17 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा

  • ज्या विद्यापीठांनी ऑनलाईन वर्ग चालू केलेत अश्या परदेशी विद्यार्थ्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला होता. पण आता यावर युटर्न घेत हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

गुगल जिओ करार

  • जगातील मोठी तंत्रज्ञान कंपनी गुगल रिलायन्सच्या जिओ मध्ये 33 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले.
  • अजूनही 2G तंत्रज्ञान वापरणाऱ्या भारतीय ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जिओ गुगलची मदत घेणार आहे.
  • रिलायन्स जिओ करीत अँड्रॉइड आधारित संचारप्रणाली गुगल तयार करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
  • मेड इन इंडिया 5G
  • हक्कभाग विकत विक्रमी गुंतवणूक खेचणाऱ्या रिलायन्स समूहाने नव्या वर्षांपासून भारतात 5G सेवा चालू करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

अशोक लवासा ADB च्या उपाध्यक्षपदी

  • निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची बहुपक्षीय वित्तपुरवठा करणाऱ्या आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
  • लवासा यांना खासगी क्षेत्र संचालन आणि सार्वजनिक खासगी भागीदारी यासाठी उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
  • अशोक लवासा भारताच्या निवडणूक आयुक्तांपैकी एक आहेत. यापूर्वी त्यांनी केंद्रीय वित्त सचिव, पर्यवरण आणि वने सचिव, नागरी वाहतूक सचिव यासारख्या वरिष्ठ पदावर काम केले आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा


Join us on Telegram and Get all Updates

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole