10 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

N95 दर्जाचे MH12 मास्क

  • कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या N95 या मस्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्याने N95 मास्कच्या दर्जाची नवीन MH12 मास्क तयार करण्यात आले आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा व्हेंचर सेंटर यांनी याबाबत संशोधन केले आहे.

वैशिष्ट्ये
1. पुण्यात संशोधन झाल्याने MH12 नाव.
2. मास्कची संसर्ग रोखण्याची 95 टक्के क्षमता.
3. मास्क घातल्यानंतर श्वास घेण्याची सुविधा.
4. ITS प्रयोगशाळेकडून प्रमाणित.


अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर.

  • कोरोनाबाबत चीनला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेमधून (who) बाहेर पडण्याची अधिसूचना नुकतीच दिली आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल मध्येच अमेरिका दरवर्षी WHO ला देत असलेल्या निधी वर रोख लावली होती. अमेरिका दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेला 50 कोटी डॉलर्स निधी देत होता.

सह्याद्री वाहिनीवर पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमानुसार मालिका.

  • राज्यातील पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमानुसार सह्याद्री वाहिनीवर मालिका 20 जुलै पासून चालू होत आहे. MKCL नॉलेज फौंडेशनने याबाबत पुढाकार घेतला असून यामुळे राज्यातील दीड कोटी मुलांना फायदा होणार आहे.
  • सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे ही मोफत प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन या मालिकेचे नाव टिलीमिली अस ठेवले आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole