24 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

ध्रुवस्त्राची यशस्वी चाचणी

  • हेलिकॉप्टरवरून सोडण्याच्या क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी भारताने ओडीसातील बालासोर येथे केली. ही चाचणी यशस्वी झाली असली तरी यात ध्रुवस्त्र प्रत्यक्ष हेलिकॉप्टर मधून सोडण्यात आलेले नाही.
  • हे क्षेपणास्त्र रणगाडा विरोधी असून ते प्रत्यक्षात नाग म्हणजेच हेलिना क्षेपणास्त्र आहे. त्याचे नामकरण ध्रुवस्त्र असे केले आहे.

पुरावा म्हणून उपग्रह नकाशे महाराष्ट्रात उपलब्ध होणार

  • अनुसूचित जाती आणि आदिवासी समुदायाचे जमिनीवरील हक्क सुरक्षित करण्यासाठी आणि जमिनीवरील ठोस ताबा मिळवण्यासाठी उपग्रह नकाशे कौशल्य मोहिमेअंतर्गत उबलब्ध करून देण्यात येणार आहेत.
  • राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी वनाधिकार कायदा 2006 अंतर्गत तीन महिन्याच्या आत नकाशे तयार करून वनजमिनीचा प्रश्न निकाली काढा अस वक्तव्य केले होते.

स्वदेशी अँटीजेन किट

  • स्वदेशी अँटीजेन किट निर्मितीसाठी ICMR ने नुकतेच मायलॅब संस्थेला मान्यता दिली आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीतून तयार होणाऱ्या किटला मान्यता मिळणारी मायलॅब ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

अर्थउभारीसाठी EU चं ७५० अब्ज युरोचं पॅकेज

  • बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये बैठकीदरम्यान तब्बल १ हजार ८०० अब्ज युरोंच्या मदत निधीसाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान, पुढील सात वर्षांसाठी युरोपियन महासंघाच्या देशांच्या मदतीसाठी हे पॅकेज तयार करण्यात आलं आहे. यापैकी ७५० अब्ज युरोंची रक्कम अनुदान आणि कर्जाच्या रूपात देण्यात येणार आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole