चालू घडामोडी – 13 October 2020

नव्या रूपात आधार

  • दैनंदिन सर्व व्यवहारांमध्ये महत्वाचे असणारे आधार कार्ड आता नव्या रूपात येणार असून ते स्मार्ट कार्डसारखे असणार आहे, असे आधार निर्मिती संस्था UIDAI ने म्हटले आहे. आधार कार्डला आता PVC कार्ड वर रिप्रिंट केलं जाऊ शकणार असून हे कार्ड एटीएम अथवा डेबिट कार्ड सारखं असेल जे पाकिटामध्ये सहजपणे बसू शकेल.

शाळा बंदचा आर्थिक फटका

  • कोरोनामुळे २०२० वर्षात बहुतांश व्यवहार ठप्प झाले होते. कोरोनामुळे २०२०च्या सुरवातीपासूनच सर्व शाळा बंद आहेत. याबाबत जागतिक बँकेने एक अहवाल प्रकाशित केला आहे.
  • कोरोना महामारीच्या काळात बंद असलेल्या शाळांमुळे भारताला तब्बल ४०० अब्ज डॉलर्सचा शैक्षणिक फटका बसणार असल्याचे जागतिक बँकेचा अहवाल सांगतो तर दक्षिण आशियाला ६२२ अब्ज डॉलर्सचा फटका बसू शकतो यामुळे देशाच्या GDP ला सुद्धा तडाखा बसणार आहे.
  • ‘बिटन ऑर ब्रोकन- इनफॉर्मलिटी अँड कोविड १९ इन साउथ एशिया’ नावाचा अहवाल जागतिक बँकेने प्रकाशित केला आहे. यानुसार भारताला सर्वाधिक फटका बसणार असल्याचे नमूद केले आहे.

कोल्हापुरी चप्पल ऑनलाईन

  • देशभरासह जगभरात लोकप्रिय असलेली कोल्हापुरी चप्पल आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. याबाबत महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. कोल्हापूरच्या पायतानाला पूर्वीच GI सुद्धा मिळाला आहे.
  • कोल्हापुरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून त्यांचा आर्थिक स्तर उचंवण्याच्या उद्देशाने ऑनलाईन विक्री चालू करण्यात आली आहे. लवकरच विविध अस्सल कोल्हापुरी प्रोडक्ट ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

मोबाईल रेडिएशन कमी करण्यासाठी चिप

  • मोबाईल मधून प्रसारित होणाऱ्या रेडिएशन कमी करण्यासाठी अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली आहे. ही चिप गाईच्या शेणापासून तयार करण्यात आली आहे आणि वैज्ञानिकरित्या सिद्ध केलेली आहे असं कामधेनू आयोगानं सांगितले आहे.
  • कामधेनू आयोगाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन PIB च्या माध्यमातून हि माहिती दिली आहे. त्यांच्या मते हि चिप मोबाईलमध्ये ठेवल्यानंतर मोबाईल रेडिएशन कमी झाल्याचे निष्पन्न झालं आहे. याचा वापर करून अनेक आजारांपासून दूर राहता येईल आणि हे एक प्रकारे सुरक्षा कवच म्हणून काम करेल अशी त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole