Nobel Prize 2020: भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार

जगातील सर्वात मानाचा समजला जाणारा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने (Royal Swedish Academy of Sciences) आज जाहीर केले आहेत. यंदा भौतिक शास्त्रातील नोबेल तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची घोषणा स्वीडनच्या स्टॉकहोम मधून करण्यात आली आहे.

रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज (Roger Penrose, Reinhard Genzel and Andrea Ghez.) अशी या तीन शास्त्रज्ञांची नावे आहेत. या तीनही शास्त्रज्ञांना ११ लाख डॉलर्स आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे.

शास्त्रज्ञ आणि त्यांचं भौतिक शास्त्रातील योगदान –

१. रॉजर पेनरोज – रॉजर यांनी ब्लॅक होल फॉर्मेशन भौतिक शास्त्रातील सामान्य थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडले.
२. रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज – रेनहार्ड आणि एन्ड्रिया यांनी संयुक्तरित्या ब्लॅक होल शोधून काढण्याचं योगदान दिले आहे.

भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कारचा अर्धा भाग रॉजर पेनरोज याना तर उर्वरित अर्धा भाग रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज यांच्यात विभागून देण्यात आला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole