15 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

व्याघ्रगणनेचा गिनीज विक्रम.

  • 2018 मध्ये भारतात चौथी व्याघ्रगणनना पार पडली. ट्रॅप कॅमेरे लावून सर्वात मोठ्या भूभागावर केलेले वन्यजीवांचे सर्वात मोठे आणि यशस्वी सर्वेक्षण म्हणून गिनीज बुक मध्ये नोंद झालीं आहे.
  • या व्याघ्रगणानेनुसार जगातील 2967 म्हणजेच 75 टक्के वाघ भारतात असल्याचे समोर आले.
  • कॅमेरा ट्रॅप म्हणजे ? आसपासच्या वावरामुळे जमिनीत होणारी कंपने सेन्सरच्या साहाय्याने टिपून त्यावरून आपोआप चित्रीकरण सुरू करणाऱ्या बाह्यचित्रीकरणाच्या कॅमेऱ्याना कॅमेरा ट्रॅप म्हणतात.

गुणवत्तेत सातत्य नसलेल्या विद्यापीठांना मुदतवाढ नाही.

  • गुणवत्तेत सातत्य नसलेल्या विद्यापीठांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदानाने नुकताच घेतला आहे. UGCने तयार केलेल्या अभिमत विद्यापीठ कायदा 2019 मध्ये याची तरतूद आहे.
  • कायद्यानुसार अभिमत विद्यापीठांनी त्यांची कामगिरी दरवर्षी UGC ला पाठवणे बंधनकारक आहे. समिती कामगिरीची तपासणी करून दर्जा कायम ठेवण्याबाबत निर्णय घेते.

तंत्रस्नेही शिक्षकांना क्लासरूम आणि प्रशिक्षण

  • ऑनलाईन शिक्षणाची गरज ओळखून आता तंत्रस्नेही शिक्षकांना क्लासरूम आणि प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि गुगल मार्फत चालवला जाणार आहे.
  • याच्या मध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधने, संदर्भ साहित्य, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, विविध सूचना इ लाभ घेता येणार आहे.

गुगलची भारतात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक

  • भारतातील टेक प्लॅटफॉर्म्सचा वाढता वापर पाहता अल्फाबेट या गुगलच्या प्रवर्तक समूहाने भारतात येत्या सात वर्षात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे.
  • समभाग, भागीदारी परिचालन आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून हि गुंतवणूक होणार आहे. नव उद्यमी, लघु उद्योग आणि शिक्षणासोबतच शेती मध्येही गुंतवणूक होणार आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole