चालू घडामोडी – 22 मे 2021

कोरोना निदान आता घरीच

  • भारताला पहिला संपूर्ण स्वदेशी बनावटीचा कोरोना चाचणी संच मिळाला आहे.
  • ‘मायलॅब डिस्कवरी सोल्युशन्स’ ने हा चाचणी संच बनवला असून ‘ कोव्हिसेल्फ’ असं त्याला नाव देण्यात आलं आहे.
  • याला भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था म्हणजेच आयसीएमआर नेही मान्यता दिली आहे.
  • त्यामुळे आता घरच्या घरीच कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे. हे निदान त्वरित होणार असल्यामुळे अहवालाची २ ते ३ दिवस वाट पहाण्याची गरज नाही.
  • डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही स्थानिक औषध दुकानातून किंवा ऑनलाईन पद्धतीने हा संच उपलब्ध होणार आहे.
  • अमेरिकेच्या तुलनेत हा भारतीय संच अत्यल्प किंमतीमध्ये उपल्बध होणार आहे. भारतात या संचाची किंमत २५० ₹ इतकी आहे.
  • संचामध्ये माहितीपत्रक, चाचणीसाठी लागणारे साहित्य, संच वापरून चाचणी कशी करावी यासाठीचे सुचनापत्र दिले जाणार आहे.
  • नाकातील द्रवाचा वापर चाचणीसाठी करावा लागणार आहे. १५ मिनिटांमध्ये रुग्णाचे निदान होईल. प्रत्येक संच मोबाईल ऍप्लिकेशनशी जोडला असेल, त्यामुळे वापरकर्त्याने भरलेली माहिती आयसीएमआरला ही कळेल.

म्युकरमायकोसिस आता साथरोग

  • म्युकारमायकोसिसला आता साथरोग कायदा १८९७ अंतर्गत अधिसूचित करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केली.
  • अनेक राज्यांमध्ये याचे रुग्ण आढळत आहेत त्यामुळे काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे म्हणून केंद्राने हे पाऊल उचललं आहे.
  • कोरोना रुग्ण हे म्युकरमायकोसिसमुळे दीर्घ काळ व्याधीग्रस्त राहणे व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य यंत्रणेपुढे ही नवी लढाई आहे.
  • स्टेरॉइड्सचा अति वापर व रक्तातील अनियंत्रित साखरेची पातळी यामुळं म्युकारमायकोसिसचा संसर्ग होतो.
  • आता याला साथरोग घोषित केल्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयांना केंद्रीय आरोग्य मंत्रालय व आयसीएमआरच्या सूचनांचे पालन करावे लागेल.

हुंडाप्रथा अजूनही थांबेना

  • हुंडा प्रतिबंधक कायद्याला ६० वर्षे होऊन गेली तरीही ही हुंडाप्रथा अजूनही थांबेना. पुरोगामी राज्यात सरासरी २०० हुंडाबळी जात असल्याचं वास्तव आहे.
  • विवाहित महिलांचा जाच कमी व्हावा, या उद्देशातून २२ मे १९६१ रोजी हुंडाबळी कायदा अस्तित्वात आला.
  • यातील कलम तीन नुसार हुंडा देण्याघेण्याबद्दल कमीतकमी ५ वर्षे कारावास व कमीतकमी १५००० ₹ किंवा हुंड्याची रक्कम यातील जी जास्त आहे ती त्याचा दंड अशी तरतूद आहे.
  • या कायद्यामुळे पैसे, दागदागिने या कारणांवरून विवाहित महिलांचे छळ कमी होतील, अशी अपेक्षा होती.
  • पण ६० वर्षे होऊनही परिस्थिती अजूनही बदलली नाही.
  • परंपरेच्या नावाखाली शक्यतो सर्व जातींमध्ये हुंड्याला प्रचंड मान्यता दिसते. सक्षम कायदा व चळवळीचीही गरज आहे.

पुन्हा २५०० कोटी ₹ कर्जरोखे

  • गेला महिनाभरापासून कडक निर्बंध व अंशतः किंवा पूर्णतः टाळेबंदी असल्यामुळे राज्याच्या करउत्पन्नावर परिणाम झाला आहे.
  • त्यासाठी पुन्हा एकदा २५०० कोटी ₹ चा कर्जरोख्यांच्या विक्रीचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.
  • मे महिन्यात तीन टप्प्यांमध्ये १०,५०० कोटी ₹ चा निधी या कर्जरोख्यांच्या माध्यमातून उभारला गेला आहे.
  • भांडवली बाजारात सरकारी कर्जरोखे हे महत्वाचे गुंतवणुकीचे साधन असते.
  • गुंतवणूकदार याआधी अनेकदा सरकारी कर्जरोख्यांकडे पाठ फिरवायचे.मागच्या वर्षी टाळेबंदीनंतर या कर्जरोख्यांना अतिरिक्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
  • औद्योगिक व वित्तीय दृष्ट्या प्रगत असणाऱ्या राज्याची पत वित्तीय बाजारात बाकी राज्यांपेक्षा चांगली असल्यामुळे राज्यासाठी ते एक चांगले साधन आहे.
  • तर १० वर्षे मुदतीच्या १५०० कोटींच्या रोखे विक्रीसह ५०० कोटींची अतिरिक्त रक्कम उपलब्ध करण्याचाही पर्याय असणार आहे.

निधन: सुनील देशपांडे

  • आदिवासींना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सतत झटणारे, मेळघाटातील संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक.
  • अखिल भारतीय कारागीर पंचायतचे राष्ट्रीय संघटक होते.
  • संपूर्ण बांबू केंद्रामधून आदिवासींना बांबू कारागिरी शिकवली. रोजगार मिळवून दिला.
  • मेळघाटातील बांबूच्या वस्तूंना पूर्ण देशात ओळख बनवोन देण्यासाठी प्रयत्न केले.
  • ‘सृष्टीबंध’ या नावाने बांबूंच्या राख्या व अन्य कलावस्तूंना गावागावांत व देशभरात त्यांनी बाजार उपलब्ध करून दिला.
  • २०१८ मध्ये मेळघाटच्या कारागीर भगिनींनी ही तयार केलेली बांबूची राखी दिल्लीला जाऊन बांधली होती.

१० मीटर पर्यंत सूक्ष्म तुषारांचा फैलाव

  • शिंकताना, खोकताना किंवा बोलतानाही तोंडातून उडणारे सूक्ष्म तुषार अगदी १० मी. प्रवास करू शकतात.
  • कोरोनाशी लढण्यासाठी सहज पाळता येणारी जी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत, त्यामध्ये दुहेरी मुखपट्ट्या, सामाजिक अंतर व हवेशीर जागा यांचा समावेश केला आहे.
  • खेळत्या हवेमुळे कोरोना संसर्गाला प्रतिबंध बसू शकतो.
  • दारे,खिडक्या बंद करून एसी चा वापर करू नये.
  • यामुळे खोलीतील हवा बाधित होऊन इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो.
  • ज्या लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत ते ही या विषाणूचा प्रसार करू शकतात.
  • ‘स्टॉप द ट्रान्समिशन, क्रॅश द पॅन्डॅमिक’ या नावाच्या केंद्रीय वैज्ञानिक सल्लागारांनी दिलेल्या सूचनांच्या दस्तऐवजाचे हे नाव देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole