24 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

▪️ आगामी साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. महामंडळाच्या कार्यालायात उस्मानाबाद येथे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

▪️ वसई येथे जन्म झालेले फ्रान्सिस दिब्रिटो अस्सल मराठमोळे आहेत. मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे ओळखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ नावाच्या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पहिले आहे.

▪️ सुजाण, सजग, पर्यावणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते. १५ व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी पुणे येथे १९९२ मध्ये भूषवले आहे.

▪️ आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा, सृजनाचा मोहोर, तेजाची पाऊले, ओअ‍ॅसिसच्या शोधात, संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची, इस्रायल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास आदी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.


2021 मध्ये जनगणनेसाठी मोबाइल अॅपचा वापर

▪️ आगामी २०२१ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर केला जाणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केलं. कागदी जनगणना बंद करून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे असही ते म्हणाले.

▪️ आगामी २०२१ मध्ये इतिहासात पहिल्यांदाच माहितीचे संकलन डिजिटल पद्धतीने करण्याचा प्रस्ताव असून योग्य त्या चाचण्या घेऊन याची अंमलबजाणी केली जाणार आहे. डिजिटल जनगणनेची प्रक्रिया २ टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात घरांची गणना करण्यात येईल, आणि मग रहिवाशांची गणना पार पडेल.

▪️ जनगणनेची प्रक्रिया रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. डिजिटल जनगणनेमुळे डेटा हस्तांतरित प्रक्रिया सुलभ होऊन अधिक वेगवान, अचूक आणि सखोल होणार आहे.


ऑनलाईन व्यवहारांबाबत RBI चा नवा नियम

▪️ डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या ऊद्देशाने RBI ने ऑनलाईन व्यवहारांबाबत नवा नियम लागू केला आहे. ऑनलाईन व्यवहार करताना खात्यातून पैसे कमी होतात पण व्यवहार पूर्ण होत नाहीत. यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. बँकांच्या मनमानी कारभारावर चाप घालण्यासाठी RBI ने नवा नियम लागू केला आहे.

24 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी, current affairs, Chalu Ghadamodi, mpsc Chalu Ghadamodi, चालू घडामोडी, दिनविशेष, Dinvishesh in marathi, mpsc, mpsc 360, फ्रान्सिस दिब्रिटो, डिजिटल जनगणना, ऑनलाईन व्यवहार, पर्यावरणपूरक निवडणुक, माधव आपटे
Source – Google

▪️ ऑनलाइन व्यवहार अयशस्वी ठरला पण खात्यातून पैसे कमी झाले तर त्या रकमेचा रिफंड मिळेपर्यंत प्रत्येक दिवसाला १०० रु ग्राहकाला मिळणार आहेत. याबाबत सविस्तर पत्रक रिझर्व्ह बँकेनं जारी केलं आहे. ग्राहकांच्या तक्रारीनंतर RBI ने हा निर्णय घेतला आहे. टर्न अराउंड टाइम (टीएटी) संबंधित हा नियम UPI, IMPS, NACH द्वारे किंवा मोबाइल वॉलेटद्वारे पेमेंट केल्यास लागू होणार आहे.

▪️ यासोबतच नॉन-डिजीटल व्यवहारांनाहि वेळेची मर्यादा दिली आहे. ATM मधील अयशस्वी झालेल्या व्यवहारांबाबत तक्रारीचं ५ दिवसात निवारण न झाल्यास प्रत्येक दिवसाला १०० रु ग्राहकाला मिळणार आहेत.


पर्यावरणपूरक निवडणुक

▪️ वृक्षलागवड वाढावी आणि लोकांना पर्यावरणपूरक संदेश जावा या उद्देशाने लातूर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेतला आहे. निवडणूक काळात राजकीय पक्षांनी बैठकीत स्वागतासाठी वृक्ष रोपटे भेट दिली तर त्यांनी रक्कम केवळ एक रुपया लावण्यात येईल.

▪️ क्यू आर कोड बुक संकल्पना : येथील प्रशासनाने क्यू आर कोड बुक ही संकल्पना अमलात आणली आहे. यामुळे मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन होण्यास मदत होणार आहे.


भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन

▪️ भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आणि माजी कसोटीपटू माधव आपटे यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मुंबई संघातून पदार्पण करणाऱ्या आपटेंनी सौराष्ट्रविरूद्ध रणजी सामन्यात शतक ठोकलं होत. त्यांची वेस्ट इंडिजच्या दौऱ्यातली खेळी गाजली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole