18 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

भारत चीन संघर्ष

  • मागील पाच आठवड्यापासून चालू असलेल्या भारत आणि चीन संघर्ष उफाळून आला आहे. तब्बल 45 वर्षानंतर भारत चीन सीमेवर चकमक होऊन दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले आहेत.
  • पॅनगॅंग तळे, गलवाण खोरे, देंमचोक ही भारत आणि चीन संघर्षाची केंद्रे बनली आहेत. हा वाद लष्करी बोलनीतून सुटावा म्हणून अनेक दिवसांपासून प्रयत्न चालू होते.

स्रोत – सकाळ


सामन्यांमध्ये करोना संसर्ग अत्यल्प, सिरो सर्वेचा निष्कर्ष

  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे गेल्या महिन्यात भारतातील 83 जिल्ह्यातील लोकांचा सिरो सर्वे करण्यात आला होता. राज्यातील सामन्यांमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला हे जाणून घेण्याकरिता हा सर्वे करण्यात आला.
  • यामध्ये रँडम पध्दतीने 10 समूहातील प्रत्येकी 40 जणांच्या (एकूण 400) रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने ‘इलायझा’ पध्दतीने केली.
  • यात महाराष्ट्रातील बीड, जळगाव, नगर, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. यात सर्वसामान्य संसर्ग असल्याचे प्रमाण 1.13 आढळून आले.

स्रोत – सकाळ


मेड इन महाराष्ट्र

  • देशाच्या औद्योगिक स्थितीला भक्कम करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. उद्योगपतींनी त्यांचे प्रकल्प महाराष्ट्रात आणावे, तातडीची मदत देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.
  • कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्यावतीने झालेल्या एका संवादात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवांद साधला. शक्य आहे तिथे ‘वर्क फ्रॉम होम, सुरक्षित आणि व्यवस्थित जीवन, मजूर, कामगार अश्या विविध विषयावर सरकार मदत करणार असाही त्यांनी सांगितले.

स्रोत – लोकसत्ता


UNSC च्या तात्पुरत्या सदस्यपदी भारताची आठव्यांदा निवड

  • भारताची २०२१-२२ या वर्षासाठी UNSC च्या तात्पुरत्या सदस्यपदी आठव्यांदा निवड झाली आहे. बुधवारी ७५ व्या सत्रासाठी बैठक पार पडली तेव्हा भारताचा यात निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यात भारतासोबतच मॅक्सिको, आयर्लंड, व नॉर्वे या देशांनचीही निवड झाली आहे.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या यशस्वी निवडणूकीबद्दल अमेरिकेने भारतचे अभिनंदन करत स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा या विषयांवर भारतासोबत काम करण्यास अमेरिका उत्सुक आहोत अशी त्यांनी म्हंटल आहे.

स्रोत – लोकसत्ता


आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole