चालू घडामोडी – 14 जून 2021

कोरोनावरील औषधे करमुक्त

  • कोरोना व म्युकरमायकोसिस या रोगांवरील औषधे, प्राणवायू आणि प्राणवायू निर्मिती उपकरणांवरील वस्तू व सेवा कर ५ % पर्यन्त कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. लशींवरील कर कमी केलेला नाही.
  • वरील साथरोगांवर असलेला कर हा आधी १८ आणि १२% इतका होता.
  • वैद्यकिय प्राणवायू, देशी बनावटीची वा आयात केलेली प्राणवायू यंत्रे, श्वसनयंत्रे, त्यांचे मुखकवच, कॅन्यूला, हेल्मेट, बी-पॅप यंत्र, नेझल कॅन्यूला, नमुना चाचणी संच, ऑक्सिमीटर, तापमापक, हात जंतूरोधक, विद्युतदाहिनीसाठी वापरले जाणारे साहित्य यांवर १२% GST होता तो ५% वर आणला आहे.
  • नुकत्याच झालेल्या ४४व्या जीएसटी परिषदेत निर्णय घेतला गेला की हे नवे दर ३० सप्टेंबर २०२१ लागू असतील.
  • रक्ताच्या गुठळ्या न होऊ देणारे ‘हेपॅरिन’ (Heparin) व कोरोना वरील इन्जेक्शन रेमडीडीव्ही (Remdesivir) यांचाही कर १२% वरून ५%, रुग्णवाहिकेवरील २८% GST आता १२%.
  • कोरोनावरील टोसीलिझुमॅब व म्युकरमायकोसिस वरील अँफोटेरिसीन बी या औषधांवरील ५% GST रद्द.

वाडा कोलम कडे वाड्यातील शेतकऱ्यांची पाठ

  • वाडाकोलम मुळे वाडा तालुक्याची ओळख संपूर्ण देशात झाली आहे.
  • पण इतर भागांतून पिकवल्या जाणाऱ्या या तांदळामुळे होणारे नुकसान व अधिक उत्पादनाच्या आशेमुळे येथील शेतकऱ्यांनी भाताचे संकरित वाण घेण्यास सुरुवात केली आहे.
  • म्हणून वाडा तालुक्यातच वाडा कोलम तांदळाचे उत्पादन ५ ते १०% वर आलेलं आहे.
  • बाजारात अन्य ठिकाणी उत्पादित होणारा तांदूळ विक्रीस आणला जात असल्यामुळे वाड्यातील मूळ उत्पादनाची कमी झाली. आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
  • १२५ दिवसांच्या झिणी व १३०-१३५ दिवसांच्या सुरती कोलम या दोन जातींना एकत्र करून १९८० च्या सुमारास ‘वाडा कोलमची’ जोपासना करण्यात आली. यापासून तयार होणाऱ्या सुट्या व मुलायम भातामुळे सर्वत्र याची लोकप्रियता वाढली.
  • वाडा पेक्षा शेतकऱ्यांनी हळव्या वाणातील मोहर, दप्तरी, पूनम व निमगरव्या वाणातील जोरदार, रुपाली, पूजा तसेच अतिगराव्या वाणातील सुवर्णा, मसूरी, कर्जत २ या संकरित भात बियाणांसाठी येथील शेतकरी आग्रही असतो.
  • वाडा तालुक्यातील एकूण कृषी क्षेत्र आहे १८५०० हेक्टर पण गेल्या वर्षी केवळ ३०० हेक्टरवर वाडा कोलम वाणाची लागवड केली गेली.
  • वाडा कोलमचे मूळ वाण टिकून राहिले पाहिजे यासाठी वाडा कोलम बहुउद्देशीय सहकारी संस्था निर्माण झाली. ती येथे वाडा कोलमचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • वाडा कोलमला भौगोलिक मानांकन (GI TAG) मानांकन मिळाले तरच बाजारपेठेत याला न्याय मिळेल, अशी भूमिका या वाडा कोलम संस्थेने घेतली आहे.

G 7 सत्रामध्ये पंतप्रधान मोदी

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ७ बैठकीतल्या एका सत्राला डिजिटल माध्यमातून हजेरी लावली.
  • Building Back Stronger Health असं या सत्राचं नामकरण करण्यात आलं आहे.
  • कोरोना महासाथीपासून या जगाची लवकर रोगमुक्तता व्हावी आणि भविष्यात येणाऱ्या महासाथीपासून रक्षण करणे हा या सत्राचा उद्देश होता.
  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारताला या जी ७ व अन्य देशांकडून जो सहयोग मिळाला त्याबद्दल पंतप्रधानांनी या सर्वांचे आभार मानले.
  • उद्योगजगत, नागरिक आणि प्रशासन यांचा सर्व स्तरांवर कोरोनाच्या या लाटेशी लढण्याचा एकत्रित प्रयत्न आणि त्यासंबंधीचा भारताचा हा संपूर्ण वैश्विक दृष्टिकोन हे मुद्दे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
  • भारताने मुक्त स्रोत डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून केलेले लसींचे व्यवस्थापन व स्पर्शाचा वेध घेणे, व या लाटेचा सामना करताना आलेले अनुभव त्यातून आलेले ज्ञान हे अन्य विकसनशील देशांना देण्याची आपली इच्छा आहे हे मोदींनी सांगितले.
  • वैश्विक आरोग्य प्रशासन सुधारणेच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
  • भारत आणि द.आफ्रिका यांनी जी ७ देशांकडून कोविडशी निगडीत तंत्रज्ञान व लशींच्या पेटंट वर सूट (TRIPS waver) मिळावी यासाठी जागतिक व्यापारी संघटनेत दाखल केलेल्या प्रस्तावावर पाठिंबा मिळावा अशी मागणी केली.
  • आजच्या या बैठकीने पूर्ण जगाला ‘एक जग एक आरोग्य’ असा संदेश दिला आहे. भविष्यातील महामारींना रोखण्यासाठी वैश्विक एकता, दृढता व नेतृत्व करण्यासाठी पाऊल पुढे टाकायला हवं, असं सांगताना त्यांनी याची खास जबाबदारी पारदर्शक व लोकशाहीवादी समाजाकडे आहे यांवर जोर दिला.

G 7 च्या माध्यमातून चीनला शह

  • जो बायडेन सरकारने चीन बेल्ट अँड रोड (BRI) या कोट्यवधी डॉलर्सच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला शह देण्यासाठी पायाभूत योजना जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
  • जी ७ देश चीनविरोधात एकजुटीने प्रतिसाद देण्याच्या विचारात आहेत कारण चीनची आर्थिक व लष्करी ताकद गेल्या चाळीस वर्षात वाढत गेली असून त्याला कुणी आव्हान दिलेले नाही.
  • अमेरिका जी ७ देशांना एकत्रित घेऊन चीनमधील कामगार पिळवणुकीवर भूमिका घेण्यास भाग पाडेल.
  • नैऋत्य इंग्लड मध्ये होणाऱ्या जी ७ बैठकीत चीनवर सडकून टीका केली जाण्याची शक्यता आहे.
  • २०१३मध्ये चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा प्रकल्प सुरू झाला. किमान १०० देशांनी चीनशी रेल्वे, महामार्ग व बंदरे बांधणीबाबत करार केले होते.

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा २०२१

  • फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा २०२१ (French open tennis 2021) महिला गटात चेक प्रजासत्ताकच्या बिगर मानांकित बार्बोरा क्रेझिकोव्हाने विजय मिळवला.
  • तिने रशियाच्या अनास्तासिया पाव्हॅल्युचेंकोव्हाला पराभूत केलं.
  • क्रेझीकोव्हाचं हे पहिलंच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. तर कारकीर्दीतील दुसरे विजेतेपद आहे.
  • सलग आठव्या वर्षी नव्या खेळाडूने फ्रेंच ओपनचे जेतेपद मिळवले व गेल्या पाच वर्षांत ही स्पर्धा जिंकणारी क्रेझिकोव्हा ही तिसरी बिगर मानांकित खेळाडू आहे.

मेघा राजगोपालन् यांना पुलित्झर पुरस्कार

  • चीनमधील उईगुर मुस्लिमांच्या छळछावण्यांचा पर्दाफाश करणाऱ्या बझफीड न्यूज च्या भारतीय वंशाच्या पत्रकार मेघा राजगोपालन् यांना अभिनव शोधपत्रकारितेचा पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize) मिळाला.
  • त्यांनी चीनमधील शिनजियांग प्रांतातल्या छळछावण्यातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
  • त्याचबरोबर अजून एका भारतीय वंशाच्या नील बेदी यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. बेदी टम्पा बे टाईम्स साठी स्थानिक वार्तांकन करतात.
  • कॅथलिन मॅकगोरी यांच्यासह संभाव्य गुन्हेगार शोधून काढणाऱ्या नगरपालांच्या एका योजनेचा त्यांनी पर्दाफाश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole