चालू घडामोडी – 25 एप्रिल 2021

‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’

  • कोरोना दुसऱ्या लाटेत बहुतांश राज्यात नव्याने कठोर निर्बंध लागू झाले आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवण्याची घोषणा केली आहे.
  • या योजनेअंतर्गत मे व जून महिन्यांसाठी प्रतिव्यक्ती ५ किलो धान्यसाठा मोफत मिळेल. या योजनेचा देशात ८० कोटी लाभार्थ्यांना लाभ होईल.
  • या योजनेसाठी २६ हजार कोटी ₹ खर्च अपेक्षित आहे.
  • गेल्या वर्षी स्थलांतरीत मजुरांचे तांडे रस्त्यावर उतरले होते, त्यांच्यासाठी गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत ‘गरीब कल्याण अन्न’ योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
  • या योजनेद्वारे ८०.९६ कोटी लोकांना २०० लाख टन धान्यपुरवठा करण्यात आला. त्यासाठी ७५ हजार कोटी खरकब करण्यात आले.

द्वेषमूलक गुन्ह्यांना चाप लावण्यासाठीचं विधेयक मंजूर

  • कोरोनाच्या काळात आशियाई वंशाच्या अमेरिकी नागरिकांवर द्वेषमूलक गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत.
  • या गुन्ह्यांविरोधात तयार केलेल्या विधेयकाला अमेरिकन सिनेटने मंजुरी दिली.आता याच्या विरोधात कायदा करणे शक्य होणार आहे.
  • अमेरिकन सिनेटमध्ये ९४ विरुद्ध १ मतांनी हे विधेयक मंजूर झालं.
  • हे विधेयक मूलतः कोरोना काळातल्या द्वेषमूलक गुन्ह्यांशी निगडीत होतं. पण याची व्याप्ती वाढवण्यात आली.
  • गेल्या वर्षी नोंदवल्या गेलेल्या या द्वेषमूलक गुन्ह्यांची संख्या ३८०० इतकी आहे.

नासाच्या ‘इंजेन्यूइटी’ हेलिकॉप्टरने दुसऱ्यांदा उड्डाण केलं

  • मंगळावर लँड झालेल्या ‘नासाच्या’ ‘इंजेन्यूइटी’ या हेलिकॉप्टरने दुसऱ्यांदा चाचणी उड्डाण केले.
  • पहिल्या उड्डाणापेक्षा हे उड्डाण अधिक उंच आणि दीर्घकाळाचे होते.
  • या हेलिकॉप्टरने ५२ सेकंद उड्डाण करत १६ फूट उंची गाठली, ७ फुटांपर्यंत बाजूच्या दिशेनेही ते गेले. सोमवारी पहिल्या चाचणीच्या वेळी ते १० फूट वर उडाले होते व त्याने ३९ सेकंद इतका वेळ घेतला होता.
  • परग्रहावर उड्डाण करणारे ते पहिलेच हेलिकॉप्टर ठरले आहे.१९०३ मध्ये राईट बंधूनी प्रथम उडवलेल्या विमानाचा एक तुकडा सुद्धा या हेलिकॉप्टर मध्ये घालण्यात आला आहे.
  • हे हेलिकॉप्टर ‘पर्सिव्हरन्स’ या रोव्हरच्या साहाय्याने मंगळावर उतरलेलं आहे.

फाल्कन रॉकेट झेपावले.

  • स्पेसेक्सचं या खाजगी अवकाश संशोधन कंपनीचं फाल्कन हे रॉकेट व कुपी यांच्या सहाय्यानं चार अवकाश वीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानाकाकडे पाठवलं आहे.
  • उद्योगपती एलोन मस्क यांच्या कंपनीकडून एकाच वर्षात झालेले हे तिसरे प्रक्षेपण आहे.
  • या मोहिमेत रॉकेट व ड्रॅगन कुपी यांचा फेर वापर करण्यात आला, या फेरवापरामुळे खर्चात मोठी बचत होणार आहे.
  • या ड्रॅगन कुपीत अमेरिका, जपानव फ्रान्स या देशांचे अंतराळवीर आहेत, २३ तासांचा प्रवास करून ते २४ तारखेला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानाकाकडे पोहोचणार आहेत.
  • गेल्यावर्षी मे मध्ये प्रथमच अवकाशवीरांसह रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. खाजगी कंपनी कडून करण्यात ही पहिलीच अंतराळ संशोधन मोहीम होती.

जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा

  • पोलंडमध्ये सुरू असणाऱ्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी.
  • ५२ देशांतील ४१४ बॉक्सइंगपटूंमध्ये झालेल्या या स्पर्धेत
  • भारताने ८ सुवर्ण व तीन कांस्य पदके मिळवून अव्वल स्थान पटकावले. दुसऱ्या स्थानावर रशिया आहे ज्याला १ सुवर्णपदक मिळाले आहे.
  • गीतिका, बेबीरोजीस्ना चानू, सानमचा चानू, ऑफिया पठाण,पूनम, विंका, अरुंधती चौधरी या महिला खेळाडू तर सचिन हा पुरुष यांनी सुवर्णपदक पटकावले.

कोरोनाचा नवा भारतीय स्ट्रेन

  • महाराष्ट्र व अन्य राज्यांमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेत ब्राझील, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन यांच्याबरोबर बी.१.६१७ या नवीन भारतीय स्ट्रेनची लागण जोरदारपणे झाल्याचं दिसून येत आहे.
  • पुणे येतील बी.जे.मेडिकल कॉलेजमधील संशोधकांनी अकोला व अमरावती येथील नमुन्यांच्या आधारे हा बी.१.६१७ हा भारतीय म्युटंट स्ट्रेन शोधला.
  • या संशोधनादरम्यान निघालेले काही महत्त्वाचे निष्कर्ष की
  • विषाणूमध्ये म्युटेशन होत असतात. देशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे स्ट्रेन आढळतात. जो देश स्ट्रेन शोधतो, त्याला त्या देशाचं नाव दिलं जातं. नव्या स्ट्रेनमुळे प्रसार वाढत नाही, तर प्रसार रोखण्यासाठी घातलेले नियम जर नागरिकांनी तोडले तर प्रसार वाढतो.

डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ (वय ७९)
  • १९७७ मध्ये पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू, विद्यापीठातील, बहुमाध्यम संशोधन केंद्राचे संचालक, संज्ञापन शास्त्र (कम्युनिकेशन सायन्स) विभागाची स्थापना.
  • देशातील १०० विद्यापीठांची निवड करून या विद्यापीठांना इलेक्ट्रॉनिक संशोधन पत्रिकांचा वापर करण्याची मुभा देण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला.
  • नॅशनल असेसमेंट अँड ऍक्रेडीटेशन कौन्सिल (नॅक) चे संस्थापक संचालक होते.
  • देशातील उच्च शिक्षणाचे मूल्यमापन करण्याचे निकष व पद्धती त्यांनी निश्चित केली, त्याप्रमाणे देशातील महाविद्यालये व विद्यापीठांचे मूल्यमापन केले जाते.
  • लोणार सरोवर संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी राज्यसरकार तर्फे त्यांची नेमणूक केली होती. त्यांना शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी विविध पुरस्कार मिळाले होते. गुरू नानकदेव विद्यापीठ, कालिकत विद्यापीठ, नागार्जुन विद्यापीठ यांच्याकडून त्यांना मानद डॉक्टरेट मिळाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole