चालू घडामोडी – 24 मे 2021

तापमानवाढीमुळे कासवांचे प्रजोत्पादन धोक्यात

  • जागतिक तापमानवाढीमुळे कासवांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होत आहे व भविष्यात नर कासवांची संख्या घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
  • जर कासवांची संख्या घटली तर त्याचा परिणाम समुद्रातील अण्णा साखळीवर होईल.
  • कायद्याने बंदी असूनही पकडून विक्री करण्याच्या गैरप्रकारामुळे कासवांच्या संख्येत घट झाल्याचे पूर्वीचे वास्तव होते.
  • जगात कासवांच्या सात प्रजाती आहेत. पश्चिम किनाऱ्यावर त्यातील चार प्रजाती सापडतात.
  • काही प्रजाती वनस्पती व शैवालाची वाढ मर्यादित ठेवतात. तर काही प्रजाती विषारी प्राण्यांच्या संख्येवर मर्यादा ठेवतात. काही प्रजातींचे अन्न जेलीफिश असतं.
  • जेलीफिश खाणारी कासवं कमी झाली त्यामुळे जेलीफिशची संख्या वाढली. हे जेलीफिश माशांची छोटी पिल्लं खातात, त्यामुळे मच्छीमारांना मासे मिळत नाहीत. अशी अन्न साखळी बिघडत आहे.
  • ओडिशा मधल्या आरिबाडा मध्ये एका महिन्यात ५ ६ लाख कासवं येऊन घरटी करतात, अंडी घालतात. महाराष्ट्रात किनारी भागात २००३०० घरटी होतात.
  • महाराष्ट्रातील वेळास येथे कासवांच्या विणीच्या हंगामात कासव महोत्सवाचं आयोजन केलं जातं. कासवांची पिल्लं बघायला पर्यटक येतात.

विषाणूच्या उपप्रकाराला ‘भारतीय उपप्रकार’ म्हणू नये – माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय

  • नवीन विषाणू उपप्रकाराचा उल्लेख भारतीय विषाणू असा करू नये. कोविड संदर्भात गैरमाहितीचा मुकाबला करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही सूचना देण्यात आली.
  • जागतिक आरोग्य संघटनेने बी.१.६१७ चा उल्लेख भारतीय विषाणू उपप्रकार असा केलेला नाही.
  • तरीही ऑनलाईन त्याचा उल्लेख ‘भारतीय उपप्रकार’ असा केला जात होता.
  • भारतीय विषाणू उपप्रकार हा घातक यव तो जगभर पसरण्याचा धोका आहे अशा स्वरूपाचे मजकूर समाज माध्यंमावर फिरत होते.
  • जिथे बी.१.६१७ ला भारतीय विषाणू उपप्रकार संबोधण्यात आले आहे. तो मजकूर काढून टाकावा. समाजमाध्यमांनी चुकीची माहिती पसरवू नये. हे योग्य नाही.
  • ही सूचना माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने काढलेल्या नोटिशी द्वारे देण्यात आली.

गवताची नवीन प्रजाती सापडली

  • आंबोलीमध्ये गवताच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. आंबोली हा भाग जैवविविधतेने समृद्ध आहे.
  • या प्रजातीला ‘इस्चिमम आंबोलीएन्स’ असं नाव देण्यात आलं आहे व आंबोली घाटाच्या पायथ्याला असणाऱ्या ओढ्यांमध्ये तसेच भातखाचारांमध्ये ही प्रजाती आढळून आली आहे.
  • जगात ‘इस्चिमम’ जातीच्या ८१ वेगवेगळ्या उपजाती आहेत. त्यापैकी ६१ जाती या आपल्या देशात सापडतात. त्यापैकी बहुतेक जाती या फक्त आणि फक्त सह्याद्री डोंगररांगांमध्येच आढळतात.
  • पहिल्यांदाच एखाद्या प्रजातीला आंबोलीचे नाव देण्यात आलं आहे.

सुपर ब्लड मून पाहण्याची संधी

२६ मे ला खग्रास चांद्रग्रहणानंतर आकाशात पूर्वेला सुपर ब्लड मून पाहता येईल.
त्या दिवशी चंद्र ३०% अधिक मोठा दिसेल. व १४% अधिक तेजस्वी दिसेल.
या दिवशी चंद्र सूर्य पृथ्वी हे एकाच रेषेत येत आहेत म्हणून पृथ्वीवरून चंद्र पूर्ण रुपात दिसेल. तेंव्हा चंद्रग्रहण ही होणार आहे.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येणार आहे. तेंव्हा ते अंतर ३,५७,३०९ किमी इतकं असेल.
खग्रास चंद्रग्रहणानंतर चंद्र काळसर लाल रंगाचा दिसतो. त्यामुळे चंद्राची ही अवस्था सुपर ब्लड मून म्हणून ओळखली जाते.

जेष्ठ संगीतकार लक्ष्मण यांचे निधन

  • वय ७९, रामलक्ष्मण या प्रसिद्ध संगीतकार जोडीतील लक्ष्मण यांचे निधन झाले.
  • सुरेंद्र हेंद्रे यांनी राम तर विजय पाटील यांनी लक्ष्मण हे नाव घेऊन मराठी व हिंदी चित्रपटांना संगीत दिलं आहे.
  • मराठी चित्रपटांत दादा कोंडके यांच्या चित्रपटांना दिलेले संगीत खूपच गाजले.
  • या जोडीचा पांडू हवालदार हा पहिला मराठी चित्रपट तर राजश्री फिल्म्स चा ‘ ‘एजंट विनोद’ हा पाहिला हिंदी सिनेमा होता.
  • अंजनीच्या सुता, देवा हो देवा गणपती देवा, गब्बरसिंह यह कह के गया, तुम मिले जाने जा, मैय्या यशोदा, सून बेलिया ही त्यांची गाजलेली गाणी आहेत.
  • एकाच चित्रपटातील सर्वच गाणी गाजणे हा चमत्कार त्यांचे संगीत असणाऱ्या १९९४ मध्ये आलेल्या ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाने केला।
  • १९७६ मध्ये राम यांचे निधन झाले तरीही लक्ष्मण यांनी राम लक्ष्मण याच नावाने संगीत दिलं.
  • हिंदी मध्ये १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैंने प्यार किया’ पासून त्यांची कारकीर्द अधिक बहरत गेली.
  • त्यांनी संगीत दिलेले जवळपास ७५ चित्रपट हे मराठी, हिंदी व भोजपुरी भाषेतील होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole