चालू घडामोडी- 21 जून 2021

मिल्खा सिंग यांचे निधन

  • जन्म: २०/११/१९२९,  वय ९१.
  • जन्म ठिकाण गोविंदपुरा, जि. -मुझ्झफरगड सध्या पाकिस्तान,
  • जगप्रसिद्ध अ‍ॅथलॅटिक्सपटू.
  • नोकरी: आर्मी मधून कॅप्टन (ऑनररी) पदावरून निवृत्त
  • फ्लाईंग सीख: १९६० मध्ये लाहोर येथे झालेल्या भारत-पाकिस्तान-इराण स्पर्धेत अब्दुल खालिक ला पराभूत केल्या नंतर पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष जनरल आयुब खान यांनी मिल्खा सिंग यांना ‘फ्लाईंग सीख'( Flying Sikh) हा किताब दिला.
  • कामगिरी: १)राष्ट्रकुल स्पर्धा-१९५८-कार्डिफ-४४०यार्ड्स-सुवर्ण. २)आशियाई स्पर्धा-१९५८-टोकियो-२०० मी-सुवर्ण.४००मी-सुवर्ण. १९६२-जकार्ता-४०० मी-सुवर्ण. ४x४०० रिले-सुवर्ण. ३)राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा-१९५८-२०० मी-सुवर्ण. ४०० मी-सुवर्ण. १९६४-४००मी-रौप्य.
  • १९५९ त्यांना पद्मश्री पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • महाराजा भुपींदर सिंह पंजाब क्रीडा विद्यापीठ, पटियाला येथे मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्या नावाने एक स्वतंत्र अध्यासन सुरू केले जाणार आहे.

लोकसभेतील २९ टक्के महाराष्ट्रातील खासदारांकडून

  • महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार (Member of parliament) सर्वाधिक सक्रिय झाले आहेत.
  • दोन वर्षांपूर्वी निवडून आलेल्या महाराष्ट्रातील खासदारांनी एकूण प्रश्नांपैकी २९% प्रश्न विचारले आहेत.
  • यांत भाजप खासदारांचे प्रमाण ४५% तर शिवसेना खासदारांचे प्रमाण ३७% आहे.
  • २०१९ पासून आजवर पाच अधिवेशने झाली आहेत. त्यात एकूण २३,९७९ प्रश्न विचारण्यात आले. यापैकी ६९४४ प्रश्न हे राज्यातील खासदारांनी विचारले आहेत.
  • सर्वाधिक प्रश्न विचारणारे: सुप्रिया सुळे (बारामती- राष्ट्रवादी)-३१३, डॉ.सुभाष भामरे (धुळे-भाजप)-३०६, डॉ.अमोल कोल्हे (शिरूर-राष्ट्रवादी)-३०६, श्रीरंग बारणे (मावळ-शिवसेना)२९६, गजानन कीर्तिकर (वायव्य मुंबई-शिवसेना)२९०.
  • सर्वात कमी प्रश्न विचारणारे: डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी (सोलापूर- भाजप)-२०, भावना गवळी(यवतमाळ-शिवसेना)२१, नवनीत राणा (गोंदिया-अपक्ष)-२८, डॉ. सुशील मेंढे (भंडारा,गोंदिया- भाजप)-६६…

ब्रिटनमध्ये तिसरी लाट, लसीकरणावर भर

  • कोरोनाच्या अत्यंत संक्रमणशील असलेल्या डेल्टा या उत्परीवर्ततित विषाणूमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट  सध्या सुरू आहे, असे प्रोफेसर अ‍ॅडम फिन यांनी ब्रिटिश सरकारला सल्ला देताना सांगितलं.
  • प्रो. फिन हे लसीकरण व प्रतिरोधनिर्मितीवरील तज्ज्ञ आहेत.
  • ब्रिटन (Britain) हा सध्या लसीकरणाची लक्ष्यपूर्ती करणे व डेल्टा विषाणू (Delta plus) य दोन्ही आव्हानांचा एकाच वेळी सामना करत आहे.
  • कोरोनाचा डेल्टा हा उपप्रकार भारतात पहिल्यांदा आढळून आला होता.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या सर्वेक्षणानुसार इंग्लंड मध्ये ५४० व्यक्तींपैकी १ जण डेल्टा विषाणूमुळे बाधित आहे.
  • पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या म्हणण्यानुसार कोरोनाबधित होण्याची (डेल्टा सह) रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासण्याची शक्यता ७५% कमी होते.

अल्लमट्टी धरणावर रिअल टाईम डेटा यंत्रणा

  • कर्नाटक व महाराष्ट्राने आपापल्या प्रदेशातील पावसाचे प्रमाण पावसाळ्यात जलाशयातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची प्रत्येक क्षणाची माहितीची देवाण घेवाण करण्याचे निश्चित केले आहे.
  • अल्लमट्टी जलाशयाचे व्यवस्थापन करण्यासाठी रिअल टाईम डेटा यंत्रणा (Real time data) बसवणे, उन्हाळ्यात कर्नाटकला महाराष्ट्राकडून चार टीएमसी पाणी देणे. पावसाळ्यात तेवढेच पाणी कर्नाटकने महाराष्ट्राला देणे, दूधगंगा प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करणे हे निर्णय या बैठकीत झाले असं मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सांगितलं.
  • अलमट्टी धरणासाठी तांत्रिक सल्लागार समिती स्थापन करणे.
  • पावसाळ्यात समन्वयाने पूर स्थितीवर नियंत्रण करणे.
  • कर्नाटकातही डायनमिक पद्धतीने रिअल टाईम यंत्रणा तयार करणे.
  • अलमट्टीमधील आवक जावक माहिती तातडीने मिळणार.
  • त्यापुढील नारायणपूर बंधाऱ्यापर्यंतचे नियंत्रण करणे.
  • धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत स्वतंत्र आराखडा तयार करणे.
  • ही अशी सर्व कामे होणार आहेत.

‘जान है तो जहान है’ अभियान

  • राष्ट्रीय स्तरावर राबवलं जाणारं ‘जान है तो जहान है’ हे कोरोना प्रतिबंधक लसींबद्दलचं जागरूकता अभियान २१जून २०२१ रोजी याचं उद्घाटन होणार आहे.
  • खास करून देशातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या जागरूकतेसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.
  • सामाजिक-शैक्षणिक संस्था, खाजगी संस्था, महिला बचत गट यांच्या सहाय्याने अल्पसंख्यांक मंत्रालय हे अभियान राबवणार आहे.
  • या अभियानाचा शुभारंभ हा अल्पसंख्यांक समाज जास्त असणाऱ्या उत्तरप्रदेशातील रामपूर गावात करण्यात येणार आहे.
  • त्यानंतर देशाच्या विविध भागात हे अभियान पोहोचवून राबवलं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole