12 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी


2019 Nobel Peace Prize: इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना शांततेचा नोबेल जाहीर

इथिओपियाचा शेजारी इरिट्रियासोबतचा असणारा सीमावादाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी घेतलेल्या पुढाराबद्दल इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली याना २०१९ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारा इथिओपियाचा पहिला नागरिक होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे.

यंदा घोषित झालेला हा शंभरावा नोबेल शांती पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी पंतप्रधान अबिय अहमद अली यांच्या सोबत पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थंबर्ग सुद्धा शर्यतीत होत्या.

12 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी, current affairs, Chalu Ghadamodi, mpsc Chalu Ghadamodi, चालू घडामोडी, दिनविशेष, Dinvishesh in marathi, mpsc, mpsc 360, साहित्य नोबेल, पीटर हँडके, ओल्गा तोकार्झूक, नोबेल शांतता पुरस्कार,
Source – Twitter

५० रेल्वे स्थानके, १५० गाडय़ांचे खासगीकरण

नीती आयोगा सोबतच्या चर्चेनंतर रेल्वेच्या खासगीकरणाला गती मिळाली आहे. लवकरच १५० रेल्वे गाडय़ांचे व्यवस्थापन आणि ५० रेल्वे स्थानके यांचं खासगीकरण होणार आहे.

नीती आयोग आणि रेल्वे अध्यक्ष यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर खासगीकरणाबाबत उच्चाधिकार समिती स्थापण्याचा निर्णय घेतला होता.

या समितीमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, गृहबांधणी व नागरी विकास खात्याचे सचिव आणि रेल्वे मंत्रालयातील वित्तीय आयुक्त असतील.


2019 Nobel Prize : ओल्गा तोकार्झूक आणि पिटर हँडके यांना साहित्यातला नोबेल जाहीर

२०१९ सोबतच लैंगिक अत्याचारांच्या सावटाखाली स्थगित करण्यात आलेले २०१८ चे साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर झाले.

२०१८ – लेखिका ओल्गा तोकार्झूक – पोलंड

  • पोलीश लेखिका, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि बुद्धीजीवी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या ‘फ्लाईट्स’ या पुस्तकासाठी मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईजने गौरविण्यात आले आहे आणि हा मान मिळणाऱ्या त्या पहिला लेखिका आहेत.

२०१९ – लेखक पीटर हँडके – ऑस्ट्रिया

  • दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वाधिक प्रभावशाली लेखक म्हणून युरोपात ओळख, आपल्या जन्मदातीच्या आत्महत्येने प्रभावित होऊन ‘द सॉरो बियॉड ड्रीम्स’ हे पुस्तक लिहिले. अनेक चित्रपटांसाठी लेखन. १९७५ मध्ये त्यांना पटकथा लेखक म्हणून ‘जर्मन फिल्म अॅवॉर्ड इन गोल्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.

साहित्य नोबेल बाबत काही फॅक्ट

  • साहित्यातील नोबेलला १९०१ मध्ये सुरवात झाली.
  • आतापर्यन्त ११६ साहित्यिकांचा या पुरस्काराने गौरव झाला आहे.
  • सर्वाधिक इंग्रजी भाषिक साहित्यिकांचा समावेश.
  • चार वेळा संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • साहित्यातील नोबेल सर्वात कमी वयात जिंकण्याचा मान – रुडयार्ड किपलिंग – द जंगल बुक

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole