चालू घडामोडी – 16 मे 2021

तौत्के चक्रीवादळ

  • दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही फटका बसण्याची शक्यता
  • कोकण किनारपट्टीसह मध्यपश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
  • चक्रीवादळ तयार होत असताना केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा किनारी भाग, तामिळनाडूच्या काही भागांत अतिवृष्टी झाली.
  • हे चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर जाणार आहे.
  • त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व तीव्र वादळ असणार आहे.
  • १५ व १६ मे ला मुंबई, रायगड व पालघरमध्येही सोसाट्याचा वारा आणि पाऊस असेल.
  • प.महाराष्ट्र घाटक्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
  • गुजरात च्या किनारी दिशेने १८ मे च्या सकाळी हे वादळ जाणार असून या भागांत ११५ किमी/तास इतक्या वेगाने वारे वाहणार आहेत व अतिवृष्टीचा इशारा.
  • अरबी समुद्रात केरळ पासून ३६० किमी अंतरावर कमी दाबाचे तीव्र क्षेत्र तयार झाले, त्याचे नंतरच्या २४ तासांत चक्रीवादळात रूपांतर झाले. आता अतितीव्र होणार असल्याचे संकेत आहेत.
  • या चक्रीवादळाचे नामकरण म्यानमारने केले आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आवाजसाठी ओळखल्या जाणाऱ्या सरड्याचे नाव आहे.
  • भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना भारत, पाकिस्तान, श्रीलंका, मान्यमार सह १२ देशांकडून क्रमवार नाव दिले जाते.
  • भारतीय हवामान विभागाने भविष्यात बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात तयार होणाऱ्या १६९ चक्रीवादळांची यादी तयार केली आहे.

अमेरिका आता मुखपट्टी मुक्तीकडे

  • अमेरिका आता कोरोना साथीतून पूर्वपदावर येत आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनी मास्क वापरण्याची गरज नाही, असं सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने म्हणलं आहे.
  • ही घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडेन व उपाध्यक्ष हॅरिस यांनी मास्क न घालता केली.
  • मुखपट्टी वापरातून मुक्तता हा महत्वाचा टप्पा व मैलाचा दगड आहे. कारण अमेरिकेत लसीकरण वेगाने सुरू आहे, असं बायडेन यांनी सांगितलं.
  • अमेरिकेत ११४ दिवसांत २५ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. ५० पैकी ४९ राज्यांत लसीकरण झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली आहे.मृतांची संख्या ८०% ने कमी झाली आहे.
  • चार महिन्यात ६०% प्रौढांना लशीची निदान एक मात्रा तरी देण्यात आली. त्यामुळे रोजगार वाढून अर्थ व्यवस्थेला आलेली मरगळ दूर झाली आहे.

दक्षिण कोरियाची भारताला मदत

  • कोरोना संसर्गाच्या काळात भारताला मदत करण्याचे धोरण राबवताना द.कोरियाने भारतासाठी वैद्यकीय साहित्य पाठवले आहे.
  • तीन विमानांद्वारे १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रॅटेर, १० व्हेंटिलेटर्स, १० हजार चाचणी किट्स आणि इतर साहित्य भारतात येणार आहे. त्यातली दोन विमाने दिल्लीत दाखल झाली आहेत.
  • हे सर्व साहित्य रर्ड क्रॉस संघटनेमार्फत देशभरात वितरित केले जाणार आहे.

यू.एस. स्लायडर कासवे

  • मूळची अमेरिकन असणारी कासवांची एक सुंदर प्रजाती आणि पाळीव म्हणून प्रसिद्ध आहे अशी यू.एस. स्लायडर प्रजाती ईशान्य भारतातील २९ पैकी २१ संकटग्रस्त कासवांच्या प्रजातीसाठी धोकादायक ठरत आहे.
  • ही प्रजातीकडून ईशान्य भारतातील जल अधिवासात अतिक्रमण केले जात आहे.
  • ऑगस्ट २०१८ ते जून २०१९ दरम्यान ‘हेल्प अर्थ’ या एनजीओतर्फे आलेल्या सरीसृप व उभयचर अभ्यासकांच्या एका समूहाने अभ्यासाअंती एक संशोधन पत्रिका बनवली.
  • ज्यामध्ये लाल कानाची स्लायडर कासवे ही गुवाहतीच्या दीपोर बील अभयारण्य व उग्रतारा मंदिराच्या तळ्यात आढळुन आली आहेत.
  • अशाच एकूण ८ संशोधन पत्रिका मिझोराम विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाकडून प्रकाशित करण्यात आले आहेत.
  • मिझोरामची राजधानी ऍजॉल च्या त्लावंग नदीमध्ये ही प्रजाती सापडली आहे.
  • कर्नाटक आणि गुजरातमधील विविध ३३ जलस्रोत सुद्धा प्रजातीमुळे प्रभावित झाले आहेत.
  • पण भारतातील अन्य जागांपेक्षा ईशान्य भागातील ब्रह्मपुत्रा आणि अन्य नद्यांच्या पर्यावरणीय व्यवस्थेत होणाऱ्या या प्रजातीचे अतिक्रमण हे चिंताजनक आहे.
  • ईशान्य भारतातील जलस्रोत हे देशांतील ७२% कासवांच्या प्रजातींचे घर आहे. आणि या प्रजाती अत्यन्त दुर्मिळ आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole