चालू घडामोडी – 14 मे 2021

तक्रार निवारण समिती नेमा

  • येत्या ४८ तासांत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, लसधोरण स्पष्ट करावे, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकार ला दिले.
  • खंडपीठाने उत्तरप्रदेशातील कोरोना स्थितीची दखल घेतली.
  • राज्यातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या ९ जिल्ह्यांमध्ये न्यायिक अधिकारी नेमण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
  • हे ९ जण विभागीय अधिकारी म्हणून काम करतील व दार आठवड्याला न्यायालयाला माहिती देतील.
  • प्रत्येक जिल्ह्यातील तीन सदस्यांची ‘महामारी सार्वजनिक तक्रार निवारण मंच स्थापन करावा असे आदेश ही कोर्टाने दिले आहेत.
  • या समितीत मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा जिल्हा न्यायाधीशांनी नामनिर्देशित केलेले समक्ष न्यायिक अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकव अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारांच्या समकक्ष जिल्हा प्रशासकीय अधिकारी हे लोक असतील.
  • दिलेल्या आदेशांवर येत्या ४८ तासांत अंमलबजावणी करण्यात यावी हे ही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू निर्मिती

  • राज्यातील प्राणवायू संकटावर मात करण्यासाठी साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पातून देशातील प्राणवायू निर्मितीचा पहिला प्रकल्प यशस्वी झाला.
  • रुग्णांना देण्यासाठी आवश्यक प्राणवायूचे प्रमाण ९५ वर गेले आहे.
  • या प्रकल्पाच्या यशापयशावर बाकी प्रकल्पाचं भविष्य अवलंबून होतं, आता २८ ते ३० टन प्राणवायू प्रकल्प उभे करण्याच्या कामाला वेग येणार आहे.
  • आता धाराशिव साखर कारखान्यातून दररोज १६५ घनमीटर प्राणवायू तयार होणार आहे. जम्बो सिलेंडरमुळे ७ घनमीटर प्राणवायू भरला जातो.

मिशन ऑक्सिजन

  • ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं.
  • महाराष्ट्रासह अन्य सर्वच राज्यात दुसऱ्या लाटेचा जोरदार सामना केला जात आहे.
  • राज्यात ३ हजार मेट्रिक टन प्राणवायू उत्पादनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
  • महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजुर करण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
  • सध्या महाराष्ट्राला १८०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागते. जवळपास १३०० मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती इथे होते. उरलेला प्राणवायू इतर राज्ये व केंद्राच्या मदतीने उपलब्ध केला जात आहे.
  • महाराष्ट्राला स्वावलंबी होण्यासाठी ३८२ PSA प्लांटस ची स्थापना करण्यात येणार आहे व २४० मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती होणार आहे.

महाराष्ट्रात सर्वात मोठे उपाय योजना केंद्र

  • पुण्यातील माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील ३२ बिबट्यांची कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे.
  • दिवसातून ३ वेळा बिबट्यांची तापमापकाने तपासणी केली जात आहे, गरज पडल्यास त्याची कोरोना चाचणीही केली जाईल.
  • माणिकडोह हे बिबट्यांचे सर्वात मोठे निवारा केंद्र आहे.
  • मार्जार कुळातील प्राण्यांना कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात असताना भारतीय वन्यजीव प्राधिकरणाकडून सर्व प्राणीसंग्रहालये व निवारा केंद्रे यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • या निवारा केंद्राने ‘वाईल्डलाईफ एसओएस’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे ज्याद्वारे या केंद्राला तांत्रिक मदत मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole