चालू घडामोडी – 13 मे 2021

भारतातील उत्परीवर्तनाचा जगाला धोका – WHO

  • ऑक्टोबर २०२० मध्ये बी १.६१७ हा विषाणू जो उत्परीवर्तीत झाला आहे,व वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगभरात धोका निर्माण झाला. आहे.
  • वेगाने होणाऱ्या संक्रमणामुळे हा जागतिक चिंतेचा विषय ठरला आहे.
  • या बी१.६१७ ची संक्रमण क्षमता व वेग हा मूळ विषाणू पेक्षा खूप जास्त आहे.
  • भारतातला हा उत्परिवर्तन झालेला अन्य १९ देशांमध्ये सापडला आहे. त्यामुळे त्या देशांनी भारतात जाण्यास व येण्यास बंदी घातली आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेकडून ‘टूगेदर फॉर इंडिया’ ही मोहीम राबविण्यात येत आहे, ज्यात प्राणवायू, औषधे, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरणे यासाठी निधी संकलन करण्यात येत आहे.

कोविड रुग्णांसाठी प्लास्मा थेरपी अधिक प्रभावी ठरणार नाही

  • इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने चाचण्यांच्या आधारे कोविड रुग्णांसाठी प्लास्मा थेरपी अधिक प्रभावी ठरणार नाही असं सांगितलं आहे.
  • पण गेल्या १५ महिन्यात मुंबईतील ९० लोकांना याच प्लास्मा थेरपीमुळे जीवदान मिळाले आहे.
  • पहिल्या लाटेच्या दरम्यान ३९ रुग्णालयातील ४६४ रुग्णांचा अभ्यास केला गेला. त्यामध्ये प्लास्माने कोविडशी लढण्यास मदत केली नाही असं आढळून आलं.
  • या अभ्यासादरम्यान केवळ ९० रुग्णांचे प्राण वाचवता आले.
  • प्लास्मा हा रक्ताचा द्रवरूपातला घटक आहे. ज्यात लाल व पांढऱ्या रक्तपेशी व त्याचबरोबर रंगहीन प्लेटलेट्स असतात. त्यात अँटीबॉडीज् ही असतात म्हणून त्याला अँटीबॉडी थेरपीही म्हणतात.

नासाचे अवकाशयान

  • नासाने पाठवलेल्या अवकाशयानात लघुग्रहाचे तुकडे
  • अडकले आहेत.
  • आता हे यान पृथ्वीच्या दिशेने निघाले आहे.
  • अवकाशातील प्राचीन खडकांचा या अवशेषांमध्ये समावेश आहे असे नासाने सांगितले.
  • हे यान रोबोट स्वरूपाचे आहे, त्याचं नाव ओरॅसिस रेक्स नावाचे आहे.
  • या यानातून २ औंस म्हणजे ६० ग्रॅम अवशेष आणण्याचे उद्दिष्ट होते. पण या यानाने अर्धा ते १ पौंड म्हणजे जवळपास ४०० ग्रॅम वजनाचे अवशेष आणले आहेत.
  • या यानाला पृथ्वीकडे येण्यास अजून २ वर्षे लागतील.

इव्हरमेक्टिन औषधांबाबत जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

  • कोरोना संसर्गावर इव्हरमेक्टिन हे औषध सरसकट वापरण्यावर जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे.
  • खरंतर हे औषध परोपजीवी जंतूंवर तोंडावाटे दिले जाते.
  • कोरोनवर उपचार करताना सुरक्षितता व परिणामकारकता महत्वाची आहे.
  • कोरोनवर हे इव्हरमेक्टिन सरसकट वापरणे योग्य नाही.
  • याचा वापर कोरोना विषाणूवर करताना आधी या औषधाच्या वापरावर झालेले अभ्यास विचारात घेणं महत्वाचं आहे.

इस्त्रायल पॅलेस्टाइन वाद

  • इस्त्रायल पॅलेस्टाइन यांच्यातला संघर्ष आता हिंसक वळणावर आला आहे.
  • हमासच्या रॉकेट हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने गाझामध्ये प्रतिहल्ला केला. यांत २६ जणांचा मृत्यू झाला.
  • या सगळ्याला जेरुसलेममध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या इस्रायली सैनिक व पॅलेस्टिनी नागरिकांचा सुरू झालेला संघर्ष कारणीभूत आहे.
  • यांवर आधी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर २०० रॉकेट डागले.
  • त्यावर इस्त्रायलने प्रतिहल्ला केला व काही दहशतवादी मारले.
  • जेरुसलेम शहारावरून इस्त्रायल व पॅलेस्टाइन या दोन्ही देशांमध्ये खूप वर्षे वाद सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole