चालू घडामोडी – 08 October 2020

Nobel Prize 2020: भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार

  • जगातील सर्वात मानाचा समजला जाणारा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने (Royal Swedish Academy of Sciences) आज जाहीर केले आहेत. यंदा भौतिक शास्त्रातील नोबेल तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची घोषणा स्वीडनच्या स्टॉकहोम मधून करण्यात आली आहे.
  • रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज (Roger Penrose, Reinhard Genzel and Andrea Ghez.) अशी या तीन शास्त्रज्ञांची नावे आहेत. या तीनही शास्त्रज्ञांना ११ लाख डॉलर्स आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे.

शास्त्रज्ञ आणि त्यांचं भौतिक शास्त्रातील योगदान –

१. रॉजर पेनरोज – रॉजर यांनी ब्लॅक होल फॉर्मेशन भौतिक शास्त्रातील सामान्य थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडले.
२. रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज – रेनहार्ड आणि एन्ड्रिया यांनी संयुक्तरित्या ब्लॅक होल शोधून काढण्याचं योगदान दिले आहे.

भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कारचा अर्धा भाग रॉजर पेनरोज याना तर उर्वरित अर्धा भाग रेनहार्ड गेंजेल आणि एन्ड्रिया गेज यांच्यात विभागून देण्यात आला आहे.


भारताची म्यानमारला रेमडेसिविर भेट.

  • जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी महत्वाचे औषध रेमडेसिविरच्या तीन हजार कुप्या भारताने म्यानमारला भेट दिल्या आहेत. भारताचे लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे म्यानमारच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी या कुप्या आँग सान स्यू यांच्याकडे सुपूर्त केल्या आहेत. गेल्या काही महिन्यात म्यानमारचा चीनकडे वाढलेला ओढा पाहता हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
  • लवकरच भारत-म्यानमार-थायलंड महामार्गाच्या कामासही सुरवात होणार आहे. भारत कलादान बहुउद्देशी वाहतूक प्रकल्प म्यामनमारसोबत करत असून सिथवे बंदर आग्नेय आशियातील भारताचे प्रवेशद्वार असणार आहे.

नोबेल पुरस्कार २०२०

  • वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आले. अमेरिकी शास्त्रज्ञ हार्वे जे. ऑल्टर, ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हॉटन आणि चार्ल्स एम. राइस याना संयुक्तपणे ‘हेपॅटायटिस सी’ या विषाणूच्या संशोधनाबद्दल यंदाचा नोबेल देण्यात आला आहे.
  • ‘हेपॅटायटिस सी’ हा विषाणू प्रामुख्याने यकृताचा कर्करोग आणि यकृताची सूज या दोन रोगांना कारणीभूत ठरतो. ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या संशोधनामुळे आता ‘हेपॅटायटिस सी’ रोगाचे कारण स्पष्ट होण्यास मदत होऊन त्यावर औषधे विकसित करून जगभरातील लोकांचे प्राण वाचवले जाणार आहेत.

ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या ऐतिहासिक शोधामुळे प्रथमच ‘हेपॅटायटिस सी’मुळे होणाऱ्या यकृताच्या रोगांवर उपचार करणे शक्य झाले आणि लाखो लोकांचे प्राण वाचवता आले. – नोबेल पुरस्कार समिती


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole