23 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी


शिक्षण संस्थांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जागा वाढविणार

▪️ केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले १० टक्के आरक्षण व राज्य सरकारच्या कायद्यानुसार शैक्षणिक व सामाजिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) अमलात आलेले १२ टक्के आरक्षण यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागा कमी झाल्या आहेत. त्याचा विचार करून राज्यातील सर्वच शिक्षण संस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जागा वाढविण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.

▪️ उच्च न्यायालयाने शिक्षणात १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय दिला. त्यानुसार आता शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी १२ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. त्याचबरोबर केंद्र सरकारनेही सर्वच समाजातील आर्थिकदृष्टय़ा मागास घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

▪️ राज्यात याआधी अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांना ५२ टक्के आरक्षण आहे. त्यानुसार या वर्षी शिक्षण संस्थांमध्ये एकूण आरक्षण ७४ टक्के लागू झाले. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जागा कमी झाल्या. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधील असंतोष आणखी वाढू नये, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आता राज्य सरकारने त्यांच्यासाठी जागा वाढविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती समान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांनी दिली.


वाघांच्या शिकारीत भारत आघाडीवर

▪️ व्याघ्र अवयवांच्या जप्तीच्या एकूण घटनांपैकी सुमारे ४०.५ टक्के घटना या भारतातील आहेत. वन्यप्राणी आणि वनस्पतींवर काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘ट्रॅफिक’ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. दरवर्षी १२४ वाघांच्या शरीराचे अवयव जप्त करण्यात आले. यात भारत (४०.५ टक्के) अग्रस्थानी असून दुसऱ्या क्रमांकावर चीन (११ टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया (१०.५ टक्के) आहे.

▪️ २००० ते २०१८ या १८ वर्षांच्या काळात जगभरातील ३२ देशांतून दोन हजार ३५९ वाघांच्या शरीराचे अवयव जप्त, एक हजार ८६ घटना या १३ आशियाई देशातील आहेत. या तेरा देशात दरवर्षी सरासरी ६० जप्तीच्या घटना नोंदवण्यात आल्या. दरवर्षी सुमारे ५८ वाघांची शिकार त्याच्या कातडीसाठी केली जाते. २०१६ पासून हे प्रमाण अधिक वाढले आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीत सरासरी वार्षिक ४४ टक्क्य़ांपासून ते ७३ टक्क्य़ांपर्यंत हे प्रमाण वाढले आहे. २००८ साली भारतात वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्यात आल्यानंतर वाघ्र अवयवांच्या तस्करीची प्रकरणे उघडकीस आली असून अनेक मोठय़ा तस्करांना अटक करण्यात आली आहे.

▪️ अहवालानुसार ५९१ प्रकरणांत सुमारे एक हजार १६७ आरोपींना अटक करण्यात आली. यातील ३८ टक्क्य़ांपेक्षाही अधिक आरोपी भारतातील आहेत. भारतानंतर इंडोनेशिया आणि चीनचा नंबर आहे. अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींपैकी २५९ आरोपींवर तिन्ही देशात खटला चालवण्यात आला. यातील १७.४ टक्के आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.


आंध्र प्रदेशची राजधानी अन्यत्र हलविण्याचा सरकारचा डाव

▪️ अमरावती हा पुराचा धोका असलेला परिसर असल्याचे दाखवून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकार राज्याची राजधानी अन्यत्र हलविण्याचा कट रचत असल्याचा आरोप तेलुगु देसमने केला आहे. मात्र वायएसआर काँग्रेसने हा आरोप सपशेल फेटाळला आहे.

▪️ राजधानी अन्यत्र हलविण्यात येणार असल्याच्या आरोपाचा वायएसआर काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अंबाती रामबाबू यांनी इन्कार केला आहे. राजधानी अन्यत्र हलविण्याबाबत आम्ही कधीही वक्तव्य केलेले नाही. आमच्या निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही अमरावतीला विरोध केला नाही अथवा मान्यताही दिलेली नाही, असे रामबाबू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

▪️ अमरावती हा पुराचा धोका असलेला परिसर आहे आणि तो पाण्याखाली जाऊ नये यासाठी अनेक कालवे आणि बंधारे बांधावे लागतील, अमरावतीमधील जमिनीचा प्रकार पाहता तेथे बांधकामाचा खर्च नेहमीपेक्षा जास्त असेल आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडेल, असे वक्तव्य मंगळवारी महापालिका प्रशासनमंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.


पी चिदंबरम यांची संपत्ती आणि वाद

  • एफडी आणि त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हेदेखील तब्बल 8.6 कोटी रूपये आहे.
  • त्यांच्याकडे सध्या 175 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे कुटुंबियांकडून घोषित
  • 5 कोटी रूपयांचे कर्ज आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले.
  • कार्ती चिदंबरम यांच्याकडेही 80 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे तर त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न 9.75 कोटी असल्याचं त्यांनी सांगितलं
  • अन्य संस्थांमध्ये 25 कोटी जमा आहेत आणि त्यांच्याकडे पाच लाखांची रोकडही असल्याची माहिती समोर
  • त्यांच्याकडे 13.47 कोटी रुपयांचे शेअर्स, डिबेंचर्स आहेत. तर काही योजनांमध्येही त्यांनी 35 लाखांची गुंतवणूक
  • दहा लाखांच्या विमा, 85 लाखांचे दागिने आणि 27 लाखांच्या गाड्या, ब्रिटनमध्ये 1.5 कोटी, 7 कोटींची शेतजमीन, 45 लाखांच्या व्यवसायिक इमापकी आणि 32 कोटी रूपयांची घरे
  • ईडीने आतापर्यंत त्यांची 54 कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये भारत,स्पेन आणि ब्रिटनमधील संपत्तीचा समावेश आहे. यामध्ये दिल्लीतील बंगला, तामिळनाडूतील शेतजमीन, ब्रिटनमधील कॉटेज आणि घर,चेन्नईच्या बँकेतील एफडी, स्पेनमधील टेनिस क्लबचा समावेश आहे.

4 Comments
  1. Mothiram says

    Iam interest

    1. Team Mpsc says

      Please apply through given link.

  2. Mothiram says

    Iam interest this job

    1. Team Mpsc says

      Please apply through given link.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole