22 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

PUC काढणाऱ्यामध्ये नऊ पट वाढ, नवीन वाहन कायद्याचा प्रभाव

देशभरात एक सप्टेंबरपासून Motor Vehicle Act 2019 लागू करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यास मोठा दंड आकाराला जात आहे त्यामुळे अनेकजण वःतून नियमांचं योग्य आणि काटेकोर पालन करताना दिसत आहेत.

नवीन कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात प्रदूषण नियंत्रण प्रमाण पत्र (PUC) काढणाऱ्या लोकांमध्ये तब्बल ९ पट वाढ झाली आहे.

Source – Loksatta

माहितीनुसार वाहतूक नियमांचा भंग झाल्यामुळेच रस्ते अपघात वाढत आहेत आणि यामुळे दरवर्षी तब्बल दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. अपघातात
मृत्यू होणाऱ्यात सगळ्यात जास्त ६५ टक्के तरुणांनाचे प्रमाण आहे. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहतुकीला शिस्त लावणे या उद्देशाने जुन्या कायद्यात दुरुस्ती करणाऱ्यात आली आहे.


डिसेंबर २०२१ मध्ये भारत अवकाशात माणूस पाठवणार

चंद्रयान २ मिशन मधील महत्वाचा टप्पा विक्रम सॉफ्ट लँडिंग करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आता पुढच्या योजनांवर लक्ष केले आहे.

आयआयटी भुवनेश्वरच्या पदवीदान समारंभात आलेल्या इस्रो प्रमुख सिवन यांनी डिसेंबर २०२० मध्ये भारताची मानवी अवकाश विमान स्पेसमध्ये पाठवण्याची योजना असल्याचे सांगितले.

जुलै २०२१ मध्ये भारतीय बनावटीच्या स्वत:च्या रॉकेटमधून पहिला भारतीय अवकाशात पाठवण्याचे लक्ष्य असून यावर काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


संयुक्त राष्ट्रांना भारताकडून ‘सोलर’ भेट

हवामान बदलाबाबत प्रत्यक्ष कृती करत भारत संयुक्त राष्ट्रांना ५० KW च्या गांधी सोलर पार्कची भेट देणार आहे याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी २४ सप्टेंबर रोजी करणार आहेत.

संयुक्त राष्ट्रांत १९३ देश आहेत, त्येक देशासाठी एक या प्रमाणे १० लाख डॉलर्स किमतीच्या १९३ सौर पट्टिका लावण्यात येणार आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मोदी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातील गांधी सोलर पार्क व गांधी पीस गार्डनचे उद्घाटन करणार आहेत.

काय आहे गांधी पीस गार्डन?

  • हा भारताचा न्यूयॉर्कमधील महावाणिज्य दूतावासाचा उपक्रम आहे यात १५० झाडे लावण्यात आली आहेत.
  • हे स्मृती उद्यान गांधींच्या स्मृतीला समर्पित केले जाईल.
  • या उपक्रमाला शांती फंड व दी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क यांनी मदत मिळाली आहे.
  • या गार्डनमधील झाडे लोक आपल्या प्रियजनांच्या आठवणीनिमित्त दत्तक घेऊ शकतात.
  • संयुक्त राष्ट्रांतील गांधी सोलर पार्कमध्ये तब्बल ५० किलोवॉट वीज निर्मिती होणार आहे.

निवडणुकांच बिगुल वाजलं

निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि हरियाणा विधासभेचा कार्यक्रम जाहीर केला, यानंतर महाराष्ट्र आणि हरियाणातआचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणुकीचा कार्यक्रम ?

  • निवडणुकीची अधिसूचना – २७ सप्टेंबर
  • उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ४ ऑक्टोबर
  • अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर
  • मतदान – २१ ऑक्टोबर
  • मतमोजणी – २४ ऑक्टोबर

3 Comments
  1. Kishor wani says

    Nice

  2. Kishor wani says

    Nice work

    1. Team Mpsc says

      Thanks Kishor wani

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole