19 September 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

केंद्र सरकारची ई-सिगारेटवर बंदी!

आरोग्यासाठी घातक असलेली ई-सिगारेट ओढण्याचे प्रमाण तरुणाई मध्ये वाढत आहे आणि तरुणाई ई-सिगारेटच्या व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे असा दावा करत केंद्र सरकारने बुधवारी देशभरात ई-सिगारेटवर बंदी घातल्याचे जाहीर केले.

या बंदीनुसार ई-सिगारेटचे उत्पादन, जाहिरात, विक्री, साठवणूक आणि आयात-निर्यात हा गुन्हा मानला जाणार आहे. गुन्हा पहिल्यांदा झाल्यास एक लाख रुपये दंड आणि एक वर्षांचा तुरुंगवास तर एकापेक्षा जास्त वेळा घडल्यास पाच लाखांचा दंड आणि तीन वर्षांंचा तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.

19 September 2019 Current Affairs In Marathi, Chalu Ghadamodi, चालू घडामोडी, current affairs, Chalu Ghadamodi, mpsc Chalu Ghadamodi, चालू घडामोडी, दिनविशेष, Dinvishesh in marathi, mpsc, mpsc 360
Source – The Hindu

सध्या दीडशेहून अधिक स्वाद तर २०० पेक्षा जास्त ई-सिगारेट ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत. या सगळ्या ब्रँडच्या ई-सिगारेट आयात केल्या जातात आता यावर सरसकट बंदी असणार आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांनी यावर आधीच बंदी घातली आहे.

जगभरात लोकप्रिय असणारी ई-सिगारेटची जागतिक बाजापेठ २०१३ साली तब्बल तीन अब्ज डॉलरची होती. ‘युरोमॉनिटर इंटरनॅशनल’ या रिसर्च संस्थेनुसार २०३० पर्यंत ई-सिगारेटची जागतिक बाजारपेठ १७ पटींनी वाढण्याची शक्यता आहे.


विक्रम लँडरबद्दल ISRO चं रिपोर्ट कार्ड

चंद्रयान २ च्या मोहिमेमधील महत्वाचा टप्पा विक्रमचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अयशस्वी ठरल्यात जमा आहे. यानंतर विक्रमाचे सॉफ्ट लँडिंग का झाले नाही ? हार्ड लँडिंग होण्याची कारणे काय ? अश्या विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी इस्रोने अंतर्गत समिती स्थापन केली आहे.

या समितीचे काम चालू झाले असून अनेक बैठका झाल्या आहेत. रिपोर्ट कार्ड शेवटच्या टप्प्यात असून दोनच दिवसात याचा आवाहल सादर करण्यात येईल असे इस्रोने सांगितले आहे. तसेच नवीन कोणतीही माहिती मिळण्यास वेबसाईट वर सांगण्यात येईल असेही नमूद केले आहे.


देशभरात 2 ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंदी

पंतप्रधान मोदींनी केलेल्या प्लास्टिक बंदीच्या आवाहन चांगला प्रतिसाद येत असून सरकार २ ऑक्टोबर पूर्वीच प्लास्टिक बंदी करण्याच्या विचारात आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या आधी प्लास्टिक बॅग, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकॉल यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे.

याबाबत मार्गदर्शक माहिती केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवली आहे.

याअगोदर पर्यावरण मंत्रालयाने सरकारी कार्यालये, खासगी आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये प्लास्टिकची फुले बॅनर्स, प्लास्टिकचे झेंडे, फुलांचे पॉट्स, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू यांचा वापर न करण्याबाबत सप्टेंबर महिन्यात मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.

एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक वस्तू

  • प्लास्टिकची कटलरी, प्लास्टिकच्या बॅग, कप, चमचे, ताटं, थर्माकॉल, प्लस्टीची फुलं, बॅनर, झेंडे, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, आणि प्लास्टिकच्या स्टेशनरी वस्तू इत्यादींचा समावेश एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिक वस्तू मध्ये होतो.

युरोपियन युनियनचा भारताला पाठिंबा.

युरोपियन संसदेत ११ वर्षात प्रथमच काश्मीर मुद्यावर चर्चा झाली, यावेळी बहुतांश देशांनी भारताची बाजू उचलून धरली तर पाकिस्तानपासून कसा धोका आहे हे सांगण्याचा प्रयत्न केले. अनेक देशांनी पाक दहशतवादाला पुरस्कृत करतो असेही म्हंटले आहे.

काश्मीर मुद्यावर दोन्ही देशांनी थेट चर्चा करायला हवी. आणि यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा असे युरोपियन युनियने म्हंटले आहे. सोबतच काश्मीर मुद्यावर कोणी तिसऱ्याने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला अनेक वर्षांपासून दहशतवादाचा सामना करावा लागला आहे आणि काश्मीर मध्ये हे दहशतवादि चंद्रावरून येत नाहीत तर शेजारच्या देशातून येत आहेत. आपण भारताला पाठबळ द्यायला हवे असे पोलंडच्या रिजार्ड जारनेकी यांनी सांगितले.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole