चालू घडामोडी – 15 जानेवारी 2021

पीओपी बंदीवर स्थगिती

  • प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपी च्या वापरावर असलेल्या बंदीवर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जवडे कर यांनी स्थगिती दिली आहे.
  • यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याने अभ्यासगट नेमला आहे व त्याचा अहवाल येईपर्यंत ही बंदी उठवण्यात आली आहे.
  • पीओपी बंदीचा फटका राज्यातील ५ लाख मूर्तीकार व कारागीरांना बसला आहे.
  • कोरोना टाळेबंदीमुळे या लोकांचे खूप नुकसान झाले आहे.
  • येत्या माघी गणेशोत्सवात या पीओपी मूर्तींवर आता बंदी राहणार नाही.

कृषी कायद्यांना स्थगिती

  • नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणी वर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
  • या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात नेमली आहे.
  • ही समिती कायद्यामधील वादग्रस्त मुद्द्यांवर शेतकऱ्यांशी चर्चा करून न्यायालयाला सादर करणार आहे.
  • कायदे लागू होण्यापूर्वीची किमान आधारभूत किंमत (एम्एसपी)पुढील आदेशा पर्यन्त लागू राहील.
  • तसेच कंत्राट शेतीसाठी जमिनीची विक्री होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल.
  • ही समिती न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असून या कायद्यांतील कोणत्या तरतुदी कायम ठेवायच्या व कोणत्या काढून टाकायच्या यासाठी ही समिती नेमलेली आहे.

राज्यात १८३९ पक्षांचा मृत्यू

  • गेल्या ५ दिवसांत राज्यामध्ये १८३९ पक्षांचा मृत्यू झाला आहे.
  • मुंबई, दापोली, परभणी, लातूर येथील पक्षांमध्ये बर्ड फ्ल्यू झाल्याचे आढळून आले आहे.
  • कावळे, बगळे , कोंबड्या हे पक्षी जास्त प्रमाणात मृत आढळत आहेत.
  • कोणतेही पक्षी नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत अवस्थेत आढळत असतील तर जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
  • १८००२३३०४१८ या पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या मोफत क्रमांकावर माहिती द्यावी.
  • मृत पक्ष्यांना हात लावू नये. शवविच्छेदन करू नये, किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये.
  • चिकन व अंडी यांचे सेवन सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • कारण चिकन व अंडी हे ७०° तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ले असता त्यात कोणतेही विषाणू राहत नाहीत.

दहशतवादी घोषित करण्यात खोडा नको

  • दहशतवादी किंवा दहशतवादी गट असल्याचे घोषित करण्यासाठी करण्यात आलेल्या विनंती मध्ये विनाकारण खोडा घालण्याची प्रथा बंद झाली पाहिजे.
  • नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (युएनएससी) च्या बैठकीत भारताने हे मत व्यक्त केले
  • जैशएमोहम्मद चा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी चाललेल्या भारताचे प्रयत्न यांत चीनकडून कायम खोडा घातला जातो.
  • दहशतवाद हा जगाला घातक आहे, जगासमोरचा मोठा प्रश्न आहे. चांगले किंवा वाईट असे दहशतवादी असे नसतात.
  • अकारण खोडा न घालता निर्बंध आणि दहशतवाद प्रतिबंधात्मक काम करणाऱ्या समित्यांच्या कार्यपद्धती मध्ये सुधारणा केली पाहिजे
  • पारदर्शकता, परिणामकारकता आणि जबाबदारी ही गरजेची आहे.

ट्रम्प यांच्यावर महाभियोगासाठी प्रतिनिधी गृहात मतदान

  • मावळते अध्यक्ष ट्रम्प यांनी समर्थकांच्या मदतीने कॅपिटॉल हिलमध्ये हिंसाचार घडवल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या साठी प्रतिनिधीगृहात मतदान होणार आहे.
  • प्रतिनिधीगृहात विरोधी पक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे बहुमत आहे, त्यामुळे महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
  • दोन तृतीयांश सदस्यांचे मत हे महाभियोग कारवाई साठी गरजेचे असते. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन यांच्यात ५१ ५० इतकीच तफावत आहे.
  • मुदतीपूर्वी पदच्युत केलेले ट्रम्प हे तिसरे राष्ट्रपती ठरतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole