आहे.
  • याच्यासाठी शस्त्रक्रिया व महागड्या औषधोपचारांचा वापर करावा लागत आहे.
  • देशाच्या कानाकोपर्‍यात कोरोना साथीनंतर हे मोठे आव्हान निर्माण आहे.
  • याच्या उपचारासाठी आवश्यक असणारे अ‍ॅम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शनची आता प्रचंड मागणी वाढली आहे. यासाठी सरकारला या रुग्णांची माहिती कळवणे बंधनकारक आहे.

नव्या विषाणू उपप्रकारावर बायोएंटेक अ‍ॅस्ट्राझेनेका (astrazeneca vaccine) प्रभावी

  • भारतात आढळून आलेल्या बी.१.६१७.२ या कोरोनाच्या उपप्रकारावर अ‍ॅस्ट्राझेनेका astrazeneca vaccine व फायजर बायोएंटेक या लशी प्रभावी असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे.
  • पब्लिक हेल्थ इंग्लंड या संस्थेने या बाबतचा अभ्यास केला आहे.
  • या विषाणूच्या उपप्रकारावर फायजरची बायोएंटेक ही ८८% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.हे प्रमाण लक्षणे असलेल्या रुग्णामधील आहे. पण याचा प्रभाव लसीची दुसरी मात्रा घेतल्यावर २ आठवड्यांनी दिसून येतो.
  • तर ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका ची लस ही ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत त्यांच्यासाठी ६०% प्रभावी आहे.
  • या दोन्ही लसींचा परिणाम हा पहिल्या मात्रेनंतर ३३% होतो. म्हणून दुसरी मात्राही योग्य वेळेत घेणे आवश्यक आहे.
  • बी.१.६१७.२ या विषाणू उपप्रकारावरील परिणामांचे विश्लेषण हे १.१.७ या केंटमध्ये आढळलेल्या विषाणूसारखेच आढळून आले आहे.

मुलांमधील कोविडोत्तर गुंतागुंत घातक

  • कोरोना बरे झाल्यावर होणार्‍या म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव चालू असतानाच लहान मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लमेटरी सिंड्रोम’ म्हणजे एमआयएससी हा आजार होताना दिसत आहे.
  • कोविडची साथ शिखरावर असतानाच हा आजार दिसून आला होता. लहान मुलांमध्ये या आजाराच्या संसर्गाची शक्यता जास्त असते.
  • एमआयएससी हा आजार प्राणघातक आहे असं नाही. पण मुलांमध्ये तो उग्र रूप धरण करून हृदय, यकृत, मूत्रपिंड यांना बाधित करतो.
  • कोविड झाल्यावर हा चार ते सहा आठवड्यांनी हा संसर्ग दिसून येतो.
  • कोविड विरोधातील अ‍ॅन्टीजेनला शरीराने निर्माण केलेल्या प्रतिक्रियेमुळे एमआयएससी हा आजार निर्माण होतो. एकदा शरीरात प्रतिपिंड (अ‍ॅन्टीबॉडीज्) तयार झाले की मुलांमध्ये त्यावर अ‍ॅलर्जीसारखी प्रतिक्रिया उमटते.
  • कोरोना साथीचा शिखर काळ संपल्यावर या आजाराचे अजून रुग्ण येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र पोलीस दलाचे एवरेस्टवीर संभाजी गुरव

  • मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असणार्‍या संभाजी गुरव यांनी जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एवरेस्ट सर करून तिथे महाराष्ट्र पोलिस दलाचा झेंडा फडकावला.
  • गुरव हे शिखर सर करणारे महाराष्ट्र पोलिस दलाचे तिसरे कर्मचारी ठरले आहेत.
  • त्यांना पहिल्यापासून गिर्यारोहणाची आवड होती. पोलिसदलात आल्यानंतरही ही त्यांनी टी जोपासली.
  • त्यांनी आधी एवरेस्ट बेसकॅम्पची मोहीम पूर्ण केली होती. नंतर सतत दोन वर्षे सराव करून हे शिखर सर केले.
  • त्यांच्याआधी आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबादमधील पोलिस कर्मचारी रफिक शेख यांनी हे एवरेस्ट सर केले आहे.
  • ८८४८.८६ मीटर उंचीवर असणार्‍या एवरेस्ट वर चढाई करण्यासाठी गुरव यांना खूप अडचणींचा व हिमवृष्टीचा सामना करत करत त्यांनी अखेर एवरेस्ट वीर हा बहुमान मिळवला.

सापांच्या आठ नव्या प्रजातींचा शोध

  • देशाच्या राजधानीत सापांच्या आणखी आठ प्रजाती शोधण्यात संशोधक यशस्वी झाले आहेत. यामुळे दिल्लीत आढळणार्‍या सापांच्या प्रजातींची संख्या आता २३ इतकी झाली आहे.
  • याबद्दलची संशोधनपत्रिका ही रेप्टाईल्स अँड अँफीबियन्स’ या अमेरिकी नियतकालिकात छापली गेली आहे.
  • नानेटी( कॉमन ब्रोंझबॅक ट्री स्नेक), तस्कर (कॉमन ट्रिंकेट स्नेक), मांजर्‍या (कॉमन कॅट स्नेक), कावड्या (बॅरड वुल्फ स्नेक), मण्यार ( कॉमन कुकरी), पट्टेरी मण्यार( स्ट्रिक्ड कुकरी), मांडूळ (कॉमन सॅंड बोआ) आणि फुरसे (सॉ स्केल्ड वायपर) अशी नव्या प्रजातींची नावे आहेत.
  • दिल्ली हे सापांच्या संवर्धनासाठी उपयुक्त व महत्वाचे केंद्र आहे. कारण इथे अरवली पर्वतरांगेचा एक शेवटचा टप्पा विखुरला आहे.
  • दिल्लीतील या संशोधनात २३ प्रजातींच्या ३२९ सापांची नोंद करण्यात आली. ‘फौना ऑफ दिल्ली’ या दिल्लीतील प्राण्यांविषयीच्या माहिती देणार्‍या पुस्तकातील १९९७ ची यादीही या सापांच्या शोधामुळे अद्ययावत करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole