चालू घडामोडी – 05 मे 2021

माध्यमांवर बंधने आयोग्य

  • न्यायालयीन सुनावणीच्या वार्तांकनासाठी प्रसार माध्यमांवर निर्बंध आणावेत ही निवडणूक आयोगाची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
  • न्यायालयीन सुनावणीमधील संवाद हा जनतेच्या हिताचा आहे. तो जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. असं न्यायालयाने म्हणलं आहे.
  • माध्यमे व वरिष्ठ न्यायालये ही लोकशाहीचे स्तंभ आहेत,त्यांचे महत्व कमी केले जाऊ शकत नाही, असंही नमूद केलं आहे.
  • प्रसारमाध्यमे ही लोकशाहीतील पहारेकरी आहे त्यांना वार्तांकनापासून रोखता येणार नाही.
  • मद्रास उच्च न्यायालयाने केलेले भाष्य हे निवडणूक आयोगाने चांगल्या भावनेनं घ्यावे.
  • निवडणूक आयोग व उच्च न्यायालय या दोन्ही घटनात्मक संस्थांच्या अधिकारांमध्ये ताळमेळ साधण्याचा प्रयत्न निकाल देताना केला जाईल, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.

मिशन वायू अंतर्गत वैद्यकीय सज्जतेसाठी भेट

  • राज्यासह देशभरातील व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज् अँड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) पुणे यांच्या वतीने ‘प्लॅटफॉर्म फॉर कोविड १९ रिस्पॉन्स’ (पीपीसीआर)
  • व्यासपीठाने मिशन वायू उपक्रम हाती घेतला आहे.
  • तर याच्या पहिल्या टप्प्यात २५० व्हेंटिलेटर्स व ४ हजार ऑक्सिजन काँसंट्रेटर्स कोरोनाबधित भागांमध्ये देणगी म्हणून दिले जाणार आहेत.
  • या उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याची माहिती एमसीसीआयएच्या संकेतस्थळावर व अन्य प्रसारमाध्यमांवर आहे.
  • यातील पहिल्या टप्प्यातील २०० ऑक्सिजन काँसंट्रेटर्स व ५० बायोपॅप मशिन्स हे पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे देण्यात आले आहेत.

प्राणवायूचा साठा ठेवावा

  • आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्राने राखीव प्राणवायूचा साठा ठेवावा, त्यामुळे जर नियमित पूरवठा साखळी खंडित झाली तरीही प्राणवायू उपलब्ध करून देता येईल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
  • या आपत्कालीन प्राणवायू साठ्याची तजवीज पुढील चार दिवसांत करावी. व दिवसागणिक त्यात भर टाकण्यात यावी. सध्या राज्यांकडे वैद्यकीय कारणांसाठी लागणारा प्राणवायू असला तरीही प्राणवायूचा साठा करवून यहेवण्याची गरज आहे असं न्यायालयाने सांगितलं.
  • या प्राणवायू साठ्याचा रोजच्या रोज वास्तव पातळीवर आढावा घेतला जावा.
  • दिल्लीतील प्राणवायू पुरवठ्यातील त्रुटी ३ मेच्या रात्रीपूर्वी दूर करण्याची गरज आहे. प्राणवायू पुरवठ्याची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकून चालणार नाही. या राष्ट्रीय पेचप्रसंगात नागरिकांचे प्राण वाचवणं गरजेचं आहे. त्यांना वाऱ्यावर टाकून चालणार नाही. असं न्यायालयानं फर्मावलं आहे.

कोरोनासंबंधित मदत साहित्य आयातीस जीएसटी सूट

  • मदत म्हणून किंवा मोफत वितरणासाठी भराबाहेरून मिळालेल्या कोरोना मदत साहित्याला इंटेग्रेटेड जीएसटी मधून सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • हा निर्णय ३० जून पर्यंत लागू करण्यात आला आहे.
  • कोविड मदत साहित्याला जीएसटीतून सूट मिळावी यासाठी बऱ्याच धर्मादाय संस्था, बड्या कंपन्या, भारताबाहेरील अन्य संघटना यांनी केंद्र सरकारला निवडणं केलं होतं.
  • रेमडेसीविर इंजेक्शन, नैदानिक चाचण्यांचे किट, वैद्यकीय प्राणवायू, ऑक्सिजन काँसंट्रेटर्स, क्रॅयोजेनिक वाहतूक टाक्या इ. प्रतिबंधक लसी इ. तर आधीच करमुक्त करण्यात आलं आहे.

म्युकोरोमायकोसिस वर उपचार सापडले.

  • पावावरील बुरशी प्रमाणे नाकामध्ये वाढणारा दुर्मिळ बुरशीजन्य आजार ‘म्युकोरोमायकोसिस’ कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींमध्ये वाढत आहे. (पोस्टकोविड)
  • मुख्यत्वे करून मधुमेह झालेल्या रुग्णांना उपचारादारम्यान ऑक्सिजन व स्टेरॉइड्स जास्त प्रमाणात दिले जात असल्याने या आजाराचे प्रमाण वाढत आहे.
  • या आजाराचे वेळेत निदान न झाल्यास उपचार करणे अवघड होते.
  • असे रुग्ण समोर आल्यावर डॉक्टरांनी नक्की काय करावे, उपचाराची पद्धत कशी असावी, यासाठी काय आदर्श कार्यप्रणाली असावी त्याच्यावर काम करण्यात येत आहे.
  • चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, दिसण्यास कमी होणे, डोळे दुखणे, नाक चोंदणे, रक्ताळ किंवा काळसर जखम.अशी याची लक्षणे आहेत.

सुमनताई बंग यांचे निधन

  • वय ९६, जेष्ठ समाजसेविका, त्या गांधीवादाच्या पुरस्कर्त्या होत्या.
  • उपेक्षित ग्रामीण महिलांच्या माऊली म्हणून परिचित.
  • संपूर्ण आयुष्य सार्वजनिक जीवनाला वाहिलेले होते.
  • राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला.
  • ठाकूरदासजी बंग यांच्याशी विवाह झाल्यानंतर गांधीवादी कार्याला वाहून घेतलं.
  • महिलाश्रम येथील नई तालीम मध्ये गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं.
  • नंतर विनोबा भावे यांच्या भूदान, ग्रामदान व ग्रामस्वराज्य चळवळीत हिरीरीने भाग घेतला.
  • जेष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या त्या मातोश्री होत्या.

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole