चालू घडामोडी – 12 मे 2021

किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना बळ

  • अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.
  • दक्षिणमध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या नगरसुल मधून १५० वी किसान रेल्वे प.बंगाल मधील मालदा येथे रवाना झाली.
  • तब्बल २४६ टन कांदा या किसान रेल्वेने वाहून नेला आहे.
  • नांदेड विभागातून यंदा म्हणजे ५ जानेवारी रोजी सुरू केलेल्या किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत असल्याने या रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे.
  • केवळ १२६ दिवसांनी १५० रेल्वेने नगरसुल येथून देशाच्या विविध भागांत द्राक्षे, कांदा,कलिंगड पोहोचवले आहेत.
  • याचा लाभ राज्यातील शेतकरी व व्यापारी याना मिळत आहे.
  • आतापर्यंत तब्बल ४७ हजार ९५७ टन कांदा, कलिंगड व द्राक्षांची वाहतूक झाली आहे.
  • हा शेतमाल नवी दिल्ली, गुवाहाटी, मालदा, आगरताळा, फातुहा, न्यू जलपायगुडी येथे पोहोचला आहे.
  • केंद्र सरकारने कृषी क्षेत्राच्या मार्केटींग साठी जलद व सुरक्षित वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही किसान रेल्वे सुरू केली.

म्युकरमायकोसिस वर उपचार मोफत

  • कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णांना अजून एक आजाराला सामोरे जावे लागत आहे. याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.
  • म्युकरमायकोसिस असं आजाराचं नाव आहे. हा बुरशीजन्य संसर्ग आहे.
  • यात म्युकर, र्हायझोपस, ऍब्सिडिया, कॅनिंगहॅमेला या प्रजातींच्या बुरशीचा संसर्ग होतो.
  • महाराष्ट्र आरोग्य विभागाने या आजाराची गंभीर दखल घेतली असून या आजाराबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
  • रुग्णांवर महात्मा फुले जनारोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतात.
  • या आजाराचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे साखरेची अनियंत्रित पातळी व स्टिरॉइड्स व अन्य औषधांमुळे कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती हे आहे.
  • या आजारावरील औषधे महाग आहेत. त्यामुळे महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील.

डॉ.माधव गाडगीळ यांचे बांबूच्या प्रजातीला नाव

  • सह्याद्रीच्या जंगलात आढळणाऱ्या बांबूच्या मेस व माणगा या प्रजातींमधील फरक पहिल्यांदाच स्पष्ट झाला आहे.
  • जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या सन्मानार्थ बांबूच्या मेस या प्रजातीचे नामकरण ‘स्युडोऑक्सिनानथेरा माधवी’ असे करण्यात आले आहे.
  • या संशोधनासंबंधीचा शोधनिबंध ‘फायटोटॉक्सा’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
  • पुण्याजवळील पानशेत परिसरातील शिरकोलीच्या जंगलात बांबूंचे संशोधन करण्यात आले.
  • आजवर मेस व माणगा या दोन्ही प्रजातींना ‘स्युडोऑक्सिनानथेरा स्टोकसी’ हे एकच शास्त्रीय नाव असल्याने गोंधळ होत होता.
  • बांबूला आयुष्यात एकदाच फुले येतात. फुलांशिवाय बांबूच्या प्रजातीची ओळख निश्चीत करता येत नाही.
  • बांबूच्या बेटाचे आयुष्य साधारणतः ४० ते ६० वर्षे इतके असते.

फ्रान्सकडून ४० मेट्रिक टन प्राणवायू पूरवठा

  • समुद्रसेतु २ अंतर्गत नौदलाच्या ‘आयएनएस त्रिकंड’ या जहाजावरून ४० मेट्रिक टन प्राणवायू मुंबईच्या बंदरात दाखल झाला.
  • कतारच्या हमाद बंदरावरून भारतीय नौदलाच्या त्रिकंड जहाजाने द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू असलेले क्रायोजेनिक कंटेनर्स वाहून आणले.
  • फ्रान्सकडून ‘ऑक्सिजन सॉलिडॅरिटी ब्रिज’ या मोहिमेअंतर्गत भारताला प्राणवायू मदत करण्यात आली आहे.
  • ही फ्रान्सकडून आलेली पहिली खेप आहे. येत्या दोन महिन्यांत अजून जवळपास ६०० मेट्रिक टनाहून अधिक प्राणवायू भारताला पुरवला जाणार आहे.

PMGKAY: १ लाख टन धान्य वाटप

  • ४० लाख टन धान्य वाटपाचं आश्वासन हे केंद्राकडून देण्यात आलं आहे.
  • पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत त्यापैकी १ लाख टन धान्याचं वाटप झालं आहे.
  • में महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत एकूण ८० कोटी लाभार्थ्यांपैकी २.०३ कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे.
  • १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांमध्ये शासनाच्या दिल्या गेलेल्या माहितीनुसार हे वाटप सुरू झालं आहे.
  • ३४ राज्यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून वाटपासाठी धान्य घेण्यास सुरुवात केली आहे.
  • आतापर्यंत १५.५ लाख टन धान्य घेऊन झालेलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole