25 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

लष्करात महिलांना कायम नियुक्ती

  • भारतीय आर्मी मध्ये महिला अधिकाऱ्यांची स्थायी स्वरूपाची नियुक्ती करण्याबाबत आदेश संरक्षण मंत्रालयाने जरी केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारीत आदेश दिले होते.
  • या आदेशामुळे महिलांवर आता मोठ्या आणि अधिक जबाबदाऱ्या देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिलांना आता पर्मनंट कमिशन, कमांड पद आणि पेन्शन या तिन्हीचा लाभ मिळणार आहे.

रंगकर्मी अविनाश देशमुख यांचे निधन

  • ज्येष्ठ रंगकर्मी आणि सीमांत नाट्यसंस्था प्रमुख अविनाश देशमुख यांचे 72 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • रायगडला जेव्हा जाग येते, ही श्रींची ईच्छा आणि इथे ओशाळला मृत्यू या नाटकांची निर्मिती मध्ये त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या.

आर्थिक नियम 2017

  • राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक नियम 2017 मध्ये बदल केले आहेत. यामुळे ज्या देशांची भारताला लागून सीमा आहे त्या देशाच्या निविदकारांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

चीनचे मंगळयान

  • चीनच्या महत्वाकांक्षी मंगळयानाचे गुरुवारी सकाळी हैनान बेटावरून प्रक्षेपण झाले. यासोबतच मंगळभोवती ऑर्बिटर आणि त्याला ग्रहावर उतरवण्यासाठी एक रोव्हर पण पाठवण्यात आला आहे.
  • चीनच्या या मंगळयानाचे नाव तिआनवेन -1 असे असून त्याचा अर्थ स्वर्गीय सत्याचा शोध अस आहे. गोपनीय पद्धतीने काम करणाऱ्या चीनने रोव्हरचे नाव मात्र जाहीर केलेले नाही.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole