चालू घडामोडी – 21 एप्रिल 2021

१८ वर्षांवरील सर्वांना लस, केंद्र सरकारचा निर्णय

१८ वर्षांवरील सर्वांना लस देऊन आता लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मे २०२१ पासून चालू होत आहे. यासोबतच राज्यांना, विविध आस्थापनांना आणि कंपन्याना थेट लसमात्रा खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.

केंद्राच्या नव्या नियमानुसार लसनिर्मिती कंपनीला मासिक ५० टक्के लशी केंद्रला तर राहिलेल्या ५० टक्के लशी राज्यला आणि खुल्या बाजाराला असतील. राज्यला आणि खुल्या बाजारातील विक्रीसाठी लसनिर्मिर्ती कंपनीला १ मे आधी लशींच्या किंमती करणे आवश्यक आहे.

सरकारी केंद्रावरील लसीकरण चालूच राहणार असून ते मोफत असणार आहे. पण खुल्या बाजारात अति लसीची किंमत काय असेल याबाबत याची व्याप्ती ठरेल.


बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

पुढच्या आठवड्यात नियोजित असणारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आहे. आता जॉन्सन आणि पंतप्रधान मोदी दूरचित्रवाहिनी वरून चर्चा करणार आहेत.

याअगोदर २६ जानेवारीला बोरिस भारत दौऱ्यावर येणार होते पण त्यावेळीही दौरा रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.


मंगळ ग्रहावर नासाच्या हेलिकॉप्टरचं यशस्वी उड्डाण

अंतराळ संशोधन संस्था नासाने अंतराळात पाठवलेल्या हेलिकॉप्टर इन्जेन्युटीनं यशस्वी उड्डाण केले आहे. यामुळे दुसऱ्या ग्रहावरून उड्डाण करणे आणि नियंत्रित करणे शक्य असल्याचे नासाने सांगितले आहे.

काय फायदा ?

मंगळावरील जमीन खरबरीत असल्याने रोवरला मंगळावरील अभ्यास करण्यात अडचणी येत होत्या आता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उड्डाण करून जात येणार आहे त्यामुळे अभ्यासाला गती येऊन अनेक हाय डेफिनेशन फोटो घेणं सोपं होणार आहे.


ग्लोबल टीचर रणजित डेसले यांच्या नावाने इटलीत शिष्यवृत्ती

जगभरात भारताचा डंका वाजवणारे ग्लोबल टीचर रणजित डेसले यांच्या नावाने इटलीत शिष्यवृत्ती दिली जाणारा आहे, असा मान मिळवणारे रणजित डेसले पहिलेच भारतीय शिक्षक आहेत.

कालो मॅझोने – रणजित डेसले शिष्यवृत्ती या नावाने ४०० युरोची हि शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. पुढील १० वर्षे १०० विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole