08 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

महाजॉब्स पोर्टल

  • राज्यातील भूमिपुत्रांना राज्यातील विविध कंपन्यांना जॉब मिळाले पाहिजेत यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने “महाजॉब्स” नावाचे संकेतस्तळं चालू केले आहे. राज्यातील कामगारांना यामुळे जॉबची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
  • राज्य सरकारने नुकतेच विविध कंपन्यांना परवाने दिले आहेत तर कोरोनामुळे स्थलांतरित आपल्या गावी परतले आहेत त्यामुळे भूमिपुत्रांना जॉबच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचंच फायदा घेण्याच्या उद्देशाने महाजॉब्स साकारण्यात आले आहे.
  • ही योजना पूर्णपणे पारदर्शी व्हावी या उद्देशाने संकेतस्थळावर अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रसार हवेतूनही होऊ शकतो.

  • सध्या जगभरात थैमान घातलेला कोरोना थांबायचं नाव घेत नाही त्यात तो हवेतूनही पसरतो असा दावा 32 देशातील 239 वैज्ञानिकांनी केला आहे.
  • चांगली जागा नसलेल्या बंदिस्त खोलीत कोरोना विषाणू अधिक टिकतात तर सूक्ष्म कणांच्या माध्यमातून त्यांचा प्रसार होतो असाही त्यांनी नमूद केले आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत पत्र लिहून याबाबत पुरावे असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.

MSME साठी जागतिक बँकेसोबत करार

  • कोरोनामुळे अनेक Small, Medium आणि Micro उद्योग संकटात सापडले आहेत. या उद्योगांना अर्थसहाय्य करताना निधी कमी पडू नये म्हणून भारत सरकारने जागतिक बँकेबरोबर करार केला आहे.
  • जागतिक बँकेच्या MSME तातडीच्या मदत कार्यक्रम अंतर्गत हा करार करण्यात आला आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole