चालू घडामोडी – 23 मे 2021

उच्च न्यायालयांनी व्यवहार्य आदेश द्यावेत – सर्वोच्च न्यायालय

  • कोरोनास्थिती आटोक्यात आणण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाने उ.प्रदेश सरकारला आदेश देताना राज्यातील प्रत्येक गावामध्ये किमान २ रुग्णवाहिका तैनात करण्यात याव्यात. प्रत्येक रुग्णवाहिकेला अतिदक्षता विभागाच्या सुविधा उपलब्ध असाव्यात.
  • राज्यसरकारणे यानावर उत्तर दिले की राज्यात ९७००० गावे असून आटोकाट प्रयत्न करूनही एका महिन्यात करणं शक्य नाही.
  • राज्यातील ५ वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयांपर्यन्त करण्याचे काम ४ महिन्यात करावे, असे आदेश दिले होते. त्यावर राज्यसरकारने इतक्या अल्पकालात हे शक्य नसल्याचे न्यायालयाला संगितले.
  • हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली.
  • तर ज्या आदेशांची अंमलबजावणी करणे शक्य नाही, असे आदेश देणे उच्च न्यायालयाने टाळावे. असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.
  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा आदेश म्हणून न पाहता त्याला सल्ला म्हणून पहिले जावे, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

जहां बीमार वही उपचार – पंतप्रधान मोदी

  • पंतप्रधान मोदींनी कोरोना रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचे आवाहन करतानाच हा ‘ जहां बीमार वही उपचार’ असा नवीन मंत्र दिला.
  • आजारी व्यक्तीपर्यंत उपचार पोहोचवले तर आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल.
  • वाराणसी लोकसभा मतदारसंघातील डॉक्टर व कोरोना आघडीवरेल कर्मचार्‍यांशी पंतप्रधानांनी विडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे संवाद साधला.
  • सर्वांच्या प्रयत्नामुळे कोरोना हल्याचा एका मर्यादेपर्यंत प्रतिकार करणे शक्य झाले. मात्र ही समाधान मानण्याची वेळ नाही. दीर्घकाल लढा द्यायचा आहे. असे आवाहन कोरोना योद्ध्यांना केले. ग्रामीण भागात आता कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिकडे लक्ष केन्द्रित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
  • जेंव्हा संयुक्त राष्ट्रांनी योगसाधनेला मान्यता दिली, व आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या माध्यमातून ही साधना जगभर पोहोचली, तेंव्हा तिची थट्टा करण्यात आली. धार्मिक रंग देण्यात आला. परंतु आज योग आणि आयुष यांनी कोरोंनाशी लढण्यात मदत केली असं पंतप्रधान म्हणाले

भारतीय नौदलाची पहिली विनाशिका INS राजपूत निवृत्त

  • सोव्हिएट रशियन बनावटीची असणारी संहारक युद्धनौका आयएनएस राजपूत भारतीय नौदलातून निवृत्त झाली.
  • ४१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर विशाखापट्टणमच्या बंदरावर तिला निरोप देण्यात आला.
  • सध्याच्या कोविडच्या लाटेमुळे हा निरोप समारंभ अतिशय साध्या व छोट्या प्रमाणावर करण्यात आला.
  • सूर्यास्ताच्यावेळी राष्ट्रीय ध्वज, नौदलाचे निशाण, इशार्‍याचा त्रिकोणी बावटा हे सर्व खाली उतरवण्यात आले.
  • आयएनएस राजपूतने महत्वाच्या युद्धमोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. उदाहरणादाखल श्रीलंकेतील शांतते मोहिमेसाठी भारताच्या शांतीसेनेला मदत केलेली होती.

इस्राइल – पॅलेस्टाईन दरम्यान युद्धबंदी

इस्राइल – पॅलेस्टाईन दरम्यान अखेर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. ११ दिवसांपासून चालू असलेला संघर्ष आता थांबला आहे.
इस्राइल व हमास या पॅलेस्टीनी दहशतवादी संघटनेमध्ये गाझा पट्ट्यात हे युद्ध सुरू झालं होतं.
सततचे रॉकेट व बॉम्ब हल्ले, यांत ठार झालेले नागरिक हा हिंसाचार थांबवण्यासाठी अमेरिका, इजिप्त आणि बाकी मध्यस्तांकडून आलेल्या दबावामुळे इस्राईली संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतला.
जेरुसलेम मधील तिसर्‍या पवित्र अशा अलअक्सा मशिदीमध्ये पॅलेस्टीनी नागरिकांना रमजान महिन्यात प्रवेश देण्यास इस्राईलने आडकाठी केली म्हणून या मुद्द्यावरून हिंसाचार सुरू झाला.
हमास व इस्राईल या दोघांनी या युद्धविरामाला दुजोरा दिला त्याचबरोबर आपलाच विजय झाला असल्याचं दोघा बाजूंनी सांगितलं.

राष्ट्रपती बायडेन यांची वर्णद्वेषी विधेयकावर स्वाक्षरी

  • बायडेन सरकारने आशियाई वर्णद्वेषी विधेयकास मान्यता दिली आहे. व या विधेयकासाठी सर्व सदस्य एकत्र येणं ही अभिमानाची गोष्ट आहे म्हणून राष्ट्रपतींनी कौतुकही केलं.
  • अमेरिकी सिनेटमध्ये ९४ विरुद्ध १ मताने तर प्रतिनिधी गृहामध्ये ३६४ विरुद्ध ६२ मताने हे विधेयक मंजूर झाले आहे.
  • या नव्या कायद्यामुळे वर्णद्वेषी गुन्ह्यांमध्ये तपासाला वेग येणार आहे. स्थानिक पातळीवर काम करणार्‍या तपास यंत्रणाच्या चौकशी प्रक्रियेमध्येही वेग येणार आहे.

जेष्ठ पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

  • वय ९४, जेष्ठ पर्यावरणवादी, गांधीवादी विचारसरणीचे अनुयायी, चिपको आंदोलनामुळे जगप्रसिद्ध झालेले.
  • पर्यावरण संरक्षण हे त्याचे जीवनध्येय होते. हिमालयातील वृक्षसंपदा वाचवण्यासाठी त्यांनी शांततामय संघर्ष सुरू केला.
  • १९७० मध्ये चिपको आंदोलन सुरू केले. त्यामुळे ते हिमालयाचे रक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. २६ मार्च १९७४ रोजी ठेकेदार वृक्षतोड आले तेंव्हा बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला झाडांच्या बुंध्यांना कवटाळून बसल्या. ते अनोखे आंदोलन नंतर देशभर पसरले.
  • बहुगुणा यांनी राजकारणात भाग घेतला होता पण १९५६ नंतर लग्न झाल्यानंतर राजकारणातून संन्यास घेतला. त्यानंतर त्यांनी गावातल्या डोंगराळ भागात आश्रम सुरू केला.
  • सुरूवातीला दारू धंद्यांविरोधात आवाज उठवला. नंतर ते वृक्षसंवर्धनाकडे वळाले.
  • टीहरी धरणाविरोधात जोरदार आंदोलन केले ते ८४ दिवस चालले. या जलाशयात त्यांचे घरही बुडाले. काही काल त्यांना तुरुंगवासही भोगायला लागला होता.
  • ‘इकोलोजी इज परमनंट इकॉनमी’ असं ते नेहमी म्हणत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole