05 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

नृत्यदर्शिका सरोज खान यांचे निधन

  • बॉलीवूड मधील ख्यातनाम नृत्यदर्शिका सरोज खान यांचे 71 च्या वर्षी मुंबईत निधन झाले. निर्मला नागपाल हे त्यांचे मूळ नाव होते. प्रसिद्ध नृत्यदर्शिक सोहनलाल यांच्याकडे धडे घेतल्यानंतर पुढे त्याच्याशीच त्यांनी विवाह केला.
  • गीता मेरा नाम (1974) हा त्यांनी स्वतंत्रपने नृत्य दिग्दर्शन केलेला पहिला चित्रपट. पण त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या त्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे.
  • अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत त्यांची जोडी शेवटपर्यंत राहिली. चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल 2 हजार गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन केले.

MIDC-UKIBC मध्ये सामंजस्य करार

  • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) आणि ब्रिटन भारत व्यवसाय मंच (UKIBC) यांच्यात व्यवसायिक सहकार्य आणि माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • राज्य आणि ब्रिटन मधीक अनेक व्यवसायिक, तसेच उद्योजक यांच्यातील व्यवसाय वातावरण वृद्धिंगत होण्यासाठी तर राज्यात सुलभ व्यवसाय करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole