चालू घडामोडी – 10 मे 2021

सर्वोच्च न्यायालयातर्फे प्राणवायू वितरणासाठी हस्तक्षेप

  • कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना प्राणवायू पुरवठ्याची शास्त्रीय वितरण कार्यपद्धती तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२ सदस्यांचा राष्ट्रीय कृतीगट स्थापन केला.
  • केंद्र सरकारकडे असणार्‍या उपलब्ध असलेल्या प्राणवायूचे वितरण आणि पुरवठा याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्राणवायू वियतरणाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
  • जोपर्यंत कृती गटाच्या शिफारसी सादर केलाय जात नाहीत तोवर प्राणवायू पुरवठा आणि वाटप पद्धतीत बदल होणार नाही.
  • या कृतीगटाचे केंद्रीय सचिव हे समन्वयक असतील, तर केंद्रीय आरोग्य सचिव हे पदसिद्ध सदस्य असतील.
  • केंद्राच्या मंजूरीनंतरच या कृतीगटाची स्थापना करण्यात आली. आता हा गट लगेच काम सुरू करेल. त्यामुळे प्राणवायू पुरवठयातील अडचणी दूर होतील.
  • कृतीगटाचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल. देशभरात गरज उपलब्धता आणि वितरण याच्या आधारे प्राणवायू पुरवठ्याच्या प्रक्रियेचं मूल्यमापन हा गट करेल.
  • सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना शास्त्रीय व समान प्राणवायू पुरवठा वितरण प्रक्रिया सूरू करता येईल.
  • प्राणवायुचा पुरवठा वाढवणे, सध्याच्या मागणीचा अंदाज घेणे अशा अनेक मुद्यांचा विचार हा गट करेल.

आरोग्यमंत्रालयाची नवीन मार्गदर्शक तत्वे

  • कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी आता रुग्णाची कोरोना चाचणी सकारात्मक येण्याची जरूर आता नाही.
  • कोणत्याही परिस्थितीत कोणालाही आरोग्यसेवा नाकारता येणार नाही, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहेत.
  • कोरोना रुग्णांवरील उपचारासाठीच्या राष्ट्रीय धोरणात शासनाकडू सुधारणा करण्यात आली आहे. व तसे आदेशही राज्यांना देण्यात आले आहेत.
  • त्यानुसार संशयित बाधिताला त्याचायसाठीच्या वॉर्डमध्ये दाखल होता येईल. रुग्ण वेगळ्या शहरातील असला ऑक्सीजन व अत्यावश्यक औषधे त्याला पुरवाव्या लागतील.
  • वैद्यकीय यंत्रणेला त्याच्यावर उपचार करणे बंधनकारक असेल. रूग्णाला कोणत्याच कारणावरून प्रवेश नाकारता येणार नाही.
  • रुग्णांवर त्वरित, व्यापक आणि प्रभावी उपचार करावे लागतील. सरकारीसह आता खाजगी रुग्णालयांनाही हे नियम लागू आहेत.

आयएनएस विक्रमादित्य वर आग

  • लढाऊ विमाने वाहून नेणार्‍या भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य जहाजावर छोटीशी आग लागली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  • ही आग नंतर विझवण्यात आली व तीहे कोणत्याही पीआरआकाराची जीवतहानी झालेली नाही.
  • या आगीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • सध्या विक्रमादित्य कर्नाटकमधील कारवार बंदरात उभी आहे. २०१३ मध्ये कीवक्लास एयरक्राफ्टस जे रशियाकडून खरेदी करण्यात आले होते, ते या युद्धनौकेवर आहेत, भारतीय इतिहासातील महान सम्राट विक्रमादित्याच्या सन्मानार्थ याला त्याचे नाव देण्यात आले.
  • याचं मूळ नाव बाकू असं आहे. ही १९८७ मध्ये बनवण्यात आलेली आहे. ही आपण रशियाकडूनच खरेदी केलेली आहे.

डीआरडीओच्या औषधाला आपत्कालीन मान्यता

  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओने विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सिडीग्लुकोज’ (२डीजी) या कोविड १९ परतीबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली.
  • हे औषध कोरोनाची सौम्य व तीव्र लक्षणे असणार्‍या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल. हे तोंडावाटे घ्यायचे आहे.
  • २डीजी हे औषध रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत करत असल्याचे तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करत असल्याचे चाचण्यांदरम्यान दिसून आले आहे.
  • २डीजी हे पावडर स्वरूपत येते, ते पाण्यात मिसळून घेतले जाते. विशानूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये ते जमा होते आणि विषाणूजन्य संश्लेषण व ऊर्जेचे उत्पादन थांबवून ते विषाणूच्या वाढीला प्रतिबंध करते. नेमक्या विषाणूसंसर्गित पेशींमध्ये जमा होणे हे या औषधाचे वैशिष्ट्य आहे.
  • या औषधाचे सहज उत्पादन करता येऊ शकते. व ते देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध करता येऊ शकते.

सांगलीच्या नागरिकांनी अनुभवली खगोलीय घटना

  • सांगलीकर नागरिकांनी शून्य सावलीचा अनुभव घेतला. शुक्रवारी दुपारी साधारणतः साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली.
  • त्या दिवशी भरदुपारी कोणत्याही वस्तूची सावली कोणताही दिशेला पडली नाही तर ती वस्तूच्या पायात पडत होती व काही क्षणांसाठी तर गायब झाली होती.
  • आपली पृथ्वी स्वतभोवती फिरते आहे. तिचा भ्रमण अक्ष तिच्या भ्रमण कक्षेच्या प्रतलाशी २३.५ अंशांनी कललेला असल्याने आपण सूर्याचे उत्तरायण दक्षिणायन अनुभवतो. त्यानुसार सहा महिने सूर्याचा प्रवास उत्तर गोलार्धात(२३.५ अंश) कर्कवृत्तापर्यंत होतो, तर सहा महिने दक्षिण गोलार्धात मकर वृत्तापर्यंत (२३.५ अंश) होताना दिसतो.
  • या विषुववृत्ताच्या दक्षिणोत्तर पटय़ास ‘उष्ण कटिबंध ’ म्हणतात. उष्ण कटिबंधातील प्रत्येक भूभाग वर्षांतून किमान दोनवेळा सूर्याच्या समोर येतो, तेंव्हा तेथे सूर्यकिरण लंबरूप (काटकोनात) पडतात.
  • परिणामी त्या परिसरात माध्यान्ह वेळी सर्व वस्तूंच्या सावल्या त्यांच्या पायात पडतात. त्यामुळे काही काळ तेथील वस्तूंची सावली हरवते. या मजेशीर खगोलीय घटनेस शून्य सावली आविष्कार म्हणतात.

८ मे जागतिक थॅलेसीमिया दिन

  • ८ मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून ओळखला जातो.
  • दरवर्षी १०००० मुले थॅलेसेमिया घेऊन जन्माला येत असतात.
  • थॅलेसेमियाचे तीन प्रकार आहेत. यात आजाराची व्यक्ती वाहक असते, ‘इन्टरमीडिया’ असते व ‘मेजर’ (घातक) असते. दोन ‘थॅलेसिमिया मायनर’ पीडित स्त्रीपुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्य ‘थॅलेसेमिया मेजर’ असू शकते.
  • या आजारात लहान मुलांमध्ये हिमोग्लोबीनची निर्मिती थांबते व त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. अशा स्थितीतील हा आजार गंभीर होतो. यात प्रामुख्याने लोह याची कमतरता असते. दुसरीकडे वारंवार रक्त दिल्याने लोह याची मात्रा आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. यामुळे हा आजार गंभीर होतो. भारतात या आजाराच्या वाहकांची संख्या सुमारे दीड कोटीवर आहे. यात थॅलेसेमियाचा घातक (मेजर) प्रकारातील सुमारे दोन लाख रुग्ण आहेत.
  • या आजारातील रुग्णांची मृत्यूसंख्या कमी करायची असेल तर प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार, औषधी व सोयी मिळणे आवश्यक आहे.

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole