चालू घडामोडी – 12 December 2020

तेलंगणा मधील कापूस व पाम पिकाचे देशभर ब्रँडिंग.

तेलंगणा कापसाचे वैशिष्टय – या कापसापासून लांब व मजबूत असा धागा बनवता येऊ शकतो.

जास्त क्षेत्रफळावर कापूस शेती करणारे तेलंगणा देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे तर याबाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर गुजरात राज्य आहे.

पामचे वैशिष्ट्य – कमी एकर जागेत बाकी पिकांपेक्षा हे जास्त उत्पन्न देते. बारमाही पिकणाऱ्या अन्य तेल पिकांपेक्षा हे जास्त तेल देते. अन्य पिकांच्या तुलनेत याला लागणाऱ्या पाण्याचं प्रमाण ही कमी आहे.

तेलंगणा पाम पिकाच्या लागवडीबाबतीत आंध्रप्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत खाद्य तेलाच्या आयातीवर दरवर्षी १० अब्ज ₹ खर्च करतो. या पिकाच्या लागवडीसाठी ५०% सबसिडी तेलंगणा सरकारतर्फे दिली गेली आहे.


जगातल्या ५०० महासंगणकांमध्ये भारतातील तीन महासंगणक

१. ए आय
२. मिहीर
३. प्रत्युष…

परमसिद्धी ए आय’- पहिल्या १०० मध्ये ची गणना झाली आहे. त्याला ६२ वे स्थान मिळाले आहे. याची संकल्पना ही पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्पुटिंग’(सी-डॅक) या संस्थेची आहे. तर विज्ञान व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय व इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी हा महासंगणक विकसित केला आहे. शेती,संरक्षण व राष्ट्रीय सुरक्षा,शिक्षण, अवकाश, पूर अंदाज अशा विविध क्षेत्रांत याचा वापर होतो.

प्रत्युष’- या महासंगणकाला ७७ वे स्थान मिळाले. हा महासंगणक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट, पुणे इथे आहे.

मिहीर’- या महासंगणकाला १४४ वे स्थान मिळाले आहे. हा संगणक भूविज्ञान मंत्रालयाला अचूक हवामान सांगण्यास मोठी मदत करतो. ‘नॅशनल सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फॉरकास्ट या संस्थेत वापरला जातो.

पहिल्या स्थानावर फुगाकू नावाचा जपानी सुपर कॉम्पुटर आहे. त्याची क्षमता ४४२ पेटाफ्लॉप्स आहे.

जपान, अमेरिका, जर्मनी, इटली व फ्रान्स या देशांचे सर्वात जास्त संगणक हे पहिल्या १०० महासंगणकांमध्ये आहेत. या ५०० महासंगणकांमध्ये चीनचे २१२, अमेरिकेचे ११३, जपानचे ३४.


महाराष्ट्र सरकारतर्फे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना

सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे व प्रत्येक ग्रामपंचायत व त्यातली घटक गावे समृद्ध करणे हा उद्देश आहे.

शरद पवार हे १२ डिसेंबर ला ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ही योजना सुरू केली आहे.


“पीएम वाणी” द्वारे ब्रॉडबँड चे सार्वत्रीकरण

पंतप्रधान वायफाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस (PM – WANI) वाय-फाय क्रांती आणण्यासाठीचा कार्यक्रम

पब्लिक डेटा ऑफिस (PDO) च्या माध्यमातून सार्वजनिक वायफाय नेटवर्क स्थापनेला मंजूरी. पीडिओ वायफाय ऍक्सेस पॉईंटची स्थापना करणार.


मिनी काझीरंगा

पोबितोरा वन्यजीव अभयारण्य, आसाम येथील गेंडे मृत्युमुखी पडत आहेत.

काझीरंगा अभयारण्य – एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध

गेंड्यांच्या अधिवासात गायी व अन्य जनावरांच्या अतिक्रमणामुळे व गेंड्यांचे अन्न असणारे गवत खाल्यामुळे गेंड्यांचे पोषण नीट होत नाही व ताण येतो आहे व त्यांचा मृत्यू होत आहे. गेंड्यांच्या अन्ननलिकेत जंत सापडले आहेत.


लक्षद्वीप समूहातील ११ बेटे ऑप्टिकल फायबर केबलने कोचीशी जोडली जाणार

११बेटे– कवरत्ती, कल्पेनी, आगती, अमिनी, अँड्रॉथ, मिनिकोय, बंगाराम, बित्रा, चेटलाट, किल्ट्रान व कडमट

इ-गव्हर्नन्स सुविधा इथे पुरवली जाईल. नारळासंबंधीत उद्योग-व्यवसाय, मत्स्य व्यवसाय यांचा विकास होईल. पर्यटनाला चालना देता येईल. आरोग्य सुविधा व शैक्षणिक विकासही करता येईल.

ऑरगॅनिकता जास्तीत जास्त करण्यावर लक्षद्वीप समूहाचा भर आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole