चालू घडामोडी – 17 मे 2021

चीन मंगळ मोहीम

  • अमेरिकेनंतर चीनचा (China Moon Project) रोव्हरही आता मंगळावर उतरला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शेवटची ९ मिनिटे थरारक होती.
  • रोव्हरचे नाव झुरॉन्ग असे आहे, अग्नी व युद्धदेवतेवरून ते ठेवण्यात आलं आहे.
  • युटोपीया प्लॅनेशिया या भागात ही बग्गी उतरवण्यात यश आलं आहे.
  • ही सहा चकांची सौर बग्गी आहे. याचं वजन २४० किग्रॅ. इतकं आहे.
  • त्याला सहा विविध वैज्ञानिक उपकरणे बसवण्यात आले आहेत.

नाबार्ड (NABARD) आणि एमसीसीआयए मार्फत कृषी निर्यात केंद्र

  • राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज् अँड ऍग्रीकल्चर यांच्या तर्फे शेतीमाल निर्यात व माहिती केंद्र सुरू करण्यात आले.
  • या पुण्यमधल्या केंद्राचे शनिवारी ऑनलाइन उद्घाटन झाले. निर्यातीबाबत मार्गदर्शन करणारे हे पहिलेच केंद्र आहे.
  • कृषी खाद्य निर्यातीची क्षमता वाढवण्यास या केंद्राची।मदत होईल.
  • निर्यातदारांच्या मार्गदर्शनासाठी हे केंद्र वन स्टॉप शॉप आहे.
  • कृषी खाद्य उत्पादनांच्या निर्यातीमध्ये भारत १३ व्या स्थानावर आहे.
  • आतापर्यंत महाराष्ट्रातून होत असणारी ३० दशलक्ष डॉलर्स ची निर्यात १०० दशलक्ष इतकी वाढावी याकडे लक्ष दिलं जाईल.
  • कीटकनाशकांच्या उर्वरित अंशाचे व्यवस्थापन, ग्लोबल गॅप प्रमाणीकरण, आयातदार देशांकडून शेतीमालाच्या गुणवत्तेचे लावले जाणारे निकष, निर्यातक्षम बागांचे व्यवस्थापन, काढणी पद्धती नियमावली, उत्पादन तंत्रज्ञान, हरितगृहातील उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान व पॅकेजिंग
  • इ. माहिती या केंद्रांत मिळेल.

हिमालयात आढळला लाल कोल्हा (Red Fox In Himalaya)

  • हिमालयात तीन हजार मीटर उंचीवरील पर्वत रांगेत दुर्मिळ लाल कोल्हा आढळला.
  • वुल्प्स वुल्प्स ग्रीफिथी असं या कोल्ह्याचं नाव आहे.
  • उत्तराखंड मधल्या मुनिसियारी भागातील भुजानी आणि खालीया परिसरात हा कोल्हा आढळला.
  • हिमालयातील अधिवासापासून साधारणतः ५०० मीटर खालच्या अंतरावर हा कोल्हा गेल्या काही वर्षांत प्रथमच आढळला. असं ‘मोनल’ या संस्थेने सांगितलं.
  • गेल्या दोन वर्षांपासून या कोल्ह्याचं शोध सुरू होता. बाकी आठ उपप्रजातींच्या कोल्ह्यांचा वावर आढळून आला होता पण हा कोल्हा लाजाळू म्हणून ओळखला जातो, तो सहसा कमी उंचीवर आढळत नाही.
  • हिमालयातील मूळचे अधिवास नष्ट झाल्यामुळे तो कमी उंचीवर आला असावा.
  • औषधी वनस्पतींसाठी मनुष्याचे या भागात प्रवेश करणं, मानवी हस्तक्षेपामुळे या प्राण्यांची नैसर्गिक शिकार कमी होणं, हवामान बदलांमुळे त्यांच्या आधिवासावर गदा येत आहेत.

अरबस्तानातील मुस्लिम राष्ट्रे इस्रायलविरोधात

  • इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष अधिकच पेटला आहे.
  • इस्राएल गाझापट्टीत जोरदार हल्ला केला आहे. यांत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला.
  • या हल्ल्यात जाला टॉवर उध्वस्त झाला ज्यामध्ये अल् जझिरा सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीचे कार्यालय होते.
  • या घटनेची दखल घेऊन अरबस्तानातील मुस्लिम राष्ट्रे एकवटली आहेत.
  • या सर्व मुस्लिमराष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्रालयाची सौदी अरेबिया च्या नेतृत्वाखाली विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक झाली.
  • इस्रायली पोलिसांकडून पॅलेस्टिनी नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारावर चर्चा करण्यात आली.
  • हे अरबस्तानातील देश त्याच बरोबर इराण, तुर्की, इंडोनेशिया अशा सर्व मुस्लिम बहुल देशांची संघटना ओआयसीचे मुख्य कार्यालय सौदीच्या राजधानी जेद्दाहमध्ये आहे.
  • तिथे या ५७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली.
  • ओआयसीची स्थापना ५१ वर्षांपूर्वी १९६९ मध्ये झाली.
  • मक्का, मदिना इथल्या मशिदीनंतर जेरुसलेम येथील अल्अक्सा ही मुस्लिमांसाठी पवित्र मशीद आहे.
  • तर याच मशिदीला १९६९ मध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ही मुस्लिम राष्ट्रांची बैठक झाली आणि त्यातूनच या ओआयसीचा जन्म झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole