चालू घडामोडी – 09 मे 2021

कर्जरोख्यातून राज्याला अतिरिक्त एक हजार कोटी

  • महाराष्ट्र सरकारने काढलेल्या चार हजार कोटींच्या दीर्घकालीन विक्रीला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
  • २०२१२२ चा १०२२६ कोटी ₹ तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला, कारण कोरोनाच्या या लाटेमुळं अर्थ व्यवस्था कोलमडली.
  • या विक्री केलेल्या कर्ज रोख्यातून गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद नोंदवला गेला. अतिरिक्त २५% मागणी नोंदवली आहे.
  • ११ वर्षांच्या मुदतीसाठी २.५ हजार कोटींच्या रोख्यांसाठी ६.८२% व्याजदर तर १२ वर्षांच्या मुदतीसाठी ६.८७% इतका व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
  • राज्यसरकारला प्रतिसाद देणाऱ्या गुंतवणूकदारांनी केंद्र सरकारच्या रोखे विक्रीकडे पाठ फिरवली.

सतरा राज्यांतील आरक्षण धोक्यात

  • मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तयार केलेला कायदा सर्वोच्च न्यायायलाने रद्द केला त्यानंतर याचा फटका सतरा राज्यांतील आरक्षणाला बसणार आहे.
  • या निकालात न्यायालयाने सांगितलं की ५०% पेक्षा जास्त आरक्षण असू नये, व यासाठी फेरविचार होऊ शकत नाही.
  • त्यामुळे ज्या राज्यांमध्ये ५०% होऊन जास्त आरक्षण आहे ते आता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
  • तामिळनाडूच्या आरक्षणाचा घटनेच्या नवव्या परिशिष्टात समावेश आहे. त्यामुळे त्याला धोका नाही.
  • पण ५०% मर्यादेच्या बाहेर असणाऱ्या आरक्षणाला फटका बसू शकतो.
  • त्याचबरोबर हरियाणा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्येही ही मर्यादा ओलांडली गेली आहे.

बौद्धिक संपदा हक्क माफी

  • अमेरिकेने कोविड १९ प्रतिबंधक लसींवरचे बौद्धिक संपदेचे व्यापारविषयक हक्क तात्पुरते माफ केले आहेत.
  • या निर्णयाचे अमेरिकन काँग्रेसने स्वागत केले आहे.
  • या निर्णयामुळे अन्य देशांतील लोकांना मदत होणार आहे.
  • त्याचबरोबर विषाणूंच्या अन्य उपप्रकारांपासून अमेरिकि नागरिकांचे सरंक्षण होणार आहे.
  • पण वॉलस्ट्रीट जर्नलने यांवर टीका केली आहे, व म्हंटले आहे की हे हक्क माफ केले तर भविष्यात संशोधनात कोणी गुंतवणूकच करणार नाही.
  • अमेरिकेसारख्या प्रगत देशांत उपचारपद्धती व अन्य वैद्यकीय प्रकियांमध्ये संशोधन केले जाते.
  • या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते.

तिसरी लाट थोपवणे शक्य

  • भारतात कोरोना साथीची तिसरी लाट अटळ आहे असं केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी सांगीतलं होतं.
  • आता यावर त्यांनी सांगितलं आहे की जर का आपण योग्य उपाययोजना केल्या तर ही तिसरी लाट थोपवता येईल.
  • साथीच्या लाटा व त्याची संख्या, रुग्णांची संख्या यांवर बोलण्यापेक्षा संसर्गाची ठिकाणे, तीव्रता व वेळ यांवर चर्चा करायला हवी.
  • जर योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या तर या तिसऱ्या लाटेपासून वाचवता येऊ शकतं.
  • मास्क, सामाजिक अंतर, साबणाने हात धुणे, लसीकरण या गोष्टी नीटपणे पाळाव्याच लागतील.
  • कारण ही तिसरी लाट कधी येईल हे सांगता येत नाही.

स्टॅलिन यांचा शपथविधी

  • तामिळनाडूच्या निवडणुकीत दमदार कामगिरी करणारे द्रमुक पक्षनेते एम्.के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
  • राजभवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • त्यांच्या या मंत्रिमंडळात ३२ मंत्री आहेत.
  • ते तामिळनाडूचे आजवरचे २३ वे मुख्यमंत्री ठरले.
  • तर द्रमुक पक्षाकडून तिसरे मुख्यमंत्री आहेत.

रंगास्वामी यांचा शपथविधी

  • पुद्दुचेरीत ऑलइंडिया एन.आर.काँग्रेसचे नेते एन. रंगास्वामी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
  • नायब राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी त्यांना तामिळ भाषेतून शपथ दिली.
  • रंगास्वामी मुख्यमंत्री होण्याची ही चौथी वेळ आहे.
  • त्यांच्या मंत्रीमंडळात चार एन.आर.काँग्रेसचे व २ भाजपाचे असे सहा मंत्री आहेत.

निधन: वनराज भाटिया

  • वय ९३ वर्षे, जेष्ठ संगीतकार.
  • भारतीय व पाश्चात्य संगीताचा सुरेख मिलाफ म्हणजे त्यांची गाणी असत. हा मिलाफ धरत अभिजात संगीत निर्मिती करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
  • लंडन मधील ‘ रॉयल ऍकॅडमी ऑफ म्युझिक’ व पॅरिस येथील संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे धडे घेतले.
  • जाहिरातींना संगीत देण्यापासून त्यांनी सुरुवात केली, त्यांनी आजवर ७००० जाहिरातींना संगीत दिलं आहे.
  • ‘वागळे की दुनिया’, ‘बनेगी अपनी बात’, ‘भारत एक खोज’ तर गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘तमस’ यांसारख्या मालिकांच्या शीर्षकगीतांना संगीतबद्ध केलं.
  • श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘अंकुर’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट, अन्य गाजलेले चित्रपट: मंथन, जाने भी दो यारों, जुनुन, ३६ चौरंगी लेन, मोहन जोशी हाजीर हो, खमोश इ.
  • तमस साठी राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole