07 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्र सरकारचे “महाजॉब्स”

  • राज्यातील भूमिपुत्रांना राज्यातील विविध कंपन्यांना जॉब मिळाले पाहिजेत यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने “महाजॉब्स” नावाचे संकेतस्तळं चालू केले आहे. राज्यातील कामगारांना यामुळे जॉबची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
  • राज्य सरकारने नुकतेच विविध कंपन्यांना परवाने दिले आहेत तर कोरोनामुळे स्थलांतरित आपल्या गावी परतले आहेत त्यामुळे भूमिपुत्रांना जॉबच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचंच फायदा घेण्याच्या उद्देशाने महाजॉब्स साकारण्यात आले आहे.

जिओ ज्ञानगंगा

  • कोरोनामुळे भारतासह जगभरातील शाळा बंद आहेत त्यामुळे विविध ऑनलाईन पर्यायाचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त पर्याय स्मार्टफोनवरच उपलब्ध असल्याने ग्रामीण भागाला जोरदार फटका बसत आहे.
  • यावर उपाय म्हणून सरकारने दूरचित्रवाहिनी चालू करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच दहावी आणि बारावीसाठी जिओ ज्ञानगंगा वाहिनीसुद्धा उपलब्ध झाली आहे. दहावीची मराठी आणि इंग्रजी या दोन्ही तर बारावीची विज्ञान वाहिनी असेल.

शीख फॉर जस्टीसच्या वेबसाईट बॅन

  • फुटीर कारवायांना पाठींबा देत असल्याच्या कारणावरून शीख फॉर जस्टीसच्या तब्बल ४० वेबसाईट्वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. तसेच या संघटनेला बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शीख फॉर जस्टीस ही अमेरिकास्थित खलिस्थान समर्थक संघटना आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole