चालू घडामोडी – 19 December 2020

भारत जल प्रभाव शिखर संमेलन २०२०

  • नुकतेच पाचवे भारत जल प्रभाव शिखर संमेलन २०२० आभासी पद्धतीने पार पडले.
  • राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान व गंगा नदी खोरे व्यवस्थापन केंद्र यांच्यावतीने हे शिखर संमेलन आयोजित करण्यात आले होते.
  • या पाच दिवसीय शिखर संमेलनामध्ये जगभरातील शिक्षण तज्ज्ञ व अन्य तज्ज्ञ लोकांनी यांत सहभाग घेतला होता.
  • जल संधारण, जल सुरक्षा व नदी पुनरुज्जीवन या विषयांवरील समस्या वर चर्चा करण्यात आली.
  • याची संकल्पना अशी होती की स्थानीय नद्यांचे व अन्य जलचरांचे समग्र व्यवस्थापन व व्यापक विश्लेषण केले गेले आहे.
  • नॉर्वेच्या जैव अर्थव्यवस्था व गंगा नदी खोरे व्यवस्थापन केंद्र यांनी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे की ज्याद्वारे गाळाचं व्यवस्थापन करण्याची रचना याबद्दल सांगण्यात येईल.

सीसीटीएनएस प्रणाली देशात प्रथम क्रमांक

  • पोलीस तपासात मदतीसाठी सुरू केलेल्या क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम (सीसीटीएनएस) वापरासाठी महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले
  • नॅशनल रेकॉर्ड क्राईम ब्युरो (एनसीआरबी), दिल्ली यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात आले.
  • पोलीस तपासात गुन्हे उघडकीस आणण्यास आयसीजेएस व सीसीटीएनएस या प्रणाली उपयोगाला येतात.
  • देशात सर्वाधिक या कार्यप्रणालीचा उपयोग हा महाराष्ट्रात केला जातो हे दिसून आले. ४ वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा ही प्रणाली वापरण्यास सुरुवात केली.
  • राज्य गुन्हे अन्वेषण विभाग(सीआयडी) सर्वाधिक वापरतो.

हिमालयातील सीरो नावाची प्रजाती

  • हिमालयीन भागात सीरो नावाच्या प्रजातीचा प्राणी पाहण्यात आला आहे.
  • हिमालयीन सीरो किंवा कॅप्रिकॉर्निस सुमात्राअँसिस थार
  • असं शास्त्रीय नाव आहे.
  • हा प्राणी शेळी, गाढव, गाय व डुक्कर यांचं संकर असल्याप्रमाणे वाटतो.
  • हा प्राणी हिमालयाच्या शीत वाळवंटात स्पिती, हिमाचल प्रदेश मध्ये आढळून आला.
  • आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या (आययूसीएन) मार्फत या प्राण्याला असुरक्षित शिक्का मारण्यात आला आहे.
  • वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार जी सूची तयार केली आहे त्यात याचा समावेश करण्यात आला आहे.

जेष्ठ अंतराळ वैज्ञानिक प्रा. नरसिंह यांचे निधन

  • प्रा.रोद्दम नरसिंह यांचे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने निधन झाले.
  • त्यांनी भारतीय विज्ञान संस्थेत १९६२१९९९ या कालावधीत अंतराळ अभियांत्रिकी या विषयाचे शिक्षण दिले.
  • १९८४ १९९३ या कालावधीत ते राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळेचे संचालक होते.
  • माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या समवेत त्यांनी ‘डेव्हलपमेंट्स इन् फ्लुईड मेकॅनिक्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी’ या पुस्तकाचे लेखन केले आहे.

  • त्रिपक्षीय कामकाज समूहाची बैठक

भारत, इराण व उझबेकिस्तान या त्रिपक्षीय कामकाज समूहाची पहिली वाहिली बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान इराणमधील चाबहार बंदराचा सामाईक उपयोग करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
चाबहार बंदर हे व्यापार व वस्तूंचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे म्हणजे पारगमन व स्थानिक यंत्रणेशी जोडले जाण्यासाठी ही बैठक झाली.
भारताने आंतरराष्ट्रीय सागरीय शिखर संमेलन २०२१ च्या आयोजनाच्या बरोबरीनेच चाबहार दिवस साजरा करण्याचाही प्रस्ताव मांडला व बाकीच्यांनी ही तो मान्य केला.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole