06 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका आता ईमेलवर

  • महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने तंत्रज्ञानाचा उपयोग करत यंदाच्या दहावी बारावीच्या देण्यात येणाऱ्या उत्तरपत्रिका थेट ईमेलवर देण्यासाठी चाचपणी करण्यास सुरवात केली आहे.
  • कोरोनामुळे ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच्या प्रति ऑनलाईनच मिळणार आहेत तर सोबतच पुनमूल्यांकनही यंदापासून ऑनलाईन करण्यात येणार आहे. लवकरच राज्य सरकार यासाठी नवीन पोर्टलची घोषणा करणार आहे.

प्रसिद्ध अक्षरकार कमल शेडगे यांचे निधन.

  • सुलेखनाच्या विश्वात अचाट कामगिरी करणारे प्रसिद्ध अक्षरकार कमल शेडगे यांचे 85 व्या वर्षी मुंबईत निधन झाले.
  • 1955 मध्ये वर्तमानपत्रात सुलेखन सुरवात करणाऱ्या शेडगेचे रायगडला जेव्हा जाग येते, मत्स्यगंध, कट्यार काळजात घुसली, गुलमोहर या नाटकांचे सुलेखन विशेष गाजले.
  • 55 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो नाटकांचे सुलेखन केलं. ठाण्यातील गडकरी रंगायतन, रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी कोरलेली अक्षरमाला ही त्यांचीच कामगिरी.
  • माझी अक्षरगाथा, कामलक्षरे आणि चित्रक्षरे ही तीन त्यांची प्रसिद्ध पुस्तके.

गुंडांवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पोलिसांचे अँप

  • तडीपार गुंड अनेकदा आदेश झुगारून प्रवेश करतात पण त्याचा सुगावा लवकर लागत नाही. यावर पुणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल अप्लिकेशन तयार केले आहे.
  • एक्ष्ट्रा अस नाव असणाऱ्या या अप्लिकेशनच्या साहाय्याने गुंडांचा ठावठिकाणा पोलिसांना काही सेकंदात समजणार आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole