चालू घडामोडी – 19 मे 2021

त्रिपोजोदिम विरिदुर्बीअम प्रजातीचा कोळी

  • मेळघाटामध्ये त्रिपोजोदिम विरिदुर्बीअम या प्रजातीचा जगातील पहिला नर आढळून आला आहे.
  • अमरावतीमधील दर्यापूर मध्ये कोळी संशोधन केंद्र आहे. आतापर्यंत या प्रयोगशाळेत १७ नवीन कोळी प्रजातींचा शोध लागला आहे.
  • या जातीच्या पहिल्या मादीची नोंद २०१६ मध्ये पालजजवळील अरण्य पार्क, गांधीनगर गुजरात मध्ये करण्यात आली होती.
  • मेळघाट मध्ये कोळ्याच्या एकूण २०४ प्रजातींची नोंद झालेली आहे.
  • वरील प्रजातीचा कोळी हा निशाचर असतो. तो आकाराने छोटा असल्याने त्याला ओळखणे कठीण आहे.
  • नराची लांबी ३.६ मिमी तर मादीची लांबी ४.१ मिमी इतकी असते.

कोरोना संशोधन (Covid Research) गटाच्या प्रमुखाचा राजीनामा

  • जनुकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी केंद्रातर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘इन्साकॉग’ या गटाच्या प्रमुखपदाचा प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहिद जामील यांनी राजीनामा दिला.
  • याबद्दल डॉ. जमील यांनी कोणतेच कारण दिलेले नाही.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ मध्ये डॉ. जमील यांनी लेख लिहिला होता.
  • कोरोना रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजनांना शास्त्रज्ञांचा पाठिंबा आहे.
  • मात्र पुराव्यावर आधारित धोरण तयार करताना त्यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे.
  • कोरोनाबाबत पुढील अभ्यास, संशोधन, भाकीते करता येतील अशी माहिती व तपशील उपलब्ध करून देण्याचे आवाहन ८०० भारतीय शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांना आवाहन केले होते, असं ही जमील यांनी सांगितलं.
  • सरकारच्या कोरोना हाताळणीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
  • व याच नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं आहे.

व्हॉट्सऍपचे धोरण ( WhatsApp Policy) कायद्याशी सुसंगत नाही

  • व्हॉट्सऍपचे नवीन व्यक्तीगतता धोरण हे भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचे पालन करणारे नाही.
  • त्यामुळे या धोरणाबाबतची स्थिती स्पष्ट करण्याबाबत व्हॉट्सऍपला आदेश देण्यात यावेत, असं केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं.
  • १५ मे पासून हे धोरण अंमलात येणार आहे. ते लांबणीवर टाकण्यात आलेले नाही.
  • या धोरणाला आव्हान देणाऱ्या बऱ्याच याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
  • यांवर व्हॉट्सऍपने न्यायालयात सांगितलं की हे धोरण जरी अंमलात येणार असेल आणि जे लोक हे स्वीकारणार नाहीत त्यांची खाती काढून टाकली जाणार नाहीत.
  • त्यांना ते धोरण स्वीकारण्यास प्रवृत्त केले जाईल. व्हॉट्सऍप खाती कधी काढून टाकली जातील हे अज्जन ठरलेलं नाही.
  • त्यासाठी एक विशिष्ठ कालावधी दिला जाईल, व त्यानंतर ही खाती रद्द केली जातील.

डीआरडीओ चं 2 डीजी बाजारात (DRDO 2DG)

  • २ डीऑक्सि डी ग्लुकोज हे डीआरडीओने विकसित केलेले कोविड उपचारात सहाय्यक असणारे औषध आता बाजारात उपलब्ध जाळे आहे.
  • डीआरडीओ ने हे औषध डॉ. रेड्डीज् लॅब च्या सहाय्याने तयार केले आहे.
  • यांमध्ये डीआरडीओ सोबत इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लीअर मेडीसीन्स अँड ऍलाईड सायन्सेस या संस्थेचा महत्वाचा वाटा आहे.
  • देशांतील सर्व रुग्णालयांना हे औषध उपलब्ध करण्यासाठी रेड्डीज् लॅब यांचं उत्पादन वाढवणार आहे.
  • या औषधामुळे रुग्णाचे कृत्रिम ऑक्सिजन अवलंबित्व ४०% ने घटते.
  • २ डीजी हे भारताने स्वदेशी बनवटीचे तयार केलेले पहिलेच औषध आहे.

अँड्रिया मेझा विश्वसुंदरी

  • विश्वसुंदरी २०२० होण्याचा बहुमान मेक्सिकोच्या अँड्रिया मेझा हिला मिळाला आहे.
  • ब्राझीलची ज्युलिया गामा ही उपविजेती ठरली व पेरूची जॅनिक मॅसेटा ही तिसऱ्या क्रमांकावर तर भारताची ऍडलाईन कॅस्टीलिनो ही चौथ्या क्रमांकावर राहिली.
  • ऍडलाईन कॅस्टीलिनो ही मिस इंडिया राहिली आहे.
  • कोरोना साथीमुळे ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole