चालू घडामोडी- 19 जून 2021

सीबीएसई चा निकाल ३१ जुलै पर्यंत, निकालाचे सूत्र तयार

  • बारावीचा निकाल जाहीर करताना ३०:३०:४० हे सूत्र जाहीर करण्यात आले आहे.
  • त्यानुसार दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळालेल्या तीन विषयांच्या गुणांच्या आधारे ३०% गुण देण्यात येतील.
  • अकरावीच्या अंतिम परीक्षेच्या आधारे ३० % गुण देण्यात येतील.
  • तर बारावीच्या वर्षात शाळांनी घेतलेल्या चाचण्या, सराव परीक्षा, सत्र परीक्षा यांच्या आधारे ४०% गुण देण्यात येणार आहेत.

स्विस बँकेतील भारतीयांच्या निधीत तिपटीने वा

  • १३ वर्षातील उच्चांकी पातळी
  • १७ जून २०२१ ला स्वित्झर्लंड च्या मध्यवर्ती बँकेकडून जाहीर झालेल्या वार्षिक आकडेवारीमधून ही माहिती समोर आली.
  • भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकेत थेट तसेच भारतातील शाखा व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गुंतलेला निधी २०२० अखेर पर्यंत २.५५ अब्ज स्विस फ्रँक म्हणजे २०,७०० कोटी ₹ पेक्षा जास्त आहे.
  • दोन वर्षांच्या प्रवाहाच्या घसरणीच्या प्रवाहाच्या विपरीत २०२० मधील भारतीयांच्या स्विस बँकेतील एकूण निधीने मागील १३ वर्षांतील उच्चतम स्तर गाठला आहे.
  • २०१९ च्या अखेरीस ८९.९ कोटी स्विस फ्रँक (६६२५ कोटी ₹) असणाऱ्या निधीत गेल्या वर्षभरात तिपटीने वाढ झाली आहे.
  • २००६ मध्ये भारतीय निधीने ६.५ अब्ज स्विस फ्रँक अशी विक्रमी पातळी गाठली होती. पण नंतर त्या निधीचा आलेख बराच उतरता होता.
  • रोखे अथवा तत्सम साधनांद्वारे भारातीयांच्या गुंतवणुकीत वाढ झाली असली तरी ठेवींच्या रूपातील भारतीयांचा पैसा मात्र कमी होत आहे.

कुलभूषण जाधव प्रकरण

  • गेल्या आठवड्यात पाकिस्तानने माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना दाद मागण्याचा अधिकार देणारे विधेयक पाकिस्तानी संसदेत मांडण्यात आले, यांतील त्रुटी दूर कराव्यात असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निवाड्यानुसार जाधव यांना भारतीय राजदूतांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली होती पण तशी संधी देण्यात आली नाही, हे कृत्य कोणत्या पूर्वग्रहदूषित वृत्तीने केले आहे का? हे ठरवण्यासाठी स्थानिक न्यायालयाची मदत घेण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे.
  • त्रुटी दूर करण्यासाठी योग्य ती पाऊले पाकिस्तानने उचलली आहेत का हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार स्थानिक न्यायालय ठरवू शकत नाही.
  • त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचे पालन करावे असे पाकिस्तान ला सांगितले आहे.

कासवांच्या पिल्लांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

  • टाळेबंदीमुळे कमी झालेला मानवी हस्तक्षेप, किनारी भागातील पर्यटकांची घटलेली संख्या, मागील काही वर्षांपासून होत असलेली जनजागृती, यांमुळे यंदा समुद्री कासवांच्या संख्येत वाढ झाली आहे.
  • कांदळवन प्रतिष्ठान ने संरक्षित नैसर्गिक अधिवासात जन्माला आलेल्या पिल्लांची संख्या २०२०-२१ या वर्षात २३,७०६ इतकी आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी ही संख्या दुपट्ट आहे.
  • रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यावर पाहणीतून ही बाब समोर आली आहे.
  • पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन सी, हॉक्सबिल, लेदरबॅक या समुद्री कासवांच्या प्रजाती महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर वाहून येतात. यातील बरीच कासवे वाहून येताना आजारी किंवा जखमी होतात.
  • त्यांच्यासाठी वनखात्याने वाइल्ड लाईफ कॉन्सर्वेशन व ऍनिमल वेल्फेअर अससोसिएशन च्या सहाय्याने डहाणू येथे उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू केलं आहे.
  • वनखात्याचा कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठानच्या वतीने ऐरोली येथेही एक उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.
  • जगातील सात कासवांच्या प्रजातींपैकी चार प्रजातींची कासवे भारतीय भूखंडावर व अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटांवर घरटी केल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र केवळ ऑलिव्ह रिडल प्रजातीची कासवेच महाराष्ट्र्रात घरटी बनवतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole