12 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

कोरोनाकाळात बँक ऑफ महाराष्ट्रकडून लघुउद्योगांना 2779 कोटींचे कर्ज वाटप.

  • कोरोना महामारीमुळे भारतातील MSME उद्योगाना रोकड चणचण भासत होती त्यामुळे उद्योग चांगलेच कचाट्यात सापडले होते.
  • बँक ऑफ महाराष्ट्राने MSME म्हणजेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना 1779 कोटींचे कर्जवाटप केले आहे. या अतिरिक्त पुरावठ्यामुळे उद्योगांना मदत होणार आहे.

रेवा सोलर पार्क

  • मध्यप्रदेशातील रेवा येथे आशियातील सर्वात मोठ्या सोलर प्रकल्पाचे उदघाटन नुकतेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
  • रेवा प्रकल्प 750 मेगावॅट क्षमतेचा असून यामध्ये 250 मेगावॅट क्षमतेचे 3 युनित आहेत. हा प्रकल्प 500 हेक्टरवर पसरला आहे. 1500 हेक्टरच्या सोलर पार्क मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
  • हा सोलार पार्क ‘रेवा अल्ट्रा मेगा सोलर लिमिटेडने‘ विकसित केला आहे. मध्य प्रदेश ऊर्जा विकास महामंडळ, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची भागीदारी आहे.

ग्लोबल विक 2020

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Global Week 2020 मध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणुकीसाठी भारतात येण्यास अनुकूल वातावरण असल्याचे सूचित केले.
  • आत्मनिर्भर भारत म्हणजे जगाशी नाते तोडणारा भारत किंवा संकुचित भारत नव्हे. तर स्वशाश्वत आणि स्वनिर्मितीक्षम आहे असाही त्यांनी सांगितले आहे.

आंबेमोहोर तांदळाची बासमती सोबत बरोबरी

  • तांदळाचा राजा म्हणून सुगंधी आंबेमोहर तांदळाला ओळखले जाते. सध्या या तांदळाला युरोप आणि अमेरिका मधून जोरदार मागणी वाढली आहे.
  • मागणी जास्त त्या तुलनेत अपुरी आवक होत असल्याने आंबेमोहोर तांदळाचे दार वाढले आहेत. यामुळे आंबेमोहोर तांदळाचा दार बासमातीच्या इतका झाला आहे.
  • आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेशात होते. यातील 80 टक्के उत्पादन मध्य प्रदेशात होते.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole