चालू घडामोडी – 18 December 2020

UNDP मानव विकास अहवाल 2020

  • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने मानव विकास निर्देशांक 2020 अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.
  • निर्देशांकामध्ये नॉर्वे देश प्रथम स्थानी असून त्याच्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो. यंदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे.
  • भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. देशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते वर्ष 2018 मधल्या 6829 डॉलरवरून 6681 डॉलरवर आले आहे.

भारतीय गुणवत्ता परिषद देशभरात ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) नेमणार

  • भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांनी हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी (HRAA) अर्थात आरोग्यपूर्ण स्वच्छता मानांकन परीक्षण केंद्र योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेल्या स्वच्छतेला मापण्यासाठी देशभरात हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी (HRAA) नेमणार आहे.
  • मान्यताप्राप्त HRAA केंद्र FSSAIने ठरविलेल्या अन्न गुणवत्ता आणि सुरक्षा प्रक्रियेच्या अनुपालनाची पडताळणी करण्यासाठी आणि स्वच्छता मानांकन देण्यासाठी जबाबदार असणार.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे डाक पे अँप

टपाल विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) यांनी डिजिटल पेमेंट सेवा देणाऱ्या डाक पे या नव्या डिजिटल पेमेंट अॅपचे अनावरण केले.

ठळक बाबी

  • देशातल्या शेवटच्या घटकाला आर्थिक समावेशनाचा लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे अॅप तयार करण्यात आले आहे.
  • डाक पे अॅप देशभरात पसरलेल्या विश्वासार्ह टपाल जाळ्याच्या माध्यमातून समाजातल्या विविध स्तरांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी इंडिया पोस्ट आणि IPPB कडून दिल्या जाणाऱ्या डिजिटल आर्थिक आणि सहाय्यकारी बँकिंग सेवांचा एकीकृत संच आहे.
  • अॅपमध्ये पैसे पाठवण्याच्या सेवा (डोमेस्टिक मनी ट्रान्स्फर- DMT), QR कोड स्कॅन करणे आणि सेवांना / व्यापाऱ्यांना डिजिटली पेमेंट करणे (आभासी डेबिट कार्ड आणि UPI सह), बायोमेट्रिक्सद्वारे कॅशलेस देवाणघेवाणीची व्यवस्था, कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना आंतरबँकिंग वापराची सुविधा आणि बिले चुकती करण्याची सुविधा अश्या सर्व व्यवहारांचा समावेश आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) विषयी

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) भारत सरकारच्या 100 टक्के मालकीची देयक बँक आहे. त्याची स्थापना दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या टपाल कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात आली. IPPB प्रायोगिक प्रकल्प म्हणून 30 जानेवारी 2017 रोजी रांची (झारखंड) आणि रायपूर (छत्तीसगड) येथे कार्यरत करण्यात आले होते. त्याचे व्यवस्थापन भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) करते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole