चालू घडामोडी – 24 एप्रिल 2021

उजनीच्या बासुंदीला ‘जीआय’ची मागणी

  • गावरान दुधापासून बनवलेली उजनीची बासुंदी राज्यातच नाही देशविदेशात प्रसिद्ध आहे. या चविष्ट पदार्थाची (जीआय) भौगोलिक मानांकनासाठी शिफारस व्हावी अशी उजनी गावातल्या लोकांची मागणी.
  • उजनी गाव लातूरमधील औसा तालुक्यात असून लातूरसोलापूर रस्त्यावर आहे. बासुंदीचे गाव म्हणून प्रसिद्धी
  • गेले ७० ते ८० वर्षे गावरान दुध्यापासून बासुंदी बनवणे हा व्यवसाय केला जातो आहे. पूर्वी २३ जणांनी मिळून सुरू केलेल्या या व्यवसायात ३०३५ जण काम करत आहेत.
  • गावाचं अर्थकारण यांवर अवलंबून आहे, लाखो रुपयाची उलाढाल होत आहे.
  • या बासुंदीला जागतिक ओळख आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘जीआय’ मानांकन मिळणे गरजेचं आहे.

राष्ट्रीय योजना सादर करा

  • देशातल्या कोरोना परिस्थितीची स्वतः दखल सर्वोच्च न्यायालयाने घेऊन ‘प्राणवायू’ अन्य आवश्यक औषधांबाबतची ‘राष्ट्रीय योजना’ सादर करण्याबाबतचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. सरन्यायाधीश बोबडे, न्या. एल.एन.राव, न्या.एस आर भट. यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
  • देशातील विविध सहा उच्च न्यायालये कोरोनाशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी घेत आहेत, एखाद्या गटाला प्राधान्य द्यावे असे एक उच्च न्यायालय म्हणत असता दुसर्याला ते प्राधान्य द्यावे वाटत नाही म्हणून काहीसा संभ्रम निर्माण होत आहे.
  • दिल्लीला पूर्वनियोजनाप्रमाणे प्राणवायू पुरवठा करावा, असे निर्देश केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. या पुरवठ्यासाठी सरकारने असलेले अडथळे दूर करावेत असं न्यायालयाने संगितले आहे.

गुंठेवारी योजनेला मुदतवाढ देण्याच्या निर्णयावरून संभ्रम

  • ऑगस्ट २००१मध्ये राज्य शासनाने गुंठेवारी नियमितीकरण अधिनियम हा कायदा मान्य करून अस्तित्वात आणला होता. यात १ जानेवारी २००१ पूर्वी झालेल्या गुंठेवारी योजनांचा लाभ देण्यात आला होता. २००१ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांसाठी वन टाइम योजना म्हणून आणली होती. सध्या ज्या जमिनी अतिक्रमणाखाली आहेत, (नाविकास क्षेत्र, हरित क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, संरक्षण विभाग क्षेत्र इ.) त्यांना या कायद्याप्रमाणे या योजनांचा लाभ घेता येत नाही.
  • राज्यातील ज्याठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अजूनही नियमीत झालेल्या नाहीत, त्या नियमीत करण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळाने घेतला आहे.
  • पण अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्यासाठी गुंठेवारी योजनेला मुदतवाढ देण्याच्या निर्णयावरून संभ्रम निर्माण झाला आहे. याला मुदतवाढ दिल्यास कायदेशीर पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
  • राज्यातील बरेच क्षेत्र नियमीत असले तरी ज्यांचे नियमितीकरण अजून झाले नाही ते करताना लोकांना विविध अडचणी येत आहेत.
  • तेंव्हा या अंमलबजावणीची तारीख वाढवण्याचा निर्णय ६ जानेवारी २०२१ च्या बैठकीत घेण्यात आला. ३१ डिसेंबर २०२० पर्यन्त जिथे गुंठेवारी आहे, पण नियमितीकरण झाले नाही अशा ठिकाणी या अधिनियम दुरुस्तीचा लाभ घेता येईल.
  • मागच्या सरकारने दंड आकारून अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा आदेश काढला होता. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने ती योजना बारगळली आहे.
  • ही योजना डिसेंबर २०२० पर्यन्त लागू करण्यात आल्यास एमआरटीपी कायद्याला छेद दिला जाणार आहे. आणि पुन्हा तोच प्रश्न उभा राहणार आहे.

राष्ट्रीय सायकलिंग मध्ये आदिती डोंगरेला २ सुवर्ण पदके

  • हैद्राबाद, तेलंगणा मध्ये झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत १६ वर्षाखालील मुलींच्या गटात ‘वैयक्तिक’ व ‘सांघिक स्प्रिंट’ या प्रकारात आदिती डोंगरे हिने २ सुवर्ण पदके पटकावली.

निधन

डॉ. आशा सावदेकर

  • जेष्ठ साहित्यिक व समीक्षक, ‘कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. १९७९ साली त्या अहवालाचे पुस्तक रूपात प्रकाशन करण्यात आले. यानंतर त्यांना समीक्षक म्हणून प्रसिद्धी मिळाली.
  • त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मराठी विभागात विभागप्रमुख म्हणून काम केलं आहे.
  • त्यांच्या ‘पू. भा. भावे: साहित्यवेध (१९८९), भारतीय साहित्याचे शिल्पकार: ना. सी. फडके(१९९५) या चिकित्सक समीक्षा मुशाफिरी (२०००) अशी पुस्तके प्रसिध्द आहेत.

गुलाम दस्तगीर

  • संस्कृत भाषेच्या काश्मीर ते कन्याकुमारी प्रचार व प्रसारासाठी आयुष्य वेचणारे जेष्ठ संस्कृतपंडित, मूळचे चिक्केहळ्ळी ता. अक्कलकोट, जि. सोलापूर.
  • गरिबीतून शिक्षण घेतले, सोलापुरातून संस्कृतरत्नम् होऊन नाशिक मधून विद्यापारंगत, तिरूपतीहून वाचस्पती, वाराणसीतून महापंडित व पंडितेंद्र अशा पदव्या मिळवल्या.
  • पुरस्कार: राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, संस्कृत राष्ट्रपती पुरस्कार, महाराष्ट्र राज्य संस्कृत पंडित पुरस्कार, संस्कृत पांडित्याय राष्ट्रपती पुरस्कार इ.
  • लेखनकार्य: वेदादी शोधबोध, मुस्लिम संस्कृत सेवकाः, विश्वभाषा संपादकीय मौक्तिकानि, मुस्लिमानाम् संस्कृताभ्यासो अन्ये चापि लेखा हे ग्रंथसंपदा. कुराणचे संस्कृत भाषांतर.

श्रवण राठोड

  • जेष्ठ संगीतकार, नदीमश्रवण ही प्रसिद्ध जोडी, नव्वद च्या दशकांत या जोडीने आपल्या संगीताने एक पिढीवर जादू केली आहे.
  • १९७५ पासून हिन्दी चित्रपट संगीत सृष्टीत कार्यरत पण खरी ओळख व लोकप्रियता या जोडीला आशिकी (१९९०) च्या गाण्यांमुळे मिळाली.
  • नदीम व श्रवण यांचं संगीत तर कुमार सानु, अलका याज्ञिक, उदित नारायण यांचा स्वर हे यशस्वी समीकरण होतं.
  • या जोडीला ४ फिल्मफेयर, २ स्टार स्क्रीन तर १ झी सिने व तर राजा (१९९६) यासाठी लंडनचा खास पुरस्कार असे विविध सर्वोत्कृष्ट संगीतदिग्दर्शनाचे पुरस्कार प्राप्त आहेत.

जागतिक पुस्तक दिन

  • यूनेस्को व संबंधित जागतिक संस्था २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतात.
  • विल्यम शेक्सपियर, मिएगुल सर्व्हिंटस, इंका गार्सिलोसो या ख्यातनाम ख्यातनाम व्यक्तींची या दिवशी पुण्यतिथी असते, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
  • लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे, जगभरातील लेखक व पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole