चालू घडामोडी – 20 मे 2021

बिटकॉईनला टक्कर देण्यासाठी, फेसबुक लाँच करणार क्रिप्टोकरन्सी..

  • सोशल मीडिया दिग्गज फेसबुक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये यावर्षी (2021) मध्ये फेसबुक आपली क्रिप्टोकरन्सी लाँच करण्याची तयारी करत आहे.
  • फेसबुकने 2019 मध्ये लिब्रा या नावाने ही क्रिप्टोकरन्सी लॉंच करण्याचे ठरवले होते, परंतु आता त्याचे नाव बदलुन Diem केले आहे. Bitcoin ची किंमत सतत कमी होत असताना फेसबुकने ही घोषणा केली आहे.
  • Diem च्या माध्यमातून, फेसबुकला फिनटेक स्पेसमध्ये क्रांती घडवायची आहे व या क्रिप्टोकरन्सी मधून पैसे ट्रान्सफर करणे फोटो पाठविण्याइतकेच सोपे जाईल.
  • फेसबुक ही क्रिप्टोकरन्सी दोन सेटमध्ये लाँच करू शकते. यापैकी एक मल्टी करन्सी कॉईन असेल आणि दुसर्‍या सेटचे डॉलर आणि युरोमध्ये विशिष्ट फेस व्हॅल्यू असेल.
  • Diem च्या माध्यमातून, मनी ट्रान्सफर वर ट्रान्सफर शुल्क खूप कमी असेल, जेणेकरून मोठ्या संख्येने लोक या करन्सीकडे आकर्षित होतील. फेसबुक त्याच्या डिजिटल चलनातील प्रॉजेक्ट ग्रुप Diem Association च्या सहकार्याने Diem लॉंच करेल.

तौक्ते चक्रीवादळ – Cyclone Tauktea

  • तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील हजारो कुटुंबांना मोठा फटका बसला, हे लोक बेघर झाले. फळबागांचे प्रचंड नुकसान झालं.
  • राज्य सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार सर्वात जास्त फटका सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याला बसला आहे.
  • आंबा, काजू, केळी, नारळ, पोफळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
  • एकूण ८८३० हेक्टर जमिनीवरील शेती व फळबागा यांचं नुकसान झालं आहे.
  • विशेषतः आंबा बागायतदार पूर्णपणे होरपळले गेले आहेत.
  • फळे खराब झाली त्याचबरोबर उत्पन्न देणारी झाडं ही उन्मळून पडली आहेत. अशा दुहेरी संकटामुळे बागायतदारांचे १०० कोटींचं नुकसान झालं आहे.
  • मे च्या दुसऱ्या आठवड्यात शेवटच्या हंगामातील हापूस आंबा काढून मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत पाठवला जातो. बागायतदारांना उत्पन्नाची संधी असते.
  • मात्र शेवटच्या हंगामातील हापूस बाजारपेठेत पाठवण्याच्या काळातच वादळाने तडाखा दिल्यामुळं भरपूर नुकसान झालं आहे.
  • पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादन चांगले आलेच नाही. हंगाम लांबला होता. एप्रिल पासून आंबा बाजारात यायला सुरू झाला होता.
  • आता वादळात झाडावर टिकून राहिलेला आंबा हा फांद्यांना घासून खराब झाला आहे. तो प्रक्रियेसाठी कमी दरात कारखान्यात पाठवावा लागेल. व झाडावरून खाली पडलेला आंबा कॅनिंग च्या योग्यतेचा राहिलेला नाही.

Cyclone Tauktea वादळात पी-३०५ या तराफ्याला दुर्घटना, उच्चस्तरीय समितीच्या चौकशीत होणार खुलासा!

  • तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तीन तराफ्यांसह (बार्ज) एका तेल फलाटावरच्या एकूण ३१७ कर्मचाऱ्यांची नौदल व तटरक्षक दलाने सुटका केली.
  • तरीही अजून ३९० कर्मचारी अडकले आहेत पण त्यातल्या २९७ कर्मचारी सुरक्षित आहेत व उर्वरित बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं.
  • चक्रीवादळामुळे उधाण आलेल्या समुद्रात तीन तराफे व एक तेलफलाट भरकटले.
  • समुद्रात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी किंवा सामान ठेवण्यासाठी तराफे (बार्ज) उभारले जातात. त्याला इंजिन नसते.
  • अन्य जहाजांच्या मदतीने ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले जातात.
  • खोल समुद्रात ते नांगरून ठेवले जातात.

कोरोना विषाणू प्रकारांसाठी नवीन नामकरण पद्धती.

  • जागतिक आरोग्य संघटना कोरोना विषाणू प्रकारांसाठी नवीन नामकरण पद्धती लवकरच विकसित करणार आहे.
  • ही नामकरण पद्धती ज्याप्रमाणे चक्रीवादळांचे नामकरण होते त्याच धरतीवर ही पद्धती असणार आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन् यांनी सांगितलं.
  • सामान्य लोकांना या विषाणू प्रकारांची नावे त्यांच्या क्रमांकावरून लक्षात ठेवणं या पेक्षा ही पद्धत अधिक सोपी ठरेल.
  • आता देशांना त्यांच्या नावाने हे विषाणू ओळखण्यावरून त्यांना कलंकित केल्या सारखे होईल.
  • कारण विषाणूंचे हे प्रकार व संबंधित रोग यांची नावे भौगोलिक स्थानांवरून ठेवली जातात, जिथे त्यांचा पहिल्यांदा उद्रेक झाला आहे. उदा. वेस्ट नाईल व्हायरस म्हणजे इबोला.
  • कोरोनाचे विविध उत्परीवर्तन झालेले प्रकार असेच प्रसिद्ध झाले आहेत.
  • बी.१.१.७ हा यू.के. व्हॅरिएंट तर बी.१.३५१ हा साऊथ आफ्रिकन व्हॅरिएंट तर बी.१.६१७ ला इंडियन व्हॅरिएंट म्हणून ओळखलं जातं.

कोरोना बाबत दिल्ली सरकारच्या मोठ्या घोषणा

  • कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना ₹ ५० हजारांचा मदतनिधी देण्यात येईल.
  • जर मृत हा एकमेव कमावता व्यक्ती होता तर अतिरिक्त २५००₹ / महिना देण्यात येतील.
  • त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले असतील तर त्यांना मोफत शिक्षणाची सोय करण्यात येईल.
  • या विद्यार्थ्यांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत दरमहा २५००₹ देण्यात येतील, असंही सांगण्यात आलं आहे.
  • दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत अन्न धान्य देण्यात येणार आहे. राजधानीतील ७२ लाख रेशनकार्ड धारक लोकांना ५ किग्रॅ धान्य पंतप्रधान योजनेमार्फत तर अन्य ५ किग्रॅ धान्य राज्यसरकार मार्फत देण्यात येईल.
  • ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा लोकांनी जर मागणी केली तर त्यांनाही धान्य देण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस

  • दरवर्षी १८ मे हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेकडून आयोजित केला जातो.
  • आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद ही अशासकीय संघटना आहे.
  • ती १९४६ पासून सुरू झाली. तिचं मुख्यालय फ्रान्सच्या पॅरिस मध्ये आहे.
  • १९७७ मध्ये पाहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस सुरू करण्यात आला.
  • २०१४ पर्यंत १४० देशांतील ३५००० पेक्षा जास्त संग्रहालयांचा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यात सहभाग घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole