चालू घडामोडी – 18 मे 2021

महागाईचा भडका! घाऊक बाजारातील महागाई दर 10.49 टक्क्यांवर

  • केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक किंमतीची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर डोकेदुखी वाढवणारा आहे. मार्च मध्ये 7.39% असणारा महागाई दर एप्रिलमध्ये हा 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे.

तौक्ते अतितीव्र चक्रीवादळ

  • अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते या चक्रीवादळाने अतितीव्र स्वरूप धारण केले आहे.
  • वेगवान होऊन ते गुजरात किनारपट्टीला धडकले आहे.
  • याचा केरळ, कर्नाटक, गोवा, प.महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह सह कोकण किनारपट्टी ला तडाखा बसला.
  • रविवारी याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. समुद्रामध्ये ताशी १७० किमीने वारे वाहत होते.
  • किनारी भागातील जनजीवन विस्कळीत झाले व मालमत्तेचे खूप नुकसान झाले आहे.
  • मुंबई व उपनगर भागातील कोरोना रुग्णांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले.

इस्राईलची पुन्हा मोठी कारवाई

  • इस्राईलने गझपट्टीमध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात ४२ जण ठार व तीन इमरती जमीनदोस्त झाल्या.
  • हमासच्या प्रमुख नेत्याच्या घरावर इस्राईली सैन्याने हल्ला केला. हमासने केलेल्या हल्ल्याला इस्राईल कडून दिलेले हे प्रत्युत्तर आहे. हमास आयसिसच्या ताब्यातील जमिनीवरून इस्राईलवर हल्ले करत आहे.
  • हमास व अन्य दहशतवादी गटांनी इस्राईल वर २००० अग्निबाणांचा मारा केला.
  • इस्राईलने हमासचे प्रमुख नेते येहीय सिनवर यांच्या घरावर हल्ला केला. दक्षिण गाझा मधील खान युनूस शहरात हे रहात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • हमासच्या राजकीय शाखेचा प्रमुख नेता खालील अल् हयेह याच्या घरावरही हल्ला केला आहे. याच्याच घरातून दहशतवाद्यांना रसद पुरवठा होत होता.
  • २०१४च्या गाझा युद्धानंतर हे सर्वात मोठे युद्ध आहे. यांत आतापर्यंत जवळपास १५० पॅलेस्टिनी व आठ इस्राईली नागरिक मारले गेले आहेत.

इस्लामिक जगताची भळभळती जखम

  • इस्राईल व हमास यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ५७ सदस्य राष्ट्रांच्या मुस्लिम सहकार्य संघटनेची (ओआयसी) ची बैठक पार पडली.
  • या समस्येवर तोडगा कसा काढावा? यासाठी पश्चिम आशियातील देशांनी केलेली पहिली मोठी कृती आहे.
  • पॅलेस्टिनी लोकांचे स्वतःचे असे स्वतंत्र राष्ट्र हवे, अशी भूमिका अरब लीग व ओआयसी सारख्या संघटनांनी घेतली असताना इस्राईलने या संघटनेच्या सदस्यांकडून स्वतःसाठी मान्यता मिळवून घेतली.
  • पॅलेस्टिनी लोकांची ही वाईट अवस्था ही इस्लामिक जगतासाठी एक भळभळती जखम आहे, असं अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं.
  • इस्राईलकडून होणाऱ्या हल्ल्यांबद्दल तीव्र शब्दांत निंदा केली जात आहे. जेरुसलेम, पश्चिम किनारा व गाझा इथे चिघळल्या गेलेल्या परिस्थितीला इस्राईललाच जबाबदार ठरवण्यात आले.

कोरोना कृतीदालाचे ‘माझा डॉक्टरांना’ मार्गदर्शन

  • लक्षणांनुसार रुग्णांचे वर्गीकरण झाल्यास वेळेत योग्य उपचार करणे शक्य होईल.
  • अनाठायी, अनावश्यक उपचार करू नका. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांवरही लक्ष ठेवा, असा सल्ला ‘माझा डॉक्टर’ या उपक्रमात सहभागी डॉक्टरांना कृतीदलाच्या तज्ज्ञांनी दिला.
  • गृहविलगीकरणातील रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांनी नियमित फोन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधावा. दुसऱ्या आठवड्यात त्यांच्यावर जास्त देखरेख ठेवणं गरजेचं आहे.
  • गृहविलगीकरणातील रुग्णांवर स्टिरॉइड्सचा वापर करू नये. हायड्रोक्सयक्लोरोक्वीन व रक्तद्रव उपचार करू नये.
  • कोरोनातून बऱ्या झालेल्या व साखरेची अनियंत्रित पातळी असणाऱ्या रुग्णांमध्ये म्युकेरमायकोसिसचा धोका अधिक असून त्याचे वेळेत निदान होणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया व औषधे दिल्यास १००% हा आजार बरा होतो.
  • प्राणवायू देण्यासाठी रुग्णाला लावण्यात आलेल्या नळ्या व पाणी यांमधूनही संसर्ग होऊ शकतो,म्हणून निर्जंतुकीकरण करूनच याचा वापर करावा.

निधन: राजीव सातव

  • वय ४६. राज्यसभा खासदार, व काँग्रेसचे राष्ट्रीय राजकारणातील अभ्यासू नेते.
  • हिंगोलीच्या कळमनोरी तालुक्यातील मसोड पंचायत समितीमधून २००२ मध्ये पहिल्यांदा निवड.
  • युवक काँग्रेसच्या बांधणीच्या निमित्ताने दिल्लीत वाढता वावर, संघटनात्मक बांधणीत राहुल गांधींच्या जवळचा नेता अशी ओळख.
  • पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी एकेक पायरी चढत ते खासदार झाले.
  • खरवडमधून निवडून आल्यावर २००७ मध्ये कृषी समिती सभापतीपद. शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात त्यांनी केली.
  • २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार. गोळेगाव, औंढानागनाथमध्ये कृषी विद्यापीठ उभारणीच्या कामात पुढाकार घेतला.
  • डॉ. मानमोहन सिंग यांच्या कार्यकाळात हिंगोलीमध्ये लागो इंडियाचा गुरुत्वीय लहरींबाबतच प्रकल्प हाती घ्यावा यासाठी खूप प्रयत्न केले.
  • गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून नेमणूक.
  • २०२० मध्ये राज्यसभा खासदार म्हणून निवड.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole