नोबेल पुरस्कार 2020 | Nobel Prize 2020

नोबेल पुरस्कार (Nobel Prize) स्वडिश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचे वितरण स्वीडनची राजधानी स्टोकहोम येथे 10 डिसेंबरला होते पण शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वितरण नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे करण्यात येते.

एकूण सहा क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता, आणि अर्थशास्त्र यांचा समावेश आहे.

Nobel Prize पुरस्कारांची सुरवात 1901 मध्ये पण अर्थशास्त्र नोबेलची सुरवात 1969 पासून झाली. (घोषणा 1968)

नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही, पण उपवादात्मक दोन व्यक्तींना मरणोत्तर नोबेल मिळाला आहे. डग हमर्सकिजोल्ड आणि इरिक अक्सेल कार्लफेल्डट.

हा पुरस्कार जास्तीतजास्त टीम लोकांच्यात विभागून दिला जातो.

सर्वात कमी वयात मलाला युसूफझईला (17 वर्षे) शांततेसाठी Nobel Prize मिळाला आहे.

महात्मा गांधीजींचे शांततेच्या नोबेल साठी पाच वेळा नामांकन झाले पण नोबेल मिळाला नाही.

आतापर्यंत चार व्यक्तींना दोनदा नोबेल मिळाले आहे.

1. मेरीकुरी – 1903 आणि 1911
2. लिनस पॉलिग – 1954 आणि 1962
3. जॉन बर्डिंग – 1956 आणि 1972
4. फेडरीक संगेर – 1958 आणि 1980

Nobel Prize 2020 पुढील प्रमाणे –

वैद्यकशास्त्र –

अमेरिकी शास्त्रज्ञ हार्वे जे. ऑल्टर, ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हॉटन आणि चार्ल्स एम. राइस याना संयुक्तपणे ‘हेपॅटायटिस सी’ या विषाणूच्या संशोधनाबद्दल यंदाचा नोबेल देण्यात आला आहे.

‘हेपॅटायटिस सी’ हा विषाणू प्रामुख्याने यकृताचा कर्करोग आणि यकृताची सूज या दोन रोगांना कारणीभूत ठरतो. ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या संशोधनामुळे आता ‘हेपॅटायटिस सी’ रोगाचे कारण स्पष्ट होण्यास मदत होऊन त्यावर औषधे विकसित करून जगभरातील लोकांचे प्राण वाचवले जाणार आहेत.

ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या ऐतिहासिक शोधामुळे प्रथमच ‘हेपॅटायटिस सी’मुळे होणाऱ्या यकृताच्या रोगांवर उपचार करणे शक्य झाले आणि लाखो लोकांचे प्राण वाचवता आले. – नोबेल पुरस्कार समिती

भौतिकशास्त्र –

रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज (Roger Penrose, Reinhard Genzel and Andrea Ghez.) अशी या तीन शास्त्रज्ञांची नावे आहेत. या तीनही शास्त्रज्ञांना ११ लाख डॉलर्स आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे.

१. रॉजर पेनरोज – रॉजर यांनी ब्लॅक होल फॉर्मेशन भौतिक शास्त्रातील सामान्य थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडले.
२. रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज – रेनहार्ड आणि एन्ड्रिया यांनी संयुक्तरित्या ब्लॅक होल शोधून काढण्याचं योगदान दिले आहे.

भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कारचा अर्धा भाग रॉजर पेनरोज याना तर उर्वरित अर्धा भाग रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज यांच्यात विभागून देण्यात आला आहे.

रसायनशास्त्र –

रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जेनोम एडिटिंगची कृती क्रिस्पप्र-कॅस 9 च्या विकासावर काम केल्याबद्दल इमॅन्युएल चार्पेंटीयर आणि जेनिफर ए. दौडना यांना संयुक्तपणे देण्यात आले.

साहित्य –

अमेरिकेच्या सर्वात प्रसिद्ध कवी असलेल्या लुईस ग्लूक यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. “तिच्या सौंदर्यामुळे वैयक्तिक अस्तित्व सार्वभौम होतो या तिच्या निर्विवाद काव्याच्या आवाजासाठी.”

अर्थशास्त्र –

लिलावाच्या सिद्धांतातील सुधारणांकरिता आणि नवीन लिलावाच्या स्वरूपाच्या शोधाबद्दल पॉल आर. मिलग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल प्रदान करण्यात आले.

शांतता –

यंदाचा नोबेल पीस पुरस्कार (World Food Program) वर्ल्ड फूड प्रोग्रामला देण्यात आला आहे. जगभरात विनाशकारी परिणाम घडवून आणणाऱ्या कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) ने थैमान घातले असताना साथीच्या जागेत जागतिक भूक वाढीला तोंड देण्याच्या प्रयत्नांसाठी नोबेल पीस पुरस्कार देण्यात आला.


Nobel Prize 2019 पुढील प्रमाणे –

वैद्यकशास्त्र –

विल्यम केलीन (अमेरिका), ग्रेग सेमेझा (अमेरिका), पीटर रॅटक्लिफ (ब्रिटन) याना संयुक्तपणे वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले आहे.

पेशींच्या संवेदना आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार त्यांच्यात होणारे बदल यांच्यावरील संशोधनासाठी पुरस्कार प्रदान.

भौतिकशास्त्र –

जेम्स पीबल्स (अमेरिका-कॅनडा), मायकेल मेयर (स्वित्झर्लंड) आणि डीडीअर क्वेलोज (स्वित्झर्लंड) यांना संयुक्तरित्या नोबेल मिळाले.

विश्वाच्या उत्क्रांती बाबत बिग बँग संशोधनानंतर विश्वरचना विस्ताराने उलगडणारी सैद्धांतिक मांडणी पीबल्स यांनी केली तर मेयर आणि क्वेलोज यांनी 1995 मध्ये सौरमालिकेबाहेरही ग्रह असतात याचा उलगडा केला.

रसायनशास्त्र –

जॉन बी गुडइनफ, एम स्टँली व्हीटिंगहंम आणि अकिरा योशिनो याना यंदाचा हा सन्मान विभागून दिला आहे.

लिथियम आयर्न बॅटरीच्या विकासामध्ये महत्वपुर्ण योगदान दिल्याबद्दल यंदा या तीन संशोधकांना रसायनशास्त्रमधील नोबेल जाहीर झाला आहे.

साहित्य –

पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकरझुक याना 2018 साठीचे साहित्याचे नोबेल जाहीर झाले आहे तर 2019 च्या साहित्य नोबेल साठी ऑस्ट्रियाचे कादंबरीकार आणि नाटककार पीटर हँडकी यांची निवड झाली आहे.

ओल्गा या नोबेल मिळवणाऱ्या पंधराव्या महिला आहेत.

शांतता –

इथोपियाचे पंतप्रधान अबीय अहमद अली याना 2019 चा शांतता नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

इथोपियाचा शेजारी देश इरिट्रीया सोबत असलेला सीमावाद सोडवण्यासाठी निर्णयाक पुढाकार त्यांनी घेतला. त्याबद्दल तीन नोबेल प्रदान करण्यात आला.

नोबेल मिळवणारे ते पहिले इथोपियाचे नागरिक आहेत.

अर्थशास्त्र –

50 लाख भारतीय विद्यार्थ्यांना उपचारात्मक शिक्षण पद्धतीचा लाभ मिळवुन देण्याची पायाभरणी करणारे भारतीय वंशाचे अमेरिकी संशोधक अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्थेर डफ्लो आणि मायकेल क्रेमर याना यंदाचे नोबेल जाहीर करण्यात आले.

एस्थेर डफ्लो या अर्थशास्त्रमधील नोबेलच्या मानकरी ठरलेल्या दुसऱ्याच महिला आणि सर्वात तरुण संशोधक ठरल्या आहेत.

पुरस्कार विजेत्या संशोधकांमुळे गरिबी निर्मूलन क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.


आता पर्यंत नोबेल (Nobel Prize) मिळालेले भारतीय –

आता पर्यंत नोबेल मिळालेले भारतीय, Indians who got nobel prize

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole