चालू घडामोडी – 06 मे 2021

मार्जार कुळातील प्राण्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश

  • या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हैद्राबादच्या प्राणिसंग्रहालयातील सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • यांमुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण सतर्क झालं आहे.
  • प्राधिकरणाने आता एक नवीन नियमावली बनवली आहे.
  • त्यानुसार या प्राणिसंग्रहालयातील मार्जार कुळातील प्राण्यांची कोरोना चाचणी करून घेण्यात यावी.
  • मार्जार कुळात वाघ व बिबटे यांचा समावेश होतो. त्यांची चाचणी करण्यासाठी त्यांना आता बेशुद्ध करावं लागेल.
  • कारण उन्हाळ्यात त्यांना जर बेशुद्ध करताना काळजी घेण्याची गरज असते, कारण त्यांचे अवयव निकामी होण्याचा धोका असतो.
  • या वन्यजीवांना देखील माणसाप्रमाणेच लक्षणे दिसत आहेत.

बी.१.१.७ हा सर्वाधिक संसर्गजन्य प्रकार

  • बी.१.१.७ हा सर्वाधिक संसर्गजन्य प्रकार मानला जातो.
  • डिसेंबर २०२० मध्ये तो प्रथम ब्रिटन मध्ये सापडला.
  • त्यामुळे भारत, कॅनडा व अन्य देशांत रुग्णसंख्या वाढत गेली.
  • तर ब्रिटिश कोलंबिया मधील संशोधकांना या विषाणूची रेणवीय व जैव रासायनिक प्रतिमा मिळाली आहे.
  • हा विषाणू सुईच्या टोकाच्या एक लाख पट लहान आहे.
  • बी.१.१.७ मध्ये अनेक उत्परीवर्तने झालेली असून सध्या जे उत्परीवर्तन झाले आहार त्याचे नाव एन ५०१ वाय असे आहे. हे उत्परीवर्तन त्याच्या बाह्यभागात काटेरी प्रथिनांत झालेले आहे.
  • काटेरी प्रथिनांच्या ठिकाणी एसीई २ रेसप्टेर च्या हे उत्परीवर्तन असल्यामुळे हे अधिक धोकादायक ठरत आहे.

भारतब्रिटन गुंतवणूक करार

  • बोरिस जॉन्सन हे ब्रिटनचे पंतप्रधान व भारतीय पंतप्रधान मोदी यांच्यात शिखर बैठक झाली.
  • त्यात १ अब्ज ब्रिटिश पौंड गुंतवणुकीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
  • याद्वारे ब्रिटन मध्ये ६५०० रोजगार निर्माण होतील.
  • सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तिथे एका नवीन आस्थापनाची निर्मिती करणार आहे.
  • मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार क्षमता दुप्पट होणार आहे.
  • या गुंतवणुकीमुळे वैद्यकीय चाचण्या, संशोधन विकास यांना चालना मिळणार आहे.
  • लसींची निर्मितीही केली जाणार आहे, व त्यानुसार ब्रिटन भारताला ४४.६० कोटी लसी निर्यात करणार आहे.

जी७ पराराष्ट्र मंत्र्यांची बैठक भारत अमेरिका चर्चा

  • ब्रिटन मध्ये झालेल्या जी ७ परिषदेत भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अमेरिकी परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिन्कन यांची चर्चा केली.
  • या चर्चेचे विषय कोविड १९ परिस्थिती, हिंदप्रशांत महासागर क्षेत्र, बहुमंचीय सहकार्य, असे होते.
  • दोन्ही नेत्यांनी कोविड विरोधी उपाययोजनांवर चर्चा केली.
  • कोविडच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसीविर व प्राणवायू यांची मदत अमेरिकेने भारताला केली म्हणून भारताने अमेरिकेचे आभार मानले.
  • अमेरिका व भारत द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक होत आहेत, असं ब्लिकंन यांनी सांगितलं.

दिल्ली उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे

  • आम्ही आदेश दिल्यानंतरही जर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होत नसेल तर न्यायालयाची अवमानना केली म्हणून तुमच्यावर कारवाई का करू नये? असा प्रश्न विचारत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
  • तुम्ही नेमकं कोणत्या जगात वावरत आहात? या संकटाच्या काळात तुम्ही पळ काढू शकता पण आम्ही नाही, असं न्यायालयाने म्हणलं आहे.
  • केंद्र सरकारचा युक्तीवाद ही न्यायालयाने सुनावणी दरम्यान पूर्णपणे फेटाळला.
  • ऑक्सिजन अभावी दवाखान्यातील बेड्सची संख्याही कमी करण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारच्या दोन्ही अधिकाऱ्यांना पुढच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दूर संचार विभागाने 5जी ट्रायलला परवानगी.

  • दूर संचार विभागाने 5 जी तंत्रज्ञान वापर सुरू करण्यासाठी दूर संचार सेवा पूरवठादारांना चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे.
  • ZTE व हुवेई या चिनी कंपन्या यांत चाचण्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाही.
  • एअरटेल, आयडिया, जिओ व एमटीएनएल या दूरसंचारसेवा पुरवठादार कंपन्या व सॅमसंग, नोकिया, सीडॉट, इर्रीक्सन या मोबाईल बनवणाऱ्या कंपन्या आहेत.

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole