25 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

पाकिस्तान FATF च्या ‘ग्रे यादीत’ कायम

  • FATF म्हणजेच फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने पुन्हा एकदा पाकिस्तानला Grey यादीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्कर सारख्या दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत थांबवण्यात आल्याचे निष्पन्न करण्यात पाकिस्तान कमी पडला असल्याचे समोर आले आहे.
  • बुधवारी झालेली बैठक चीनच्या शिय्यामिन लियू यांच्या अध्यक्षतेखाली झाली असल्याने पाकिस्तानला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली होती पण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवण्याचा आरोप पाकिस्तानवर करत पुन्हा एकदा ग्रे यादीत टाकण्यात आले.
  • मागील बैठकीत पाकिस्तानला २७ पॉईंट अॅक्शन प्लॅनवर काम करण्यास सांगून एप्रिल २०२० पर्यंतची वेळ देण्यात आली होती.

H1 B व्हिसा ट्रम्प प्रशासनाकडून स्थगित

  • अमेरिकेने व्यवसायिक व्हिसा सोबतच तिथे काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हिसा 31 डिसेंबर पर्यंत थांबवले आहेत. यामुळे भारतीय व्यावसायिक आणि IT क्षेत्राला जोरदार धक्का बसला आहे. भारत आणि चीन या H1 B व्हिसाचे सर्वाधिक लाभार्थी होते.
  • H1 B व्हिसा म्हणजे ? हा अस्थलांतरीत व्हिसा असून याच्या मदतीने परदेशी व्यक्तींना अमेरिकी कंपनीत काम करण्याची संधी मिळते. यासाठी अनेक अति पण आहेत. कुशल आणि उच्च तंत्रज्ञान युक्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ जास्त मिळतो.

मधूवंती दांडेकर यांना किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार

  • संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा यंदाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार मधूवंती दांडेकर यांना जाहीर झाला आहे.
  • तर तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार गुलाबबाई संगमनेरकर याना दिला आहे.

संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव

  • महाराष्ट्र सरकारने राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती केली आहे. तर सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
  • संजय कुमार सध्या गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक सोडावा

3 Comments
  1. Vitthal teli says

    Exllence page

  2. Vishal says

    Best

    1. Team Mpsc says

      Thanks Vishal.
      Share with friends also .

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole