21 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

चांद्रयान-2 चा महत्त्वाचा टप्पा पार

▪️ चांद्रयान 2 ने मंगळवारी सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे ही एक अवघड प्रक्रिया असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी सांगितले.

▪️ चांद्रयान-2 चा महत्त्वाचा टप्पा पार; आणखी चार टप्पे बाकी. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा झाल्यानतंर ७ सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरनार.

▪️ जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली.

▪️ भारताची ही दुसरी चंद्र मोहिम असून चंद्राच्या दक्षिण भागावरील माहित नसलेल्या गोष्टी शोधून काढण्याचे या मोहिमेचा उद्देश आहे.


झाकिर नाईकला मलेशियात भाषण बंदी

▪️ झाकीर नाईक याने मलेशियातील हिंदू आणि चिनी समुदायाविषयी वांशिक वक्तव्य केली होती. नाईकच्या वक्तव्यावर मलेशियाच्या पंतप्रधानांची नाराजी. त्यामुळे मेलका, जोहोर, सेलंगोर, पेनांग, केदाह, पर्लिस आणि सारवाक या सात राज्यांमध्ये नाईकला भाषण करण्यास बंदी

▪️ रॉयल मलेशिया पोलीस कार्यालयाचे वरिष्ठ सहायक आयुक्त दतुक अस्मावती अहमद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला राष्ट्रीय सुरक्षा आणि वांशिक सौहार्दता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याच अहमद यांनी सांगितले.

▪️ झाकीर हा मुस्लिमबहुल मलेशियाचा कायमस्वरूपी नागरिक आहे. कोटा बारू येथे ३ ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चासत्रामध्ये झाकीर नाईक याने वादग्रस्त वक्तव्य केलं होत.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole