चालू घडामोडी – 11 मे 2021

चीन कडून २०१५ मध्ये कोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून विचार…

  • कोरोना विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याचा विचार २०१५ मध्येच चिनी लष्करी वैज्ञानिकांनी केला होता.
  • तिसरे जागतिक महायुद्ध जैविक अस्त्रांचे असेल असे भाकीत सुद्धा त्यावेली चिनी वैज्ञानिकांनी केले होते.
  • अशी माहिती असलेली कागदपत्रे अमेरिकी परराष्ट्र खात्याला मिळाली आहेत, सायबर तज्ज्ञांनी शहानिशा करून ही कागदपत्रे खरी असल्याचं सांगितलं आहे.
  • ब्रिटनच्या ‘द सन’ त्याचबरोबर ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्रांनी प्रसारित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती दिली.
  • कोविड १९ विषाणू कुठून आला याची पाळंमुळं शोधून काढण्याचं काम अमेरिकेने हाती घेतलं आहे.
  • त्या कागदपत्रांत सार्स कोरोना विषाणूचे उदाहरण चिनी वैज्ञानिकांनी जैविक अस्त्र म्हणून दिले होते.
  • कोरोना विषाणूंचा खूप मोठा समूह असून त्यामुळे सध्या सर्दीपासून ते गंभीर श्वसन रोग होऊ शकतात. यांत सार्सचा ही समावेश आहे.
  • पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या कागदपत्रांत सांगण्यात आलं आहे की जर जैविक अस्त्रांचा वापर केल्यास शत्रूची वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडेल.
  • २००३ मध्ये कोरोनाचा विषाणू सार्सच्या रूपाने चीन मध्ये आला होता
  • त्याचं मानवनिर्मित आवृत्ती तयार केली तर ते उत्तम जैविक अस्त्र ठरू शकते. व दहशतवाद्यांनाही ते मागे टाकेल असा उल्लेख त्या कागदपत्रांत आहे.

कोरोनामुळे पालक मागवलेल्या बालकांसाठी कृतीगट

  • कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सरंक्षण, संगोपन, शिक्षण व इतर अनुषंगिक समस्या सोडवण्यासाठी
  • जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृतीगट स्थापन करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.
  • कोरोनामुळे अनाथ होणाऱ्या बालकांची देशभर मोठी समस्या निर्माण होत आहे.
  • त्याचबरोबर ती एक सामाजिक समस्याही बनत चालली आहे.
  • तर अशा अनाथ मुलांची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे.
  • अनाथ बालकांची तपशीलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले जातील.
  • ही अनाथ बालके शोषणास बळी पडणार नाहीत, बालकामगार अथवा तस्करीसारख्या गुन्ह्यांमध्ये सापडणार नाहीत याबाबत दक्षता घेणे.
  • व या मुलांच्या दत्तकविधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचा संदेश पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

देशात लसीकरण मोफत

  • कोरोना लसीकरण धोरण तज्ज्ञ वैद्यकीय व शास्त्रीय मतांच्या आधारे आखण्यात आले आहे.
  • त्यात न्यायिक हस्तक्षेपाला फारसा वाव नाही असे म्हणत या धोरणाचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात समर्थन केले.
  • देशांतील सर्व वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येईल असेही न्यायालयात सांगण्यात आले.
  • ज्या अभूतपूर्व व विशिष्ट परिस्थितीत लसीकरण मोहिमेचे व कार्यपलिकेचे धोरण म्हणून आखणी करण्यात आली आहे. त्यावर विश्वास ठेवायला हवा असं केंद्राने सांगितलं.
  • हे धोरण चांगल्या हेतूने आखलं असून कुठल्याही अतिउत्साही हस्तक्षेपाचे अकल्पित व अहेतूक परिणाम होऊ शकतील. असे मत केंद्रातर्फे नोंदवले गेले.
  • ही याचिका न्यायालयानं स्वतःच नोंदवून घेतली आहे.
  • लसीकरणाचे धोरण घटनेच्या कलम १४ व २१ अनुरूप असून ते तज्ज्ञ, सर्व राज्यसरकारे, लस उत्पादकांशी चर्चेच्या फेऱ्यानंतर तयार करण्यात आले आहे.
  • न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. कारण या महासाथीचा सामना करताना कार्यपलिकेला मुक्तपणे काम करण्याची मोकळीक असते, असेही केंद्राने म्हणाले आहे.

आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वसर्मा

  • एनईडीए अर्थात ईशान्य लोकशाही आघाडीचे निमंत्रक हेमंत बिस्व सर्मा हे आसामचे नवे मुख्यमंत्री असतील.
  • एकमताने त्यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मावळते मुख्यमंत्री सर्बानंद सोनेवाल हे नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
  • मागील मंत्रिमंडळात सर्मा हे आरोग्यमंत्री होते. कोरोनाची साथ रोखण्याच्या कामातून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
  • २००१ मध्ये पहिल्यांदा जालूकबारी मतदारसंघातून सर्मा आमदार झाले. २०१५ मध्ये काँग्रेसी मुख्यमंत्री तरुण गोगोई सरकारमधून बाहेर पडून भाजप मध्ये प्रवेश केला.
  • २०१६ व २०२१ मध्ये दोन्ही वेळेस भाजप आसाम मध्ये सत्तेत आली त्याचं श्रेय हे सर्मा यांना आहे.
  • ईशान्य भारतात भाजपचा पाया रोवल्यामुळे ईशान्य भारतातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार म्हणून सर्मा यांना ओळखलं जातं.

ऑक्सिजन एक्सप्रेसची विक्रमी धाव

  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात उत्तरदक्षिण उद्भवलेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसची धाव वाढत आहे.
  • ८ मे ला या एक्सप्रेस मधून ४१ टँकरद्वारे ७१८ मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक झाली.
  • या वेळी दैनंदिन ऑक्सिजन वाहतुकीचा एक्सप्रेसचा विक्रम आहे अशी माहिती रेल्वेने दिली.
  • दिल्ली,उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रालाही सर्वाधिक म्हणजे २९३ मेट्रिक टन ऑक्सिजन आतापर्यंत पोहोचवला गेला आहे.
  • पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस कानपूर ला पाठवण्यात आली.
  • आजवर एकूण २६८ टँकर्सद्वारे ४२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा या एक्सप्रेसच्या साहाय्याने करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole